अध्याय१०. गुरुतत्व व त्याचे जीवनातील महत्व

अध्याय१०. गुरुतत्व व त्याचे जीवनातील महत्व.
निवेदन
शीर्षकामध्ये म्हटल्याप्रमाणे या अध्यायात गुरु व गुरुतत्व याबद्दलचा खुलासा मूळ तत्वापासून केला आहे.त्यात गुरु व गुरुतत्व यातील फरक तसेत तत्व म्हणजे काय याचेही विवेचन केले आहे. सध्याचे मानवी जीवन असे विस्कळीत झाले आहे हे शास्त्रीय मीमांसेतून समजावून दिले आहेत.आजची परिस्थिती,त्या परिस्थितील भक्तभाविक व सर्व सामान्य मनुष्य, त्यांच्या अडिअडचणी.त्या अडचणींच्या निवारणार्थ शोधात असलेल्यांची मानसिकता,इत्यादिंचा विषयांचा सविस्तर खुलासा केला आहे
सर्व सामान्य मनुष्य गुरुंचा शोध कळत न कळत घेतच असतो.पण त्यांच्या अडिअडचणी खरोखरीच सोडविण्या इतपत क्षमता असलेले गुरु आज आहेत काय?तसे सामर्थ्यवान गुरु असते, तर समाजाची स्थिती इतकी खालावली नसती, मनुष्य इतका मनाने पिचलेला व अगतिक झालेला दिसला नसता.
नुकतेच कुठे साधक अवस्थेची ओळख झालेल्या गुरुंकडून नाडलेल्यां भक्तभाविकांची कशी भलावणी केली जाते याचे सविस्तर विवेचन केले आहे.त्या भलावणीतूच आर्थिक प्राप्ती करून असे गुरु गडगंज होत असतात याबद्दलचे विवेचन एकतर्फी विचार न करता तटस्थपणे वाचावे.त्यात कोणाबद्दल अनादर केलेला नसून त्यातील शास्त्रीय मीमांसा लक्षात घेण्यासाठी आहे, हे लक्षात येईल.आजच्या वास्तवाचे ते प्रत्यक्ष निवेदन आहे.त्यातील सत्यता आपण देखील मान्य कराल.विवेचनात नमूद केलेली शास्त्रीय कारणे लक्षपूर्वक वाचावित.म्हणजे अंधश्रध्देचे निर्मूलनही होईल.
‘गुरु’ जरी मानवी देह धारण केलेल्या स्वरुपात आपणास दिसत असले तरी ते प्रत्यक्षात देह-धारी ईशतत्व असते.म्हणजे ती कार्यशील त्रिगुणात्मक शक्ति असते.अशा त्रिगुणात्माक शक्तितून, भक्तभाविकांच्या जीवनात स्थित्यंतर घडविण्याचे सामर्थ्य फक्त अशा परिपूर्ण गुरुतच असते.अशा गुरुंचा जन्म मानवी जीवनात स्थित्यंतर घडविण्यासाठीच असतो.कारण ते अवतारी पुरूष असतात.
गुरुंनी मानवी देह धारण केल्यावर,त्यांनाही प्रखर साधना करावी लागते जेणे करून मानवी जीवनात त्या त्या कालानुसार स्थित्यंतर घडवून,मानवातील ईश्वरी-अंश जागृत करण्याचे कार्य सुलभपणे करता येईल.अशा साधनेतील, जे शास्त्रीय विवेचन विस्तृतपणे केले आहे ते परत परत वाचावे.त्यातील मर्म कळेपर्यंत वाचावे.म्हणजे पुढील विषयांचे आकलन सुलभपणे होईल.
गुरु ज्यावेळी मार्गदर्शन करीत असतात,त्यात प्रामुख्याने पहिल्यांदा अडिअडचणींच्या निवारणार्थ सेवा सूचित करतात.पण सर्वच अडचणींचे निवारण एकाच वेळी होऊ शकत नाही.कारण अडचणीचे स्वरूप वेगवेगळे असते.यास्तव वेगवेगळी सेवा गुरु सूचित करीत असतात.
ह्या सर्व विवेचनात जे विविध विषय घेतले आहेत, ते म्हणजे विमोचन,निराकरण,निवारण,मार्गदर्शन, दीक्षा,दीक्षांचे प्रकार,दीक्षेचे मानवी देहातील कार्य,इत्यादी.त्यातील आधिभौतिक निराकरणे ही काल्पनिकता नसून वास्तवता आहे.त्यांचा उगम हा हजारो वर्षापूर्वी झालेला असून,त्या त्या कालानुसार निराकरण सूचित केले जात असते. त्या बद्दलचे विवेचन वाचनीय तर आहेच,पण शास्त्रीय दृष्टीकोनातून ते विवेचन स्मरणीय आहे.
गुरुंचे सामर्थ्य अमर्याद असते.पण गुरु, आलेल्या भक्तांच्या पात्रतेनुसार मार्गदर्शन करीत असतात.हे लक्षात घ्यावे.सिध्द पुरूषांकडे काय मागावे,ह्याचे भान आपणास असले पाहिजे.
विवेचनात तन्मात्रे,शब्दब्रम्ह,शक्तिपीठ,तिथीनुसार अनुष्ठान, गुरुदक्षिणा,तीन अवस्था (‘अवधान-ध्यान-चिंतन’) ,दीक्षेतील –विशेष महत्वाची दीक्षा (म्हणजे महाकारण दीक्षा), या प्रत्येक विषयाचे निवेदन पूर्णपणे शास्त्रीय आहे .प्रत्येक मनुष्याच्या जीवनात त्यांचा समावेश असतोच.पण त्याबद्दल अनुभव घ्यावयाचे असल्यास गुरुंच्या मार्गदर्शनच घ्यावे लागते.तसेच त्याबद्दलचा तक्ता देखील खूप महत्वाचा आहे.म्हणजे हे लक्षात येईल कीं, परमेश्वर हजारो वर्षापासून मानवांची काळजी वाहतो आहे व वाहणार आहे.कारण परमेश्वराला मानवी स्वभावाची म्हणजे तो सतत सुखासिनतेतून जीवन जगणे पसंत करीत असतो, याची पूर्ण जाण आहे.
ज्ञान या अवस्थेबद्दल केलेला खुलासा परत परत वाचावा. श्रध्दा म्हणजे काय व ती पूर्णत्वास नेता येईल, हे समजून घेण्यासाठी आहे..
विमोचनापैकी, वंशविमोचनाचे महत्व व पूर्णत्व, या बाबतचा सविस्तर खुलासा,केलेला आहे. विविध प्रकारचे दोष,त्यापैकी विद्यानाश हा एक महत्वाचा दोष असून, तो दोष पुढील पिढ्यांत, विमोचन होईपर्यंत, धारण होत असतो.त्याबाबतचा खुलासा व त्या अनुशंगाने केलेल्या, श्री साई स्वाध्याय मंडळाची स्थापनेतील हेतू सविस्तपणे सांगितला आहे.स्वाध्याय मंडळाकडून होत राहणारे कार्य,हे निरंतर असे कार्य आहे.त्यातील शास्त्रीय विवेचन लक्षात घ्यावे. ते परत परत वाचणे हे आपल्याच हिताचे आहे.त्या मंडळाच्या स्थापनेतून, आपल्याच कल्याणाची नव्हे तर, पुढील पिढ्यांची काळजी घेतलेली आहे,हे स्पष्ट होईल.मंडळाबद्दल व त्याच्या सभासत्वासाठी परमपूज्य साईनाथ महारांजानी दिलेला कृपाशिर्वाद याची खास करून नोंद घ्यावी.परमपूज्य बाबांनी आपणा सर्वास सभासद करून घेतले आहे, पण ते सभासदत्व टिकविण्याचे कार्य हे आपल्यावर अवलंबून आहे,याची जाणीव ठेवावी.म्हणजे जीवनाची सार्थकता कशात आहे हे उमगेल.
तसेच कुलधर्म,कुलाचार,देवदेवतार्जन इत्यादिचा खुलासा निवांपणे वाचावा.त्यातून घ्यावयाचा बोध समजल्यास व त्याप्रमाणे आचरण ठेवण्याच्या सूचना पाळल्यास जीवनात सुख-शांती-समाधान प्राप्त होऊन,पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शन करण्याची गरज उरणार नाही.
सर्व सामान्य मनुष्यास काया-वाचा-मन ह्याचा अर्थ समजला तरी त्यूनच पुढे त्याचे रूपांतर तन-मन-धन यामध्ये कसे होते, ते नीट समजून घ्यावे.म्हणजे साधना व तीचा परिपाक म्हणजे काय व तो कसा करून घेता येईल,हे समजून घ्यावे.त्यात आचरण कसे महत्वाचे आहे ते उमगेल.
वंदनीय दादांनी गुरुपौर्णिमेबद्दल केलेला खुलासा सतत स्मरणात ठेवून, गुरुपौर्णिमेचे महत्व जाणून घ्यावे.वं दादांनी एकच गुरु मानला व त्यांच्या आज्ञेनुसार कार्य करून, परमपूज्य बाबांच्या जीवनाचे जे तत्व होते ( मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ), ते साकार करण्यासाठी श्री साई आध्यात्मित समितीची स्थापना करून, लोक-कल्याणाचे कार्य निरंतरपणे होत राहिल, अशी तरतूद केली. गुरुंबद्दल व्यक्त केलेली श्रध्दा सतत स्मरणात ठेवून, योग्य तो बोध घेतल्यास जीवनाचे सार्थक होईल.सर्व सेवकांनी व भक्तभाविकांनी काय केले पाहिजे, हे देखील निक्षून सांगितले आहे.त्याची योग्य ती दखल घेऊन आपले आचरण ठेवणे म्हणजेच ‘गुरुदक्षिणा’ अपर्ण करणे होय!