वं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील काही ठळक घटनाबद्दल खुलासा

१. फकिरी

वं.दादांना वयाच्या तिस-या वर्षी, त्यांच्या वडिलांनी मोहरमात फकीर केले.फकीर करणे ही इस्लाम धर्मातील एक दीक्षाच आहे.फकीर केले ही एक साधी घटना वाटत असली तरी फकीर करण्याचा संबंध जीवनाशी व कार्याशी काय संबंध आहे हे कळण्यास वं.दादांना अनेक तपे घालवावी लागली.भवितव्यात मार्गदर्शन व सहकार्य करणा-यां विभूतींची ती अप्रत्यक्ष ओळख होती.

फकीर याचा अर्थ जे जगाची ‘फिक्र’ म्हणजेच काळजी निरंतर वहात असतात, ते फकीर!विभूती म्हणजे ज्यांनी गतकालात लोक-कल्याणार्थ देह धारण केला होता व देह ठेवल्यानंतर त्यांनी लोक-कल्याणार्थ प्राप्त केलेली शक्ती ही भुतलावरच मानवाच्या निरंतर कल्याणाचे कार्य करण्यासाठी स्थित केलेली असते, ते विभूती.

अशा विभूती, की ज्यांनी वं.दादांच्या कार्यात मार्गदर्शन व सहकार्य केले त्या म्हणजे,

१. प.पू.हाजी मलंग बाबा. – कल्याण.

२. प.पू.मोईनुद्दिन चिस्ती. – अजमेर.

३. प.पू.सलिम चिस्ती – फत्तेपुर

४. प.पू.महम्मद जिलानी – बगदाद.

५. प.पू.ख्वाजा बंदे नवाज, गुलबर्गा.

६. प.पू.कुतबुद्दीन बाबा, दिल्ली.

निरंतर कार्यरत असणाऱया विभूतींनी विमोचने, दीक्षा, शक्तिपीठ, प्रतिमा इत्यादीबाबत शास्त्रिय व सिध्द-सिध्दांत पध्दतीवर आधारित मार्गदर्शन केले तसेच भवितव्यात ती सर्व साधने अखंडीतपणे कार्यरत राहतीलच, अशाप्रकारचे कार्य करून घेऊन विभूतीनी मानवाला उपकृत केले आहे.

संतानी मार्गदर्शन व सहकार्य केले ते असाध्य अशा ॐकार साधनेत, शक्तिपीठ स्थापनेत, आरती साधनेत, प्रतिमा सिध्दतेत व प्रज्ञावस्था प्रदान करण्यात!

२. प.पू.तेली महाराज.

आपण संत-विभूतींचे दर्शन घेत असतो, त्यांचे आशीवार्द प्राप्त करून घेण्यासाठी कांही सूचित सेवा करीत असतो.पण त्या विभूतींत असणारी अलौकिक शक्ति वा देवत्व आपणास क्वचितच समजू शकते.सातारा गावातही प.पू.तेली महाराज हे एक सत्पुरुष रहात होते.दिसण्यात ते सामान्यच दिसत असत पण प्रत्यक्षात ते एक असामान्य व्यक्तीमत्व होते.त्यांनी वं.दादांच्या जीवनाला नियंत्याच्या नियोजनानुसार आकार देण्याचे महत्वाचे कार्य यशस्वीपणे केले.यातच प.पू.तेली महाराजांत सामावलेल्या दिव्यत्वाची कल्पना यावी.

ते त्रिकाल ज्ञानी होते.त्यांच्या शब्दांना दोन वेगळे अर्थ असत.एक तात्विक व दुसरा व्यावहारिक.

तेली महाराजानी (त्यांच्या शैलीत) केलेल्या मार्गदर्शनामुळेच वं.दादाची पुढील वाटचाल सुकर झाली.सामान्य दिसणा-या व्यक्तित कशा प्रकारची अलौकिक शक्ति दडलेली असते, हे सहजासहजी आकलन होत नाही.महाराजांच्या शब्दांचा अर्थ कळण्यास वं.दादांना प्रखर साधना अनेक तपे करावी लागली.यातच महराजांची महती किती व कशी होती हे समजून घ्यावे.

3. प. पू तेली महाराजांची शैली

शैली म्हणजे खास असे एक वेगळेपण.असे वेगळेपण प.पू.तेली महाराजांच्या प्रत्येक शब्दात, वाक्यात, कृतीत वारंवार दिसत असे.त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, कृतीत, वरवर जरी सामान्य अर्थ आहे असे वाटत असले तरी त्यातील गर्भीत अर्थ किंवा परम-अर्थ वेगळेच असत.

उदाहरणार्थ :–

१. “मला जेवू घालीत जा”

यात त्यांच्या भुकेच्या शमनार्थ अन्न हवे आहे, असा अर्थ नव्हता.वं.दादांनी रोज नेऊन दिलेल्या डब्यातील अन्न महाराजांनी कधीच सेवन केले नाही.ते अन्न तसेच ठेवीत असत.

त्याचा खुलासा, प.पू.तेली महाराजानी, वं.दादांना निर्वाणाच्या दिवशी बोलावून केला.त्याना सांगितले कीं, जमा झालेले सर्व अन्न मोठ्या परातीत एकत्र कर.पुढे सांगितले “हे अन्न नसून ज्ञान आहे ते सर्व जगाला वाट”.

यातील गर्भीत अर्थ म्हणजे, “शिळे अन्न म्हणजे गत जन्मातील ज्ञान असा आहे.तसेच ताजे अन्न म्हणजे इह जन्माचे ज्ञान”.असे इह जन्माचे व गतजन्माचे ज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचव व त्यांना ज्ञानी कर.अशी आज्ञावजा सूचना केली.असा परम-अर्थ त्यांच्या शब्दात आहे.

२. शिक्षणाबद्दल सांगताना प.पू.तेली महाराजानी वं.दादांचे केस धरुन गदागदा हलवून म्हटले :-

“शिकून जगाला आग लावू नकोस, आग लागली आहे ती विझव”

केस धरुन गदागदा हलविले, असे करण्यात वं.दादांच्या शरीराला क्लेष द्यावेत असा अर्थ नव्हता किंवा रागाने म्हटले असाही अर्थ नव्हता.तर वं.दादांच्या मस्तकातील सहस्त्र-दल-कमलातील ब्रम्हरंध्रें खुली करुन आनंदमय कोश शुध्द करण्याची व पुढे तो आनंदमय कोश विकसित करण्याची क्रिया सुरु करुन देणे, असा परम-अर्थ त्या क्रियेत होता.

वयवर्षे 8 ते 18 पर्यंतच्या काळात मुलांची बौध्दिक वाढ ही माता-पिता, इतरेजन व गुरुजन यांच्या शिकवणीतून होत असते.सर्वसाधारणपणे ही वाढ व्यावहारीकतेतून होत असते.नेमके तेच प.प.õतेली महाराजाना, वं.दादांच्याबाबतीत टाळावयाचे होते.ते सरळपणे न सांगता, वं.दादांचे शिक्षण खंडित करून व परीक्षेत अपयश आणून साध्य केले.

“देवासारखा देव असून रडतोस काय? जन्माला येणारा मनुष्य कर्माला रडतो तूच तर देव आहेस मी गेल्यावर ही प्रचिती येईल, पण मी नसणार! शहाणा हो व भैरवनाथांनी “प्रकाश लाव” असे सांगितले आहे त्या वाक्याचा अर्थ ब्रम्ह म्हणून विचार कर. जास्त खोलात जाऊ नकोस.नाहीतर बुडून मरशील”

असे मार्गदर्शन करण्यात वं.दादांना, नियंत्याने नियोजीत केलेल्या कार्याची जाण करुन देऊन, संभाव्य अडचणींचे ज्ञान व जाण देऊन अवधान ठेवण्यास सूचविणे हे होते.वं.दादा हे अवतारी पुरुष आहेत याची जाण महाराजाना होती.म्हणूनच अवतारी पुरुषाला योग्य वेळी मार्गदर्शन करुन, नियंत्याच्या नियोजित कार्याची जाण करुन देण्याची जबाबदारी प.पू.तेली महाराजांनी,आपल्यावर आहे हे ओळखले होते.म्हणूनच त्यानी वं.दादाना योग्य ती जाण करून देऊन आपले कर्तव्य पार पाडले.त्यात कर्तव्यपूर्ततेचे समाधान तर होतेच पण त्यावेळी, “मी नसणार” या शब्दांमध्ये किंचित डोकावणारी खंतही होती.

३. “प्रकाश लाव” असे जे प.पू.भैरवनाथांनी सांगितले त्यातील गर्भित अर्थ समजावून घेण्यास, महाराजानी सूचविले.

त्यातील गर्भीत अर्थ म्हणजे श्री भैरवनाथानी जो ॐ कार वं.दादांना शिकविला, तो ॐ कार पुढे सर्व जगाला तारणारा आहे, त्याचे ज्ञान व जाण करून देण्याचे कार्य करावयाचे आहे, हे लक्षात घे, असे सुचविले.श्री.भैरवनाथांना प्रकाशात यायचे नव्हते.ते स्वयं ॐ कार होते.त्यानी शिकविलेला ॐ कार जगापुढे ठेवण्याचे व त्यातील ज्ञान व ॐ काराचे मानवी जीवनातील कार्य समजावून देण्याचे कार्य तुला करावयाचे आहे, हे त्यातून सुचविले. .

प.पू.तेली महाराजांची भाषा जरी मराठी असली तरी त्यांचे बोलणे वा त्यातील गर्भीत अर्थ सहजासहजी समजत नसे.त्यातून ते वं.दादांशी बोलताना अश्लिल शिवी देऊनच बोलायचे.बोलण्याची सुरुवात शिवीनेच होत असे.ती शिवी म्हणजे “तुझ्या आईची चूत”.असे बोलणे ऐकून वं.दादां अस्वस्थ होत असत.पण आज्ञापालन व महाराजांवरील श्रध्दा यामुळे महाराजांच्या सेवेत खंड पडू दिला नाही.तथापी महाराज अशी अर्वाच्य भाषा कां वापरतात याचे गूढ मात्र त्याना होतेच.

वं.दादां,आज्ञेप्रमाणे नरसोबाची वाडी येथे विमोचनांच्या पूर्ततेसाठी ‘महारूद्र स्वाहाकार’ करण्यास आले असताना, वेद-शास्त्र-संपन्न गुरुजी व इतर विद्वान ब्राम्हणाकडून हवनासाठी लागणारी वेदी तयार करीत असता, वेदी अशीच कां असावी, याचे शास्त्र समजावून देत होते.त्यावेळी वेदीचा आकार हा स्त्राóच्या योनी सारखा कां असतो, याचे विवेचन केले.वेदीत मंत्रांनी सिध्द केलेली हर्वीद्रव्यांची पूर्णाहुती द्यावयाची असते.ते स्थान शुध्द असते.हवनानंतर भस्म झालेली द्रव्ये, सिध्द केलेल्या मंत्रोच्चाराने, शुध्द व तेज तत्वामुळे प्रखर झाल्याने त्यात प्रचंड शक्ति सामावलेली असते.वेदीच्या आकृतीत सामावलेले तत्व वेदीच्या आकाराकडे पहाता क्षणीच, प.पू.तेली महाराज उच्चारीत असलेल्या शिवीची आठवण झाली व त्यातील शब्दांचा परम अर्थ वं.दादांना पूर्णपणे उमगला.अशा प्रकारे व.दादांना तेली महारांजाच्या शिवीतील गर्भित अर्थाची उकल होण्यासाठी अनेक तपे वाट पाहावी लागली.

वं.दादांनी लोककल्याणाचे कार्य पूर्ण केले.पुढील अवस्था भक्तभाविकाना प्राप्त व्हावी म्हणून, प.पू.बाबांनी भक्त-भाविकांना प्रज्ञा अवस्था एका गोपालकाल्या दिवशी प्राप्त करून दिली.त्यादिवशी प.पू.तेली महाराजानी स्वतः उपस्थित राहून वं.दादांनी नियंत्याच्या नियोजनानुसार कार्य संपन्न केल्याबद्दलचे समाधान व्यक्त केले व म्हणाले ‘यापुढे ताजे अन्न खावयास मिळेल’.

याचा अर्थ म्हणजे मानवाला इहलोक व परलोक या दोन्ही लोकांतील ज्ञान प्राप्त होऊन जीवन जगण्याचा मार्ग सुकर करून दिला आहेस, याबद्दल समाधान व्यक्त केले.

अशी असते संतवाणी.

४. श्री.भैरवनाथ.

सातारा गावात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत पण श्री.भैरवनाथांचे मंदिर गावाबाहेर व डोंगरावर आहे.मंदिर छोटेसेच, मूर्ती पाषाणाची आणि फारशी कोरीव नसलेली.पंचमुखी शेष म्हणजे पंचफणी शेष असे श्री.भैरवनाथांचे ते ‘स्वयंभू’ मंदिर आहे.तसेच ते स्थान ‘जागृत’ देखिल आहे.त्याची प्रचीति अनेक घटनातून स्पष्ट होत गेली.

श्री.भैरवनाथांच्या सेवेतूनच वं.दादांना भास, सत्य आणि दृष्टांत यातील अर्थ उमगल्याने ईश्वरावरची श्रध्दा दृढ झाली.अशाप्रकारे वं.दादांच्या जीवनातील नियंत्याच्या नियोजित कार्याचा आरंभ श्री.भैरवनाथांनी करून दिला.

५. गुराख्यामार्फ त ईश्वरी संकेत

पूर्वीच्या काळी घरोघरी पशुधन असे.त्यांच्या देखरेखीसाठी गुराखी असत.असाच एक गुराखी, वं.दादा श्री.भैरवनाथांची सेवा करीत असतां, वं.दादांना म्हणाला कीं, जवळच जिवंत पाण्याचा झरा आहे.त्या पाण्याने स्नान करून सेवा केल्यास काय फरक जाणवतो ते पहा.त्याप्रमाणे स्नान करून सेवा केल्यावर पणतीच्या प्रकाशात खरोखरीच फरक जाणवला, प्रकाशातील वेगळेपण अनुभवले.त्यातून उमगले कीं, सामान्य गुराखी देखील ईश्वरी संकेत प्रवाहित करण्याचे एक माध्यम असू शकतो व ईश्वरी संकेत प्रवाहित करण्यासाठी माध्यमाची गरज असते.

६. निसर्गतत्वाकडून ‘ॐकार’दीक्षा

एके दिवशी वं.दादा श्री.भैरवनाथांची सेवा करण्यासाठी डोंगर चढत असताना, शिट्टीचा आवाज त्याना ऐकू आला जवळ जावून पहातात, तर प्रत्यक्ष श्री.शेष, श्री.भैरवनाथाच्या मूर्ते जवळच असलेले दिसले नंतर, याचा खुलासा करताना वडीलानी सांगितले कीं, त्या नादाला ‘सिंहनाद’ असे म्हणतात.असा नाद ईश्वर जेंव्हा प्रसन्न होतो तेंव्हाच निर्माण होतो.पुढे याचा संबंध ॐकार साधनेशी आल्यावर त्याची महती वं.दादांना पटली.कोणा देहधारी व्यक्तिकडून प्राप्त न होता, प्रत्यक्ष निसर्ग तत्वातून प्राप्त झालेली, उच्चतम व दुष्प्राप्य अशी ती एकमेव दीक्षाच होती.

७. श्री.भैरवनाथांच्या सेवेचे पूर्णत्व

प.पू.तेली महाराज व श्री.भैरवनाथ यांच्या सेवेतून शिक्षण, ज्ञान, भास व दृष्टांत याबाबतचा खुलासा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे प्राप्त झाल्यावर वं.दादांच्या आज्ञा-पालन व दृढ श्रध्देतून सेवला एक निश्चित दिशा प्राप्त झाली आहे व विचारात व आचारात निश्चलता आली आहे असे पाहून श्री.भैरवनाथांनी वं.दांदाना विचारले कीं, प.पू.साईबाबांचे नांव ऐकले आहेस काय? त्यावर ‘होय’ असे म्हणताच, श्री.भैरवनाथानी आज्ञा केली कीं, यापुढे प.पू.बाबांचे मार्गदर्शन घ्यावे व त्यांच्या आज्ञेचे पालन करावे.भवितव्यात प.पू.बाबाच जगाला तारणार आहेत.त्याप्रमाणे वं.दादानी प.पू.साईबाबांची सेवा सुरु करून जीवनातील निंयंत्याच्या नियोजित कार्याचा आरंभ केला.

८. संचार – श्री.बहुचराईदेवीचा कार्यार्थ आशीर्वाद व सहकार्य.

वं.दादा मुंबईला कामकाजासाठी गेले असताना, त्यांची खोली साफ करणा-या देवीभक्त मुक्या मुलाकडून ग्रामदैवत कसे कार्यरत असते हे समजले.देवदेवता गावातील भक्ताना, योग्य माध्यमाद्वारे मार्गदर्शन करीत असतात.माध्यमांच्या कुटुंबियांचा चरितार्थ भक्तभाविक, मान देऊन, मनोभावे चालवित असतात.महत्वाचे म्हणजे ग्रामदेवताकडून होणारे गावाचे रक्षण हे होय.देवीभक्त मुलाची वाचा देवीनेच बंद केली होती कारण तो मुलगा पूर्वी मार्गदर्शन करून सेवा करीत असे.त्यातून भक्तांना मार्गदर्शन व देवदेवता गावाचे रक्षणाचे कार्य करीत होते.असे कार्य बंद करून तो मुलगा घनप्राप्तीसाठी गाव सोडून शहरात आला होता.म्हणून देवीने सूचित केले कीं, त्यानी परत सेवा सुरु करावी.त्याप्रमाणे मुलानी सेवा सुरु केली. यथावकाश देवीने त्या मुलाकडून निरोप पाठविला कीं, देवीला प.पू बाबांकडून ती करीत असलेल्या गावाक-यांच्या सेवेतून, तिला सोडवणूक हवी आहे.त्याप्रमाणे सोडवणूक मिळाल्यावर, देवीने वं दादांना सांगितले कीं, तुझ्या कार्यात, तुला हवे असल्यास सहकार्य करावयास तयार आहे.वं.दादांनी होय म्हणताच देवीनी आशीर्वाद दिला.त्यावेळी वं.दादांना संचार होत असल्याची जाणीव झाली.

पुढे वं.दादांनी श्री बहुचराई देवीचा टाक करून नित्य पूजनात ठेवला.तो टाक आजही पूजनात आहे.

वरील विवेचनातून हे स्पष्ट होते कीं, आजही ग्रामदैवत कार्यरत आहेत.त्यांच्या कार्य प्रणालीतील प्रखरता प्रत्यक्ष पहिली.सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता, देवदेवता लोक-कल्याणाच्या कार्यात सहभागी होण्यास उत्सुक आहेत्। हे दिसले.याचा उपयोग शक्तिपीठ स्थापनेच्या वेळी झाला.म्हणजेच ईश्वरी-संकेतातून उभे राहणा-या कार्यात सहभाग कसा न कळत होत असतो, हे ह्यातुन स्पष्ट होते.