कार्याची भूमिका

कार्याची भूमिका

श्री साई अध्यात्मिक समिती.

स्थापना — विजया दशमी.शके
स्थळ — “द्वारकामाई” पुणे

कार्य

लोक-कल्याण

कार्याचे ब्रीद

सर्वांभूती आत्मा एकच आहे.

कार्याची पीठिका

लोक-कल्याणाचे कार्य 2,500 वर्षापूर्वी श्री नवनाथांनी स्थापन केले.
कालांतराने अनेक संतांनी आणि विभूतींनी गरजेनुसार पुनरुज्जिवीत केले.
प.पू.साईनाथ महाराजानी ते उदीत केले.
वंदनीय दादांनी ते सुरु केले.

कार्याची भूमिका
1. कार्याची भूमिका पूर्णपणे दैविक उपासना परंपरेत आहे. मंत्र-तंत्र विद्यांचा अभ्यास कार्यास मान्य नाही.
2. ईश्वरी उपासनेपासून मानवी जीवनाची सेवा ‘कर्तव्य’ म्हणून करावी असा गुरु-उपदेश.
3. या कार्याची सिध्द-सिध्दांत पध्दत पूर्णत्वाने समितीच्या अभ्यासाची आहे. बाह्य संबंधित नाही.
4. दुखनिवारणार्थ होणा-या मार्गदर्शनाचा हेतू, “धर्मभावना, नित्य आचार-विचार, जन्म-ऋणानुबंधातील कर्तव्य यांचे पालन करणे, हाच धर्म” असा आहे.
5. हे कार्य दैविक उपासनेचा पाया असल्याने येणा-या प्रत्येक भक्तभाविकात धर्माचरण स्वतः करण्यास मार्गदर्शन दिले आहे.