संकेतस्थळाविषयी

गुरूपौर्णिमा उत्सवदिनांक 7.7.2009 मंगळवार रोजी वेबसाईटचे उद्घाटनाचे वेळी केलेले निवेदन

 

१. वेब साईटची माहिती

१. वेब-साईट वरील जे Animation आत्ताच आपण पाहिले, त्याबाबत थोडक्यात विवेचन करण्यापासुन सुरुवात करु.

२. जो बिंदु आपण पाहिलात त्या बिंदुतूनच निर्मितीची सुरुवात झाली.त्या बिंदुत प्रचंड शक्ति व गती स्थित असते.बिंदुत असणाऱया उत्सर्जनशीलतेतून लाखो-करोडो वर्षानंतर अमर्यादित असे सतत विस्तारित जाणारे वलय निर्माण झाले, त्यालाच ‘अनंत’ असे म्हणतात.त्यातील जे एक वलय शीतल होऊन स्थिर झाले ते वलय म्हणजे ‘अवकाश’.

३. त्या अवकाशातून शीतल झाले, ते आकाशतत्व.त्यातून पुढे वायुतत्व व तेजतत्व निर्माण झाले.अशी प्रथम निर्माण झाली, ती तीन तत्वे म्हणजेच ब्रम्हांङ.यानंतर आपतत्व व पृथ्वीतत्व निर्माण झाले.

४. या पांच तत्वातूनच प्रथम ब्रम्हांडाची निर्मिती झाली व नंतर सृष्टी साकारली गेली.सृष्टीतील सर्व चराचरात हीच पांच तत्वे सामावलेली असतात.ब्रम्हांडात असतात ते सप्तरंग व सृष्टी आहे विवधरंगी.म्हणूनच ब्रम्हांडाचा आनंद व्यक्त होत असतो, त्यावेळी इंद्रधनुष्य आकाशात विलसत असते.आणि सृष्टीतील विविधता आपणास नित्य आकृष्ट करीत असते, ती विविधरंगांमुळे.

५. ब्रम्हांडाच्या निर्मितीच्या वेळी जो ध्वनी निर्मिला गेला त्याला “सिंहनाद” असे म्हणतात.तो नाद श्री.भैरवनाथांनी वं.दादांना दीक्षा स्वरुपात दिला.तोच सिंहनाद आपण वं.दांदांच्या स्वरात आत्ताच ऐकला आहात.

६. त्या नादानंतर जो स्वर-रुपात वं.दादांच्याकडून श्री.भैरवनाथांनी पाच कोशातून म्हणून घेतला त्याला ॐकार म्हणतात.तो ॐकारही आपण अ + ऊ + म या अक्षररुपात पाहिला आहे.

७. तोच ॐकार मानवाला यापुढे तारणार असून मानवाचे जीवन ईश्वरमय होणार आहे.प.पू.साईनाथ महाराजांनी “मानवी जीवन ईश्वरमय व्हावे.”हे जीवनतत्व म्हणून अंगिकारले आहे.ते जीवन-तत्व साकार व्हावे म्हणून श्री.साई अध्यात्मिक समितीची स्थापना केली.

८. प.पू.साईनाथ महारांजांचे जीवनतत्व साकारण्यासाठी वं.दादांनी अवतार घेऊन अशक्यप्राय असे कार्य प्रत्यक्षात साकार केले म्हणजेच प.पू.साईनाथ महाराजांचे हे जीवनतत्व बनले, वं. दादांचे जीवनकार्य

९. या कार्याची व्यापकता लक्षात येण्यासाठी खालील गोष्टींचे मनन करावे.

१०. सूचित सेवा मनोभावे करीत असल्यास वैयक्तिक सुखसमाधान प्राप्त होतेच.

११. कुटुंबातही शांती रहाते.

१२. नित्य करीत असलेल्या संथा पध्दतीच्या साधनेने परलोकात, गती अभावी अडकलेल्या आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना सद्गती प्राप्त होते.ते मुक्त होताना आर्शिवाद देत असतात.हा लाभ अलौकिक आहे.

१३. एवढ्यावरच हे कार्य सिमीत नसून भक्त-भाविक पुढील जन्मांची तरतूद करु शकतात. इहलोक, परलोक व पुढील जन्मांची तरतुद असलेले हे कार्य किती व कसे व्यापक आहे हे लक्षात घ्यावे.

१४. असा आहे, श्री.साई अध्यात्मिक समितीच्या निर्मितीपूर्वीचा हा कार्यकारणभाव.

 

.समितीबद्दल माहिती

कार्य — म्हणजे “लोक-कल्याण”.
श्री.साई अध्यात्मिक समितीच्या कार्याचे तीन भाग म्हणजे–

1. कार्याची पूर्वपीठीका

लोक-कल्याणाचे कार्य श्री नाथांनी अडीच हजार वर्षापूर्वी स्थापन केले.2500 वर्षापूर्वी समाजाची स्थिती प्रचलित असलेल्या होम-हवन, यज्ञ-याग यांच्या अभावी बिकट झालेली होती.कारण त्या काळात बळी देण्याच्या प्रथेतून निर्माण होणा-या अनिष्ट शक्तितून अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले होते.समाज अगदी पिचून गेलेला होता.त्यावेळच्या जटिल समस्येतून समाजाला मुक्त करण्यासाठी श्री नाथांनी अवतार घेऊन, शाबरी विद्येतून, बळी देण्याचे प्रकार बंद केले.समाजाला झेपेल असे देवदेवतार्जन सुचविले.त्यातून समाजस्थिती सुधारली.
कालंतराने भूतलावरील विविध ठिकाणची सामाजिक व्यवस्था, विविध कारणामुळे मोडकळीस आली.कारण त्या त्या ठिकाणचा समाज देव व धर्म याबाबातच्या मूळ तत्वापासून ढळत गेल्याने त्या त्या ठिकाणी, त्या त्या वेळी अनेक संत-विभूतींनी अवतार घेऊन अनिष्ट प्रथा बंद करुन सुलभ अशा देव व धर्म यावर आधारित नव्या समाजाची उभारणी करुन त्यावेळच्या समाजाला झेपेल अशा देवदेवतार्जनाची व लोप पावत चाललेल्या बंधुभावाची भावना रूजू करुन दिली. येशु, महंमद पैगंबर, श्री.दत्तगुरु, कन्फुशियस इत्यादीनी भूतलावर विविध स्थानी, कार्य करून ते कार्य पुनरुज्जीवित केले.

एकोणिसाव्या व विसाव्या शतकात संपूर्ण जगात,दोन महायुध्दानंतर, ठिकठिकाणच्या समाजात बरेच परिवर्तन होत गेले.जगातील कोणत्याच खंडात शांतीपूर्ण वातावरण राहिले नाही.विषेशतः अणूबाँम्बच्या स्फोटाने सारे जगच हादरले व तशातच चौफेर वैज्ञानिक प्रगतीमुळे सुखासिनता वाढत गेली.देव व धर्म याबद्दल अनास्था बळावत गेली.त्यामुळे जगात शांती नांदावयाची असेल व निसर्गातील समतोलपणा राखायचा असेल तर जागतिक स्तरावरच कांही उपाय-योजना करावी म्हणून,नियंत्याने,प.पू.साईनाथ महाराजांकरवी जगात निरंतर शांती नांदावी.यासाठी जे कार्य योजले त्यात ‘ईश्वरी प्रेरणा’ असल्याने, प.पू.साईनाथ महाराजांनी तेच कार्य उदीत केले.
यथावकाश ते कार्य वं.दादांच्या माध्यमातून पुनश्च प्रत्यक्षात सुरु केले.

अशी आहे या कार्याची परंपरा.


2.
कार्याची भूमिका.

वं.दादांनी पुनश्च कार्य सुरु केले ते “श्री.साई अध्यात्मिक समिती” च्या उभारणीतून.
कार्याची उभारणी करीत असता, त्यातील प्रमुख उद्देश म्हणजे ते कार्य निरंतर कार्यरत असावे
ते कार्य सिध्द-सिध्दांत पध्दतीवर म्हणजे शास्त्राóय पध्दतीवर आधारित असावे.
त्यात देश-प्रदेश, भाषा चालि-रीती, उच्च-नीच, अशिक्षीत-सुशिक्षीत, गरीब-श्रीमंत असा भेदभाव केलेला नसावा.ते कार्य आचरणात सोपे, साधे, अल्पखर्चिक, व सर्वसमावेशक अशी सेवा असलेले असावे.अशाप्रकारचे कार्य सिध्द झाले तरच ते कार्य हजारो वर्षे निरंतर अशा स्वरुपात कार्यरत राहिल, हा त्यामागील उदात्त उद्देश.
याकरिता “श्री.साई अध्यात्मिक समितीने” असे निक्षून सूचित केले आहे की,
१. या कार्याची स्थापना पूर्णत्वाने दैविक उपासना परंपरेतील आहे.मंत्रतंत्रविद्यांचा अभ्यास समितीस मान्य नाही.

२. ईश्वरी उपासनेतून मानवी जीवनाची सेवा ‘कर्तव्य’ म्हणून करावी असा येथील गुरुपदेश आहे.

३. या कार्याची सिध्दसिध्दांत पध्दत पूर्णत्वाने समितीच्या अभ्यासाची आहे.बाह्य संबंधीत नाही.

४. दु:खनिवारणार्थ होणा-या मार्गदर्शनाचा हेतू धर्माचरण, नित्य आचार-विचार, संस्कार, जन्मऋणानुबंधातील कर्तव्य यांचे पालन करणे हाच धर्म असा आहे.

५. हे कार्य दैविक उपासनेचा पाया असल्याने येणा-या प्रत्येक भक्त-भाविकास धर्माचरण स्वतः करण्यास मार्गदर्शन केले जाते.

 


3.
प्रत्यक्ष कार्य.

१. कार्यातील केंद्र बिंदू म्हणजे मनुष्य वा मानव.त्याचे दुख, अडचणी, पीडा, अपयश इत्यादींची कारणे संकलीत करून, त्यांची कारणे शोधून काढावी लागतात.नंतर त्या कारणांची शास्त्रीय मीमांसा तपासावे लागते.त्यातून दुखांचे वा दोषांचे निश्चितीकरण करावे लागते.एकदा दोष व त्यांची कारणे हे निश्चित केल्यावर, त्या दोषांचे पूर्णत्व अगर विमोचन कसे करता येते हे पहावे लागते.त्यासाठी विमोचने सिध्द करावी लागतात.सिध्द केलेल्या विमोचनाचे कार्य होत आहे किंवा नाही हे तपासावे लागते.असे करीत असताना, सूचित केलेली सेवा,मानवामे मनोभावे केल्यास, फरक निश्चित पडतो.त्यावेळी त्या मानवाचा देह शुध्द होत आहे, हे समजते.शुध्द झालेला देह, निरंतर शुध्द कसा ठेवता येईल, याबाबतची उपाययोजना निश्चित करावी लागते.तशी उपाययोजना मानवाला समजावून दिल्यानंतर मानव त्या योजनेनुसार सतर्क राहून ती योजना कार्यान्वित ठेवण्यासाठी, जी सेवा सूचित केली जाईल, ती नित्य-नियमाने करावी लागते.यासाठी एखादे ऊर्जा अगर शक्तिस्त्रा÷त निर्माण करून,ते मानवाला दिल्यास, मानव त्यातून नित्यनियमाने शक्ति प्राप्त करून घेऊ शकेल. आणि हे सर्व श्रध्दा व सबूरी असेल तरच, तो मानव निरंतर सुखी राहण्यास समर्थ होईल,
२. कार्य निंरंतर सक्रिय रहाणारच आहे.कारण कार्याच्या आखणीत मानवाच्या गर्भावस्थेपासून वार्धक्यापर्यंतच्या सर्व अवस्था लक्षात घेऊन त्या त्या वेळी कमतरता वाटल्यास, तेथेच त्या पूर्ण करण्यासाठी चार भागात विभागणी केली आहे ती अशी –
अ. प्रापंचिक जीवनातील अडचणी.
ब. शारीरिक व्याधी.
क. संवेदना.
ड. विद्यार्थ्यासाठी ज्ञान-संवेदना.
३. यानंतर आपण पाहणार आहोत, ते म्हणजे कार्य कशापध्दतीने सिध्द केले.
४. प्रापंचिक जीवनातील अडचणी व कमतरता.यात दोन भाग केले.
ते म्हणजे. १. अडचणी कशा येतात अगर कमतरता कशात असू शकते, हे तपासणे
२. अपूर्णत्व कशात असू शकते, हे तपासणे.
५. अडचण अगर कमतरता कशात असू शकते हे तपासल्यावर त्याची पुन्हा विभागणी चार प्रकारात केली आहे.
ती म्हणजे १. संतती.
२. संपत्ती.
३. विद्या
४. आरोग्य
६. यानंतर अपूर्णत्वाची कारणे व त्यांचे विवेचन करून उपाय योजना करावी लागते. अपूर्णत्व असते ते इच्छा-वासनांचे.मनुष्य जीवन जगत असताना तो इच्छा-वासनेनुसारच जगत असतो.जीवन कालावधीत सर्वच इच्छावासना पूर्ण होऊ शकत नाहीत.जगतात सुखासिनतेसाठी खुणावणा-या असंख्य गोष्टी विखूरलेल्या आहेत व असणारच. त्यांच्या प्रलोभनातून अलिप्त राहणे केवळ अशक्यच.म्हणून त्यातून इच्छावासनांची गुंतागुंत सुरू होते.
७. मानवाच्या जीवनाचा अभ्यास समितीने केल्यावर असे आढळले कीं, सध्याचे जीवन हे गतजन्माशी निगडीत असते.त्यासाठी जन्म-उत्पत्ती-मिमांसा व जीवन-उत्पत्ती-मीमांसा यांचा अभ्यास समितीने केला.त्यात असे आढळले कीं, दोष तीन पध्दतीच्या असतात.त्याला त्रिदोष असे म्हणतात.
१. वंशदोष
२. कर्मदोष
३. ऋणदोष
८. वंशदोष – (कारण माता-पिता) – हे दोष वंशातून प्रवाहित होत असतात.वंश म्हणजे माता-पिता व त्यांच्या पूर्वीच्या सात पिढ्यात धारण झालेले दोष पुढील पिढीत सतत प्रवाहित होत असतात.
९. कर्मदोष – (विचार-आचार-उच्चार) हा दोष मानवाच्या हातून जी कर्मे हरघडी होत असतात, त्यातील जी कर्मे पूर्ण होऊ शकली नाहीत त्यातून निर्माण होत असतात.कर्म घडण्यासाठी विचार, आचार, उच्चार हे प्रधान असतात.त्यातील एका घटकाचाही जर दुरुपयोग वा अयोग्य वापर झाल्याने पूर्णत्व पावू न शकल्याने असे दोष निर्माण होऊ शकतात.
१०. ऋणदोष –
यात पांच प्रकार असतात १. मातृ-पितृ ऋण
२. देवादिक
३. इतरेजन
४. जन्मकर्म
५. जन्मजन्मांतर.
११. ऋणदोष निर्माण होण्यास वर नमूद केलेले दोन्ही प्रकार (म्हणजे कर्मदोष व वंशदोष) कारणीभूत होऊ शकतात.फक्त जन्मकर्म म्हणजे गतजन्मांत अपूर्ण रहिलेली कर्मे, जी देहात असतात. ते देखील तीव्र इच्छावासनांचे अपूर्णत्वच.
१२. जन्मजन्मांतर म्हणजे गतजन्मापूर्वीच्या अनेक जन्मांतील अपूर्ण कर्मे अगर ऋणानुबंध.याचाच अर्थ या दोन्ही प्रकारात इच्छावासना हाच प्रमुख घटक असतो.त्या इच्छावासना किती तीव्र असतात व कसे दीर्घ परिणामी असतात, याचा विचार करावा.अशा इच्छावासनांच्या पूर्णत्वासाठी समितीने सूचविलेली जीवनपध्दती आचरणात आणल्यास अशा दोषातून, मनुष्य मुक्त होऊ शकतो.
१३. आता त्रिदोषांचे निवारण अगर पूर्णत्व, समितीने कसे केले ते पाहू.दोषांचे कारण निश्चित झाल्यावर,ती दूर करणे हे महत्वाचे. दोषांच्या कारणांची पूर्तता करण्यासाठी सुचविलेली उपचार पध्दती, म्हणजेच निराकरण पध्दती.
१४. सूचविलेल्या पध्दतीप्रमाणे कार्य होते किंवा नाही हे तपासणे म्हणजे निवारण पध्दती.त्रिदोषांचे पूर्णत्व वा विमोचन करणे देवांनाही असाध्य आहे.फक्त गुरुच असे कार्य, ईश्वरी प्रेरणेने करू शकतात.
१५. वरील सिध्दता केली, ती तीन विविध पंथातील संत-विभूतींच्या मार्गदर्शन व सहाय्याने.अन्यथा हे कार्य सिध्द होणे केवळ अशक्यच.
१६. ‘कारण’ सूचित करतात तो दत्तपंथ
१७. ‘निराकरण’ सूचवितात तो नाथपथ
१८. ‘निवारण’ करतो सुफीपंथ
१९. वंशदोषाचे पूर्णत्वासाठी सिध्द केले ते – वंशविमोचन
२०. ऋणदोषाचे पूर्णत्वासाठी सिध्द केले ते – ऋणमोचन
२१. कर्मदोषाचे पूर्णत्वासाठी सिध्द केले ते – कर्मविमोचन
२२. या सर्वासाठी कामकाजात सांगितले जाते ती साधी-सोपी दैनंदिन सेवा.त्या सेवेच्या अंतर्गत असते ती वरील सर्व सिध्दसिध्दांत पध्दत,जी मानवाच्या कल्याणार्थ संत-विभूतीनी, वंदनीय दादांच्या सिध्दसिध्दांत पध्दतीच्या कार्य पूर्ततेनंतर आशिर्वादार्थ दिली आहे.
२३. साध्य केलेले सर्व कांही, वंदनीय दादांनी, जगद्गुरु चरणी, “गुरुदक्षिणा” म्हणून समर्पण केली.

 

 

.वं.दादांचे जीवन

वं.दादांचे प्रापंचिक जीवन

सातारा हे, स्वातंत्र्यपूर्व काळातील, एक छोटसे संस्थान.तेथे श्री.भास्करराव नारायणराव भागवत राहत होते.श्री.भास्करराव हे दत्तभक्त होते.त्यांचा प्रवासी मोटार-वाहतुकीचा व्यवसाय होता.तो चांगल्याप्रकारे चालत होता.घरात वैभव नांदत होते.श्री.भास्करराव हे विधूर होते.त्यांचा सत्संग सतत असल्याने ते एका सत्पुरुषाकडे गेले असताना त्या सत्पुरुषाने त्यांना सांगितले कीं, “तू लग्न कर.तुला पहिला मुलगा होईल. त्याचे नांव “दत्तात्रय” ठेव.तो जगाचे कल्याण करणारा होईल”.

त्याप्रमाणे त्यांनी विवाह केला.त्याना पहिला मुलगा झाला.त्याचे नांव गुरु आज्ञेप्रमाणे “दत्तात्रय” ठेवले.तेच वं.दादा! वं.दादांचा जन्म दिनांक 6.2.1921 (पौष अमावस्या शके 1842) रोजी झाला.त्यांची आई, सौ.मनोरमाबाई, ह्या सोज्वळ व धार्मिक वृत्तीच्या होत्या.माता-पिता दोघेही धार्मिक व सत्शील असल्याने वं.दादांवर योग्य ते सुसंस्कार बालपणापासूनच झाले.शाळेत ते एक हुषार विद्यार्थी होते.

वं.दादांच्या वडिलानी, वं.दादांना, एका मोहरमात फकीर केले.त्यावेळी ते तीन वर्षाचे होते.पुढे ही प्रथा बरेच वर्षे चालली.

एकदा त्यांच्या वडिलांना एक सत्पुरुष (प.पू.तेली महाराज) रस्त्यात भेटले.त्यांनी वडिलांना सांगितले “मला जेवू घालीत जा.पण ते तुझ्या मोठ्या मुलाकडून पाहिजे,नाहीतर नको.”त्याप्रमाणे, वं.दादा दररोज शाळेत जाण्यापूर्वी जेवणाचा डबा, प.पू.तेली महाराजांना नेऊन देत.

वं.दादांच्या वडिलांना,एकदा स्वप्नात श्री.भैरवनाथांचा दृष्टांत झाला.श्री.भैरवनाथांनी त्यांना सांगितले कीं, “मी अंधारात आहे.मला प्रकाशात येण्याची इच्छा आहे.”त्याचा तात्विक अर्थ लक्षात घेऊन वडिलांनी, वं.दादांना श्री भैरवनाथाच्या मंदिरात नेले.तेथे पणती लावून सांगितले कीं,रोज सायंकाळी या मंदिरात येऊन दिवा लावत जा.त्याप्रमाणे ही सेवा देखील वं.दादांनी सुरु केली.

अशा प्रकारे प.पू.तेली महाराजांची व श्री.भैरवनाथांची सेवा करीत असताना वं.दादांना शाळेत जाण्यास उशीर होत असे.तसेच दोन्ही सेवा करण्यात वेळ जात असल्याने, वं.दादांना, अभ्यास करावयाला वेळ मिळत नसे.तथापि अभ्यास करण्याचा प्रयत्न चालू होता.तरीही अभ्यास होऊ न शकल्याने व्हायचा तोच परिणाम झाला आणि वं.दादा परीक्षेत नापास झाले.अपयशामुळे वं.दादांना खूप वाईट वाटले.या सर्व घटनांमुळे वं.दादानी शाळेला “श्री” म्हटल्याने त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही.

शालेय शिक्षण नाही.घरात तेच वडील होते.कांही कारणानी घरची परिस्थिती बिकट होत होती.पुढे काय करावे हे समजत नसल्याने वं.दादांनी घरातील सर्व परिस्थितीचा विचार केला आणि सातारा सोडून ते पुण्यास नोकरी शोधण्यासाठी आले.त्यावेळी दुसरे महायुध्द चालू होते.मिलिटरीत भरती होण्याचा निर्णय घेऊन ते मिलिटरीत भरती झाले.त्यांना मोटार दुरुस्तीचे थोडेसे ज्ञान असल्याने मोटार दुरुस्तीच्या विभागात त्यांची नेमणूक झाली.त्यात रँक देखील मिळाली.

वं.दादांचे माम। मेजर सदुभाऊ गुणे मिलिटरीत होते.त्यांचा, “ज्ञानेश्वरी”चा अभ्यास गाढा होता.तेही सत्शील व धार्मिक हाते.त्याच्या घरातील वातावरण पूर्णतः अध्यात्मिक मार्गातील होते.त्यांच्यावर देखील बालपणापासूनच सुसंस्कार झाले होते.अशा मामांचे सानिध्य व मार्गदर्शनही मिळाले.

मिलिटरीतील नोकरी असल्याने बाहेर देशात जावे लागले.त्यामुळे वं.दादांना बगदाद व करबला येथील पवित्र स्थाने पहावयास मिळाली.या कालावधीत देशाबाहेर नोकरीत असताना देखील श्री.भैरवनाथांनी सुचविलेली सेवा चालूच होती.मिलीटरीतील सेवा सोडल्यावर वं.दादांनी पुण्यात दुसरी नोकरी शोधली.

दरम्यानच्या काळात, त्यांचा विवाह झाला.त्यांना सुविद्य पत्नी सौ.सिंधुताई लाभल्या.एक मुलगा व दोन मुली झाल्या.त्या सर्वांचे शिक्षण केले तसेच यथायोग्य वेळी त्यांचे विवाहही पार पाडले, या व्यतिरीक्त त्यांच्या भावंडांचीही लग्ने पार पाडली.इतकेच नव्हे तर इतरांची लग्नेही लावून दिली.शिक्षणासाठी अनेकांना तर मदत केलीच पण त्यांच्या मूळ गावी, म्हणजे धावडशी येथील, श्री.ब्रम्हेंद्र स्वामी यांच्या शिक्षण संस्थेस घवघवीत आर्थिक मदत देऊन धावडशीतील मुलांच्या शालेय शिक्षणाचा मार्ग सुकर केला.

वं.दादांना प्रापंचिक जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.तरीही न डगमगता सर्व प्रकारची प्रापंचिक व व्यावहारिक कर्तव्ये उत्तमरीतीने पार पाडली.प्रापंचिक कर्तव्ये यथोचितरित्या पार पाडणे, हे प्राथमिक कर्तव्यच आहे याचे सदैव भान ठेवले.कर्तव्ये पार पाडीत असताना, जीवनात अनेक चढउतार अनुभवले.घटना घडत होत्या.कार्यकारणभावाची प्रचिती येत गेल्याने, त्यांचा ईश्वराबद्दलचा विश्वास, श्रध्दा, भक्ती दृढ झाली.अशा प्रकारे, प्रापंचिक जीवन परिपूर्णतेने जगत असताना, पारमार्थिक जीवनाची ओळख होत गेल्याने ते वाटचाल देखील चालू होती

प्रपंच व परमार्थ, ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करीत राहून इष्ट उद्दिष्ट साधता येते, हे प्रत्यक्ष प्रामाण्य म्हणून, दाखवून दिले आहे.हा एक मोठा आदर्शच वंदनीय दादांनी मानवाला घालून दिला आहे.

वं.दादांचे पारमार्थिक जीवन

वं.दादांचे पारमार्थिक जीवन, बालपणापासूनच, नकळत घडत गेले.विविध प्रकारच्या अनेक घटना घडत होत्या.त्यामागील कारणे ज्ञात होत नव्हती.तथापि एक गोष्ट निश्चित होती ती म्हणजे, जीवनातील प्रसंगाना, घटनांना सामोरे जात असताना त्यांच्यावर बालपणात झालेले सुसंस्कार, विश्वास, श्रध्दा व भक्ती यांचाच उपयोग झाला.ब-याच घटनांचा अगर उपदेशांचा अर्थ त्यावेळी कळत नसायचा.तथापि आज्ञा पालन करणे या संस्कारातूनच, त्या घटनांचे अर्थ यथावकाश कळू लागले.उपदेशातील ज्ञान प्राप्त होत गेले, परमार्थ कळू लागला.पुढे साधक अवस्थेत अत्यंत गरजेचे असलेले, निश्चलता व निर्धार हे गुण, निसर्गदत्त असल्यामुळे, परमार्थात प्रगती होत गेली.एवढेच नव्हे तर अध्यात्मिक जीवनात करावयाची प्रखर व दीर्घ साधना पूर्णपणे सफल होऊन, अंगिकारलेले सर्व संकल्प सिध्दही होऊ शकले, साध्यही झाले.

पारमार्थिक किंवा अध्यात्मिक मार्गात स्वतःसाठी वा वैयक्तिक, कांहीच मागितले नाही.जे कांही मागितले आणि प्राप्त केले, ते फक्त लोक-कल्याणासाठीच!म्हणजेच परमार्थाची पायरी पार करून, “लोक-कल्याणार्थ” संपूर्ण जीवन व्यतीत केले.याचाच अर्थ अध्यात्मिक जीवनातील अंतीम उद्दीष्ट गाठले.त्याही पुढे जावून जे काही प्राप्त केले, ते सर्व गुरु चरणी “गुरुदक्षिणा” म्हणून समर्पण करून, श्री.सद्गुरुंना “ जगद्गुरू “ स्थानी नेले.जे काही केले ते “मी” केले असा कधीही उच्चार देखील केला नाही.त्यापुढे जाऊन अध्यात्मिक ठेवा जो प्राप्त केला त्यातील लवलेशही स्वतःसाठी न ठेवता तो सर्व मानवाच्या कल्याणासाठी सद्गुरुचरणी अर्पण केला.

वं.दादांचे स्वतःच्या जीवनाबद्दलचे उद्गार –

माझे जीवन म्हणजे काय? ते कसे होते? याचा बोध झाला तर भवितव्यात हे जीवन प्रत्येकाला उपयोगी पडेल

हे उद्गार केवळ सार्थ नव्हे तर सकल मानवांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत.

मेजर सदुभाऊ गुणे वं.दादांचे मामा

मेजर सदुभाऊ गुणे, हे वं.दादांचे मामा.ते भिलवडी येथे रहात होते.तेथे त्याचे घर व मळा होता.त्या म•यातील विहिरीवर ज्याला ते कांचनकट्टा म्हणत असत, तेथे बसून वं.दादा मामांशी विचारविनिमय करत असत.मेजर गुणे यांचा मूळ पिंड धार्मिकवृत्तीचा असल्याने त्यांचे व कौटुंबियांचे, घरातील आचरण सत्शील होते.त्यांनी नित्य नेमाने गीतापठण पन्नास वर्षे केले असल्याने गीतेवर त्यांची गाढ श्रध्दा असल्याने त्यांचे गीतेवर प्रभुत्वही होते.त्याना विविध भाषा होत्या.मामांचे उर्दूभाषेवर प्रभूत्व असल्याचे प.पू.हाजी मलंग बाबानी, वं.दादा औदुंबर येथील सेवेत असताना सांगणे यातच, मामांना गौरवले हे स्पष्ट दिसते.
एकदा मामांनी वं.दादांना भक्त-भाविकांच्या पारमार्थिक प्रगतीसाठी परमार्थ-प्रश्नावली लिहून दिली.ती भक्त-भाविकांना अत्यंत उपयुक्त असल्याने, वं.दादानी तीचा समवेश “साधन-पत्रिकेत” केला.तसा उल्लेखही पत्रिकेत केला आहे.
.      परकाया प्रवेश
वं.दादा, प.पू. बाबांच्या आज्ञेनुसार औदुंबर येथे सेवेत असताना प.पू.हाजी मलंग बाबांचे आगमन, मामांच्या घरी झाले.त्यावेळी त्यानी ‘परकाया प्रवेश’ या विषयाबद्दलचे ज्ञान उर्दूभाषेतून केले. त्याचा अर्थ मामांनी अनुवादीत करून वं.दादांना समजावून दिला.मामांची अध्यात्मिक मार्गातील प्रगती चांगली असल्यानेच हे महत्वाचे काम ते करू शकले.
.      परलोक
औदुंबर येथील वास्तव्यात परलोक मार्गाची ओळख झाल्यावर तो विषय किती खोल आहे हे समजले.या विषयाची सखोल माहिती मिळविण्याच्या उद्देशाने ते मामांच्या घरी असताना, मामांशी चर्चा केली. त्यावेळी मामा म्हणाले–
·        असा विषय जर तुम्ही सिध्द केलात तर भवितव्यात असंख्य लोकांना त्याचा लाभ होऊन, इहलोकात परलोकांत ज्या आत्म्यांचे वास्तव्य असते, अशांना मुक्ती सद्गती प्राप्त होऊ शकेल.कारण कुटुंबातील व्यक्तींना, आत्म्याची मरणोत्तर जीवनामध्ये काय इच्छावासना आहे, हे समजल्यामुळे, त्या आत्म्याची पीडा कुटुंबाला होत असते.अशावेळी नुसती पीडा आहे, तिचे क्षालन होऊन चालणार नाही.नुसता कर्माचा होणारा त्रास, निवारण करणे हे ठीक नसून, जो आत्मा आपल्या कृतकर्मामुळे पीडित झाला आहे, ती पीडा बाजूला केली पाहिजे. आत्म्यालाही सद्गती प्राप्त व्हावयास पाहिजे.यासाठी मरणोत्तर जीवन हेजीवनअसून, त्या जीवनात काय काय अंतर्भूत झाले आहे, ह्याचा नुसता विचार करून चालणार नाही.जो आत्मा पिशाच्च योनीमध्ये वावरत आहे, अशाशी संपर्क साधल्याशिवाय, त्याची इच्छा काय आहे हे अनुमानाने सांगून चालणार नाही,” हे मामांचे म्हणणे बरोबर होते.जे दृष्य मी औदुंबरला पाहिले, त्याप्रमाणे दिवंगत आत्म्याचा त्रास होऊ नये, म्हणून दानधर्म करणारे अनेक लोक असतील, ज्याना होणारा त्रास हो कशामुळे आहे, हे निश्चित समजत नाही, त्या व्यक्तींना आपल्या घराण्यातील दिवंगत व्यक्तीना मुक्त करण्याचे कर्तव्य करावयाचे आहे, हे जर समजले तर नःसंकोच हा विधी तीर्थक्षेत्री करतील, पण होणारा त्रास समजत असूनही, आज कांही एक करता येत नाही.ज्या परलोकवासी झालेल्या व्यक्तींच्या पीडा आपणास होतात, त्यासाठी शास्त्रात त्रिस्थळी यात्रा, दानधर्म, अन्नदान, वस्त्रदान आदी विधी, याशिवाय नागबली, नारायण नागबली आदी विधी सांगितले असून, ह्या विधीमाध्यमातून अंशमात्र सुटका होते.जो आत्मा वासनावलयामध्ये बध्द झालेला आहे, त्याची मुक्तता ह्या विधीनी होते.परंतु वासनावलय म्हणजे कर्म, हे शिल्लक राहून, त्याचे अस्तित्व कुटुंबाशी संबंधीत राहते. पीडा शिल्क राहते.आत्म्याची मुक्तता ह्या विधीनी होऊ शकेल, पण आत्म्याचे जे कर्म अपायकारक म्हणून शिल्लक राहिलेले असते, ते कर्म कुटुंबातील इतर व्यक्तीना भोगावे लागते, त्या कर्माचाही क्षय व्हावयास पाहिजे.”असा थोर विचार करून, आपण आपले साधन सिध्द करा.” असे माझ्या मामांनी सांगितले.
वरील विवेचनावरून मामांचा इहलोक व परलोकाचा अभ्यास किती सखोल होता हे स्पष्ट दिसते.
औदुंबर येथील वास्तव्याची सेवा पूर्णत्वास आल्यावर, मामांचा निरोप वं.दादांना आला की, मला येऊन भेटून जा.त्याप्रमाणे वं.दादा मामांच्या घरी गेल्यावर दुपारी जेवणानंतर विहिरीवरील कांचनकट्ट्यावर मामांच्या सोबत बसले.त्यावेळी मामांनी अचानक असा उच्चार केला की,
।। यदा यदा ही धर्मस्य, ग्लार्निभवती भारत ।।

      त्यांची अशी वाणी वं.दादानी प्रथमतःच ऐकली कारण ते जवळ जवळ 50 वर्षे गीता म्हणत होते पण या वेळी त्यांचा उच्चार ऐकून वं. दादांची मती गूंग झाली.अर्धा तासपर्यंत वं.दादा मामा स्तब्ध बसले.शेवटी मामा ऊठून म्हणाले

   दादा आपली इच्छा असते वेगळी, ईश्वराची असते वेगळी.आता मी जे कांही म्हणालो, त्याची मला आठवण ही नव्हती.तुम्हाला सांगावयाचे वेगळे होते, पण झाले दुसरेच.मला जे स्वप्न गेल्या आठवड्यात पडले ते तुम्हाला सांगावयाचे होते, ते असे कीं, पहाटे माझ्या स्वप्नात श्रीकृष्ण आले म्हणाले, “ईश्वराचे कार्य आहे, त्या कार्यास कुणीतरी मध्यस्थ लागतो.हा मध्यस्थ म्हणजे ईश्वर नसून, तो ईश्वराचा संदेश घेऊन येतो.ह्यावर पूर्ण श्रध्दा ठेवली तरच ह्या जगाचा उध्दार होईल.जरसंदेहनिर्माण झाला तर जग बुडाले मी जागा झालो.गेले चार दिवस, हा संदेश माझ्या कानाशी सारखा गुणगुणतो आहे.म्हणून तुम्हाला बोलावणे पाठविले.”मग मी त्याना गेल्या आठवडाभर माझी काय अवस्था झाली होती ते सांगितले.म्हणजे दोघानाही ईश्वराचा आदेश झाला, ही गोष्ट सत्य आहे.

वरिल विवेचनावरून मामांनी देखिल अध्यात्मिक मार्गातील किती उच्च अवस्था प्राप्त केली होती हे समजते.तसेच वं.दादा व त्यांचे मामा यांचे ऋणानुबंध जरी नाते संबंधातून जुळले होते तरी आत्मिक ओढ ही अनेक जन्मांचीच होती.ती ओढ “श्री.साई अध्यात्मिक समिती”च्या कार्याशी युक्त होती.

वं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील काही ठळक घटनाबद्दल खुलासा

. फकिरी.

वं.दादांना वयाच्या तिस-या वर्षी, त्यांच्या वडिलांनी मोहरमात फकीर केले.फकीर करणे ही इस्लाम धर्मातील एक दीक्षाच आहे.फकीर केले ही एक साधी घटना वाटत असली तरी फकीर करण्याचा संबंध जीवनाशी व कार्याशी काय संबंध आहे हे कळण्यास वं.दादांना अनेक तपे घालवावी लागली.भवितव्यात मार्गदर्शन व सहकार्य करणा-यां विभूतींची ती अप्रत्यक्ष ओळख होती.

· फकीर याचा अर्थ जे जगाची ‘फिक्र’ म्हणजेच काळजी निरंतर वहात असतात, ते फकीर!विभूती म्हणजे ज्यांनी गतकालात लोक-कल्याणार्थ देह धारण केला होता व देह ठेवल्यानंतर त्यांनी लोक-कल्याणार्थ प्राप्त केलेली शक्ती ही भुतलावरच मानवाच्या निरंतर कल्याणाचे कार्य करण्यासाठी स्थित केलेली असते, ते विभूती.

· अशा विभूती, की ज्यांनी वं.दादांच्या कार्यात मार्गदर्शन व सहकार्य केले त्या म्हणजे,

१. प.पू.हाजी मलंग बाबा. – कल्याण.

२. प.पू.मोईनुद्दिन चिस्ती. – अजमेर.

३. प.पू.सलिम चिस्ती – फत्तेपुर

४. प.पू.महम्मद जिलानी – बगदाद.

५. प.पू.ख्वाजा बंदे नवाज, गुलबर्गा.

६. प.पू.कुतबुद्दीन बाबा, दिल्ली.

· निरंतर कार्यरत असणाऱया विभूतींनी विमोचने, दीक्षा, शक्तिपीठ, प्रतिमा इत्यादीबाबत शास्त्रिय व सिध्द-सिध्दांत पध्दतीवर आधारित मार्गदर्शन केले तसेच भवितव्यात ती सर्व साधने अखंडीतपणे कार्यरत राहतीलच, अशाप्रकारचे कार्य करून घेऊन विभूतीनी मानवाला उपकृत केले आहे.

· संतानी मार्गदर्शन व सहकार्य केले ते असाध्य अशा ॐकार साधनेत, शक्तिपीठ स्थापनेत, आरती साधनेत, प्रतिमा सिध्दतेत व प्रज्ञावस्था प्रदान करण्यात!

. .पू.तेली महाराज.

· आपण संत-विभूतींचे दर्शन घेत असतो, त्यांचे आशीवार्द प्राप्त करून घेण्यासाठी कांही सूचित सेवा करीत असतो.पण त्या विभूतींत असणारी अलौकिक शक्ति वा देवत्व आपणास क्वचितच समजू शकते.सातारा गावातही प.पू.तेली महाराज हे एक सत्पुरुष रहात होते.दिसण्यात ते सामान्यच दिसत असत पण प्रत्यक्षात ते एक असामान्य व्यक्तीमत्व होते.त्यांनी वं.दादांच्या जीवनाला नियंत्याच्या नियोजनानुसार आकार देण्याचे महत्वाचे कार्य यशस्वीपणे केले.यातच प.पू.तेली महाराजांत सामावलेल्या दिव्यत्वाची कल्पना यावी.

· ते त्रिकाल ज्ञानी होते.त्यांच्या शब्दांना दोन वेगळे अर्थ असत.एक तात्विक व दुसरा व्यावहारिक.

· तेली महाराजानी (त्यांच्या शैलीत) केलेल्या मार्गदर्शनामुळेच वं.दादाची पुढील वाटचाल सुकर झाली.सामान्य दिसणा-या व्यक्तित कशा प्रकारची अलौकिक शक्ति दडलेली असते, हे सहजासहजी आकलन होत नाही.महाराजांच्या शब्दांचा अर्थ कळण्यास वं.दादांना प्रखर साधना अनेक तपे करावी लागली.यातच महराजांची महती किती व कशी होती हे समजून घ्यावे.

3. . पू तेली महाराजांची शैली

शैली म्हणजे खास असे एक वेगळेपण.असे वेगळेपण प.पू.तेली महाराजांच्या प्रत्येक शब्दात, वाक्यात, कृतीत वारंवार दिसत असे.त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, कृतीत, वरवर जरी सामान्य अर्थ आहे असे वाटत असले तरी त्यातील गर्भीत अर्थ किंवा परम-अर्थ वेगळेच असत.

उदाहरणार्थ :–

१. “मला जेवू घालीत जा”

यात त्यांच्या भुकेच्या शमनार्थ अन्न हवे आहे, असा अर्थ नव्हता.वं.दादांनी रोज नेऊन दिलेल्या डब्यातील अन्न महाराजांनी कधीच सेवन केले नाही.ते अन्न तसेच ठेवीत असत.

· त्याचा खुलासा, प.पू.तेली महाराजानी, वं.दादांना निर्वाणाच्या दिवशी बोलावून केला.त्याना सांगितले कीं, जमा झालेले सर्व अन्न मोठ्या परातीत एकत्र कर.पुढे सांगितले “हे अन्न नसून ज्ञान आहे ते सर्व जगाला वाट”.

· यातील गर्भीत अर्थ म्हणजे, “शिळे अन्न म्हणजे गत जन्मातील ज्ञान असा आहे.तसेच ताजे अन्न म्हणजे इह जन्माचे ज्ञान”.असे इह जन्माचे व गतजन्माचे ज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचव व त्यांना ज्ञानी कर.अशी आज्ञावजा सूचना केली.असा परम-अर्थ त्यांच्या शब्दात आहे.

२. शिक्षणाबद्दल सांगताना प.पू.तेली महाराजानी वं.दादांचे केस धरुन गदागदा हलवून म्हटले :-

·३. “प्रकाश लाव” असे जे प.पू.भैरवनाथांनी सांगितले त्यातील गर्भित अर्थ समजावून घेण्यास, महाराजानी सूचविले.

· त्यातील गर्भीत अर्थ म्हणजे श्री भैरवनाथानी जो ॐ कार वं.दादांना शिकविला, तो ॐ कार पुढे सर्व जगाला तारणारा आहे, त्याचे ज्ञान व जाण करून देण्याचे कार्य करावयाचे आहे, हे लक्षात घे, असे सुचविले.श्री.भैरवनाथांना प्रकाशात यायचे नव्हते.ते स्वयं ॐ कार होते.त्यानी शिकविलेला ॐ कार जगापुढे ठेवण्याचे व त्यातील ज्ञान व ॐ काराचे मानवी जीवनातील कार्य समजावून देण्याचे कार्य तुला करावयाचे आहे, हे त्यातून सुचविले. .

· प.पू.तेली महाराजांची भाषा जरी मराठी असली तरी त्यांचे बोलणे वा त्यातील गर्भीत अर्थ सहजासहजी समजत नसे.त्यातून ते वं.दादांशी बोलताना अश्लिल शिवी देऊनच बोलायचे.बोलण्याची सुरुवात शिवीनेच होत असे.ती शिवी म्हणजे “तुझ्या आईची चूत”.असे बोलणे ऐकून वं.दादां अस्वस्थ होत असत.पण आज्ञापालन व महाराजांवरील श्रध्दा यामुळे महाराजांच्या सेवेत खंड पडू दिला नाही.तथापी महाराज अशी अर्वाच्य भाषा कां वापरतात याचे गूढ मात्र त्याना होतेच.

· वं.दादां,आज्ञेप्रमाणे नरसोबाची वाडी येथे विमोचनांच्या पूर्ततेसाठी ‘महारूद्र स्वाहाकार’ करण्यास आले असताना, वेद-शास्त्र-संपन्न गुरुजी व इतर विद्वान ब्राम्हणाकडून हवनासाठी लागणारी वेदी तयार करीत असता, वेदी अशीच कां असावी, याचे शास्त्र समजावून देत होते.त्यावेळी वेदीचा आकार हा स्त्राóच्या योनी सारखा कां असतो, याचे विवेचन केले.वेदीत मंत्रांनी सिध्द केलेली हर्वीद्रव्यांची पूर्णाहुती द्यावयाची असते.ते स्थान शुध्द असते.हवनानंतर भस्म झालेली द्रव्ये, सिध्द केलेल्या मंत्रोच्चाराने, शुध्द व तेज तत्वामुळे प्रखर झाल्याने त्यात प्रचंड शक्ति सामावलेली असते.वेदीच्या आकृतीत सामावलेले तत्व वेदीच्या आकाराकडे पहाता क्षणीच, प.पू.तेली महाराज उच्चारीत असलेल्या शिवीची आठवण झाली व त्यातील शब्दांचा परम अर्थ वं.दादांना पूर्णपणे उमगला.अशा प्रकारे व.दादांना तेली महारांजाच्या शिवीतील गर्भित अर्थाची उकल होण्यासाठी अनेक तपे वाट पाहावी लागली.

· वं.दादांनी लोककल्याणाचे कार्य पूर्ण केले.पुढील अवस्था भक्तभाविकाना प्राप्त व्हावी म्हणून, प.पू.बाबांनी भक्त-भाविकांना प्रज्ञा अवस्था एका गोपालकाल्या दिवशी प्राप्त करून दिली.त्यादिवशी प.पू.तेली महाराजानी स्वतः उपस्थित राहून वं.दादांनी नियंत्याच्या नियोजनानुसार कार्य संपन्न केल्याबद्दलचे समाधान व्यक्त केले व म्हणाले ‘यापुढे ताजे अन्न खावयास मिळेल’.

· याचा अर्थ म्हणजे मानवाला इहलोक व परलोक या दोन्ही लोकांतील ज्ञान प्राप्त होऊन जीवन जगण्याचा मार्ग सुकर करून दिला आहेस, याबद्दल समाधान व्यक्त केले.

अशी असते संतवाणी.

४. श्री.भैरवनाथ.

· सातारा गावात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत पण श्री.भैरवनाथांचे मंदिर गावाबाहेर व डोंगरावर आहे.मंदिर छोटेसेच, मूर्ती पाषाणाची आणि फारशी कोरीव नसलेली.पंचमुखी शेष म्हणजे पंचफणी शेष असे श्री.भैरवनाथांचे ते ‘स्वयंभू’ मंदिर आहे.तसेच ते स्थान ‘जागृत’ देखिल आहे.त्याची प्रचीति अनेक घटनातून स्पष्ट होत गेली.

· श्री.भैरवनाथांच्या सेवेतूनच वं.दादांना भास, सत्य आणि दृष्टांत यातील अर्थ उमगल्याने ईश्वरावरची श्रध्दा दृढ झाली.अशाप्रकारे वं.दादांच्या जीवनातील नियंत्याच्या नियोजित कार्याचा आरंभ श्री.भैरवनाथांनी करून दिला.

५. गुराख्यामार्फ त ईश्वरी संकेत

· पूर्वीच्या काळी घरोघरी पशुधन असे.त्यांच्या देखरेखीसाठी गुराखी असत.असाच एक गुराखी, वं.दादा श्री.भैरवनाथांची सेवा करीत असतां, वं.दादांना म्हणाला कीं, जवळच जिवंत पाण्याचा झरा आहे.त्या पाण्याने स्नान करून सेवा केल्यास काय फरक जाणवतो ते पहा.त्याप्रमाणे स्नान करून सेवा केल्यावर पणतीच्या प्रकाशात खरोखरीच फरक जाणवला, प्रकाशातील वेगळेपण अनुभवले.त्यातून उमगले कीं, सामान्य गुराखी देखील ईश्वरी संकेत प्रवाहित करण्याचे एक माध्यम असू शकतो व ईश्वरी संकेत प्रवाहित करण्यासाठी माध्यमाची गरज असते.

६. निसर्गतत्वाकडून ‘ॐकार’दीक्षा

· एके दिवशी वं.दादा श्री.भैरवनाथांची सेवा करण्यासाठी डोंगर चढत असताना, शिट्टीचा आवाज त्याना ऐकू आला जवळ जावून पहातात, तर प्रत्यक्ष श्री.शेष, श्री.भैरवनाथाच्या मूर्ते जवळच असलेले दिसले नंतर, याचा खुलासा करताना वडीलानी सांगितले कीं, त्या नादाला ‘सिंहनाद’ असे म्हणतात.असा नाद ईश्वर जेंव्हा प्रसन्न होतो तेंव्हाच निर्माण होतो.पुढे याचा संबंध ॐकार साधनेशी आल्यावर त्याची महती वं.दादांना पटली.कोणा देहधारी व्यक्तिकडून प्राप्त न होता, प्रत्यक्ष निसर्ग तत्वातून प्राप्त झालेली, उच्चतम व दुष्प्राप्य अशी ती एकमेव दीक्षाच होती.

७. श्री.भैरवनाथांच्या सेवेचे पूर्णत्व

· प.पू.तेली महाराज व श्री.भैरवनाथ यांच्या सेवेतून शिक्षण, ज्ञान, भास व दृष्टांत याबाबतचा खुलासा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे प्राप्त झाल्यावर वं.दादांच्या आज्ञा-पालन व दृढ श्रध्देतून सेवला एक निश्चित दिशा प्राप्त झाली आहे व विचारात व आचारात निश्चलता आली आहे असे पाहून श्री.भैरवनाथांनी वं.दांदाना विचारले कीं, प.पू.साईबाबांचे नांव ऐकले आहेस काय? त्यावर ‘होय’ असे म्हणताच, श्री.भैरवनाथानी आज्ञा केली कीं, यापुढे प.पू.बाबांचे मार्गदर्शन घ्यावे व त्यांच्या आज्ञेचे पालन करावे.भवितव्यात प.पू.बाबाच जगाला तारणार आहेत.त्याप्रमाणे वं.दादानी प.पू.साईबाबांची सेवा सुरु करून जीवनातील निंयंत्याच्या नियोजित कार्याचा आरंभ केला.

८. संचार – श्री.बहुचराईदेवीचा कार्यार्थ आशीर्वाद व सहकार्य.

· वं.दादा मुंबईला कामकाजासाठी गेले असताना, त्यांची खोली साफ करणा-या देवीभक्त मुक्या मुलाकडून ग्रामदैवत कसे कार्यरत असते हे समजले.देवदेवता गावातील भक्ताना, योग्य माध्यमाद्वारे मार्गदर्शन करीत असतात.माध्यमांच्या कुटुंबियांचा चरितार्थ भक्तभाविक, मान देऊन, मनोभावे चालवित असतात.महत्वाचे म्हणजे ग्रामदेवताकडून होणारे गावाचे रक्षण हे होय.देवीभक्त मुलाची वाचा देवीनेच बंद केली होती कारण तो मुलगा पूर्वी मार्गदर्शन करून सेवा करीत असे.त्यातून भक्तांना मार्गदर्शन व देवदेवता गावाचे रक्षणाचे कार्य करीत होते.असे कार्य बंद करून तो मुलगा घनप्राप्तीसाठी गाव सोडून शहरात आला होता.म्हणून देवीने सूचित केले कीं, त्यानी परत सेवा सुरु करावी.त्याप्रमाणे मुलानी सेवा सुरु केली. यथावकाश देवीने त्या मुलाकडून निरोप पाठविला कीं, देवीला प.पू बाबांकडून ती करीत असलेल्या गावाक-यांच्या सेवेतून, तिला सोडवणूक हवी आहे.त्याप्रमाणे सोडवणूक मिळाल्यावर, देवीने वं दादांना सांगितले कीं, तुझ्या कार्यात, तुला हवे असल्यास सहकार्य करावयास तयार आहे.वं.दादांनी होय म्हणताच देवीनी आशीर्वाद दिला.त्यावेळी वं.दादांना संचार होत असल्याची जाणीव झाली.

· पुढे वं.दादांनी श्री बहुचराई देवीचा टाक करून नित्य पूजनात ठेवला.तो टाक आजही पूजनात आहे.

· वरील विवेचनातून हे स्पष्ट होते कीं, आजही ग्रामदैवत कार्यरत आहेत.त्यांच्या कार्य प्रणालीतील प्रखरता प्रत्यक्ष पहिली.सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता, देवदेवता लोक-कल्याणाच्या कार्यात सहभागी होण्यास उत्सुक आहेत्। हे दिसले.याचा उपयोग शक्तिपीठ स्थापनेच्या वेळी झाला.म्हणजेच ईश्वरी-संकेतातून उभे राहणा-या कार्यात सहभाग कसा न कळत होत असतो, हे ह्यातुन स्पष्ट होते.

 

.नियंत्याचे नियोजन

नियंत्याच्या नियोजनातील विविध सूत्रापैकी एक महत्वाचे सूत्र, भगवान श्रीकृष्णानी गीतेत, त्रिकालसत्य म्हणून घोषित करून ठेवले आहे.ते सूत्र म्हणजे-

।। यदा यदाही धर्मस्य, ग्लानिर्भवती भारत ।।

हे सूत्र सर्व परिचित आहे.पण परिचित नाही तो “धर्म”!सध्या रूढ व परिचित असलेला धर्म म्हणजे जात अगर पंथ असा अर्थ नसून, धर्म म्हणजे मानवाचे नित्याचरण.त्यात मानवाचे दैनंदिन जीवनातील आचार, विचार, आहार, व कुलधर्म, कुलाचार व कुलोपासना, यांचे पालन हे होय.दैनंदिन जीवनात यांचे पालन होत नसल्यास कुटुंबात, समाजात अशांतता माजून, समाजाचा ऱहास होत जातो.त्यातून सतत ढासळत चाललेल्या समाजाच्या उध्दारासाठी नियंत्याला योग्य असे माध्यम भूतलावर पाठवावे लागते.त्या माध्यमाच्या आगमनाची पूर्व सूचनाही नियंत्याने वडिलांना दिली.

नियंत्याने वं.दादांना ज्या नियोजित कार्यासाठी भूतलावर पाठविले, वं.दादांनी ते कार्य सुलभ व सुरळीत रितीने पार पाडावे यासाठी प.पू.तेली महाराज व श्री.भैरवनाथ यांची योजना केली.महाराजानी आपली जबाबादारी ओळखून वं.दादांचे शालेय शिक्षण खंडित करून त्यांचे आत्मिक तत्व अखंडित अशा ईश तत्वाशी जोडून दिले.अप्रस्तूत अशा शालेय शिक्षणातून व्यावहारिकताच शिकविली जाते, जी शुध्द नैसर्गिक तत्वांच्या विरोधातील असते.व्यावहारिक शिक्षणात जन्मजात शुध्द असलेली बुध्दि विशुध्द होत जाते.यास्तव वं.दादांची जन्मजात शुध्द असलेली बुध्दि तशीच शुध्द ठेऊन, एक तप “गुरुचरित्राचे” वाचन केल्याने, त्यातील सिध्दसिध्दांतांचे ज्ञान प्राप्त होऊ शकले.नियंत्याच्या नियोजनाप्रमाणे.वं.दादांचे जीवन-कार्य कोणते आहे, हे देखील महाराजानी जागृत करून ज्ञात करून दिले.

यानंतर कार्याचे बीजारोपण करण्यासाठी श्री.भैरवनाथानी वं.दादांच्या वडिलाना दृष्टांत देऊन सूचित केले कीं, मला प्रकाशात यावयाचे आहे.यथावकाश, श्री.भैरवनाथानी, वं.दादांना नाद, निनाद व ॐकार यांचे ज्ञान देऊन त्यांची ओळख, स्वतः उच्चारून करून दिली.त्यानुसार वं.दादांकडून म्हणून घेऊन ॐकाराची दीक्षाच दिली.पांच स्थानातून शिकविलेला ॐकार, पुढे मानवी जीवनात निरंतर कार्य करीत रहावा यासाठी वं.दादांनी यथावकाश ॐकार साधना सिध्द केली.अशाप्रकारे बुध्दि शुध्द झाल्याने देहातील पांच कोश शुध्द झाल्यावर व क्लिष्ट अशा कार्यार्थ वं.दादांचा देह सक्षम झाल्याची खात्री झाल्यावर, श्री.भैरवनाथानी, वं.दादांना पुढील मार्गदर्शन प.पू.साईनाथ महाराजांकडून घेण्यास सूचित केले.प.पू.साईनाथ महाराजांनी वेळोवेळी उचित मार्गदर्शन करून, वं.दादांकडून कार्याची सुरुवात केली.प.पू.साईनाथ महाराजानी उदित केलेल्या कार्यार्थ विविध विभूतीनी, संतानी व नाथांनी योग्य ते मार्गदर्शन वं.दादाना व सहकार्य केल्याने लोक-कल्याणार्थ असलेले अभूतपूर्व असे कार्य प्रत्यक्ष साकारण्यास सुरुवात झाली.

वं.दादांची लोककल्याणाची तळमळ लक्षात घेऊन प.पू.साईनाथ महाराजानी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली.पहिल्यांदा औदुंबर तेथे राहून पांच घरी माधुकरी मागून श्री.गुरुचरित्राचे पारायणास सुरुवात करावी असे सुचविले.ज्यानी तुला फकीर केले ते पांच पीर कार्यार्थ सहकार्य व मार्गदर्शन करतील असेहे सूचित केले.
औदुंबर येथे जाण्यापूर्वी स्वतः स्वीकारलेला संसार सोडावा कीं, लोककल्याणाचे कार्य अंगिकारावे, याबद्दलचा निर्णय घेताना क्षणभर द्विधा मनःस्थिती झाली.पण वडिलांनी बिंबविलेला आज्ञापालनाचा संस्कार उपयुक्त ठरला.औदुंबर येथे जाऊन अंगिकारलेली साधना सुरू केली.

औदुंबर येथील साधने दरम्यान प्राप्त झाले ते–

१. साधना, संकल्प, साधनेचा विषय, गुरुभक्ती याबद्दल योग्य ते ज्ञान.

२. पीर, फकीर, फकिरी याबद्दल व प.पू.बाबांनी सूचविलेले पांच पीर व त्याच्याबद्दलचे ज्ञान व सहकार्य.

३. पांच पीरापैकी प.पू.हाजी मलंग बाबांचे मार्गदर्शन औदुंबर येथे. त्यात इहलोकातील मानवाना होणारा त्रास वा पीडा ही परलोकाशी निगडीत असते, याचे ज्ञान.इतकेच नव्हे तर सद्गती प्राप्त न झालेल्या परलोकातील आत्म्यांची स्थिती किती शोचनीय असते, हे श्री.गुरुनी प्रत्यक्ष दाखविले.यातूनच कार्याची किती नितांत गरज आहे, याची झालेली जाण.

४. यानंतर कर्म व कर्मविमोचन याचे ज्ञान प्राप्त होऊन, कर्मविमोचनाची सिध्दता करण्यास सुरुवात,.कर्म व कर्माची गुंतागूत किती व कशाशी निगडीत आहे हे समजले.कर्म व कर्मातून पांच ऋणानुबंधांची निर्मिती व मानवी देह, हे एकमेकाशी कसे संबंधीत असतात, याचे ज्ञान.

५. मानवी देहाची धारणा, जन्म-उत्पत्ती-मीमांसा, जीवन-उत्पत्ती-मीमांसा व दुख-कारण-मीमांसा, इत्यादीसाठी त्रिदोषच कारणीभूत असतात व त्यांचे निवारण करणे, त्या निवारणात, हे सर्व सिध्द करण्याचा विषय संकल्पात कसा अंतर्भूत असावा लागतो,हे समजले. त्याप्रमाणे कार्याची आखणी करून कार्य सिध्द करणे कसे सोपे होऊ शकते.

६. यासाठी प्रथम विमोचने सिध्द करावी लागतात.विमोचनाखेरीज दीक्षा देता येत नाही, म्हणून विमोचने सिध्द झाल्यावरच दीक्षा सिध्द करून द्याव्यात, याचे ज्ञान.

७. विमोचनाप्रमाणे कार्य होत आहे, हे पाहिल्यावर दीक्षा देण्यास सुरुवात केली.भक्तांमध्ये दीक्षानुरूप कार्य होत आहे, हे पाहिले.याचाच अर्थ मानवी देह शुध्द होऊ शकतो, हे उमगले.

८. या सर्व कार्यात पांच पीरांचे मार्गदर्शन व सहकार्यच उपयुक्त ठरले.

९. कार्य – त्रिदोषासाठी तीन विमोचने. (कर्म विमोचन, ऋणमोचन व वंश विमोचन)

१०. यानंतर दीक्षा या विषयाचा अभ्यास करावयास पाहिजे.वस्तुतः दिक्षा ही एकच असते व ती एकदाच दिली जाते पण धारण करणारा देह तेवढा सक्षम नसल्याने दीक्षांची विभागणी करावी लागली ती येणेप्रमाणे-

1. उपासना दीक्षा
2. नामस्मरण दीक्षा
3. अनुग्रह दीक्षा
4. गुरु दीक्षा
5. कारण दीक्षा
११. दीक्षा दिल्यानंतर त्यांचे कार्य यथोचितपणे होत आहे, हे पहाणे.

१२. कारण, निराकरण, निवारण यातून देहाची शुध्दता होत आहे, हे पहिल्यावर त्याचे सातत्य टिकविण्यासाठी दीक्षा देऊन दैनंदिन सेवा करण्यास सूचविणे महत्वाचे असते.सर्व मानवाच्या कल्याणासाठी (सर्व समावेशक अशी एकच) प्रतिमा देण्याने भूतलावरील मानवाला एकच शक्तित प्राप्त झाल्यास कार्य निरंतर चालू राहील, म्हणून शक्तिपीठाची स्थापना करावी लागली.त्यात सृष्टीत कार्य करणा-या तीन प्रमुख शक्ति म्हणजे उत्पत्ती, स्थिती व लय,व त्या प्रमुख तत्वातूनच कार्य करणा-या सर्व देव-देवतां, या सर्वाना एकत्र समावण्यास आवाहन करावे लागले.भूतलावरील सर्व देव-देवतानी मान्यता दिली.कारण सर्वत्र आज देव-देवतांची अवहेलनाच होत असल्याने असे कार्य करणा-यास सहकार्य करण्याचे आनंदाने मान्य केले.यास्तव त्या तीन मूळ शक्ति एकत्र स्थित होऊन शक्तिपीठात सामावलेल्या आहेत.त्या शक्तिपीठाची, स्थापना, वं.दादांनी गोवा येथे केली.

१३. कार्यार्थ मार्गदर्शन करणा-या संत व विभूती-

1. प.पू.हाजी मलंग बाबा कल्याण.

2. प.पू.महंमद जिलानी, बगदाद

3. प.पू.मोईनुद्दीन चिस्ती,अजमेर

4. प.पू.सलिम चिस्ती, फत्तेपूर.

5. प.पू.ख्वाजा बंदेनवाज,गुलबर्गा

6. प.पू.कुतबुद्दीन बाबा, दिल्ली.

7. श्री.नृसिंह सरस्वती, नरसोबाची वाडी.

8. प.पू.पंत महाराज, बाळेकुंद्रि.

9. श्री.गोरक्षनाथ, बत्तिसशिराळा.

10. श्री.भैरवनाथ, सातारा.

१४. संतानी व विभूतीनी वं.दादांना मार्गदर्शन करताना काहीं उद्गार काढले.त्याचा अभ्यास केल्यास वं.दादा हे अवतारी पुरुष आहेत, याची सत्यता जाणून घेणे सुलभ होईल.
अवतारी पुरूषः वंदनीय दादा.
· वं.दादांना स्वप्नात आज्ञा झाली कीं,

तुझे गुरू ह्या जगतात जन्माला आले नाहीत.तेंव्हा गुरुचा शोध घेऊ नकोस.आज पौर्णिमा आहे, तेंव्हा सायंकाळी तू श्री.भैरवनाथ यांच्याकडे ये.तेथेगुरुह्याचा सविस्तर अर्थ तुला समजेल.

 

· श्री भैरवनाथांचे मार्गदर्शन

(वं.दादांनी) श्री.भैरवनाथांच्या देवळात जाऊन पूजाअर्चा केली.हळू हळू त्यांच्याकडून पांच स्थानातून ॐकार म्हणून घेतला.त्यानंतर शब्द ऐकू आले.

जो ॐकार तू आज म्हटला आहेस, तो पांच स्थानातून म्हणायचा असून, त्या स्थानातूनस्वरअशी संथा म्हणावयास पाहिजे.पुढे हा स्वर ह्या स्थानातून उच्चारता, पांचही स्थाने सिध्द झाली, म्हणजे एक सूर म्हणावा लागतो.त्यावेळी जोसूरवाणीतून उच्चारला जातो, तो उच्चार नसून, स्वराचे रूपांतरनिनादमध्ये होते.म्हणजे हा नादसिंहनादअसा होतो.हीं ओळख ब्रम्हांडाची आहे.आपण जेंव्हा जन्माला येतो तेंव्हा आपल्याला वाचा ही गर्भावस्थेत दिलेली असते, पण उच्चार करता येत नाही.तेंव्हा डाँक्टर किंवा सूईण त्या बाळाला उलटा करून, त्याच्या ढुंगणावर थापट मारीत असतात.त्यामुळे ते बालक प्रथमतः वाणीने जो उच्चार करते, त्याचा अर्थॐकारअसाच आहे.पण त्या ॐकारात तीन तत्वापैकी उत्पत्ती तत्त्वाचा आरंभ होतो.आज जो तूसिंहनादऐकला आहेस, त्याचा अर्थ ॐकार ही साधना पूर्ण झाली; असे म्हणावे लागेल.भवितव्यात जगाला तारणारा एकच मंत्र एकच तंत्र आहे.ह्या मंत्राची त्रिपुटी असून, पुढे चौथी अवस्था तुला भवितव्यात प्राप्त करावयाची आहे.तेंव्हा प्रयत्नांची केव्हढी पराकाष्टा करावयास पाहिजे, हे मनाशी ओळखून पुढे चल.‘प्रकाशम्हणजे ज्ञान, देणारे तुझ्या पाठीशी आहेत.आजपासून हा आरंभ कर.तो सिध्द होण्यासाठी सबंध आयुष्य जरी पुरले नाही तरी हरकत नाही, जेवढे आपल्या वाट्याला येईल तेवढे ज्ञान जगाला देऊन ज्ञानी कर.पण माघार घेऊ नकोस.पुढचे मार्गदर्शन तुला ज्यांच्या नावांने वडिलानीफकीरकेला आहे.ते तुला सांगतिल.तेथपर्यंत तुला गुरू नाहीत असे म्हणता, गुरुच तुझा शोध घेत येतील! असा सुमंगल क्षण आयुष्यात येईल.आज पांच स्थानातून केलेला ॐकार ही भवितव्यात होणारीआकाशवाणीअसेल तो दिवस, याची तू तुझे सहकारी वाट बघतील.पण एक लक्षात ठेव ॐकार ही साधना हा महामंत्र, भक्तांची संख्या वाढविण्यासाठी, त्याची सक्ती करता, ज्याना ईश्वराबद्दल गोडी लागली आहे, त्यानाच भक्तिरूपात दे,पण कोणालाहीभक्त संबोधता, ‘सेवक म्हण.म्हणजे पुढील कार्य हे जगताच्या अंतापर्यंत चालू राहील.तथास्तु!”

 

श्री.भैरवनाथांचा आशिर्वाद
(वं.दादांच्या) जीवनारंभी श्री.भैरवनाथानी ॐकार करण्यास सांगितला असा आशिर्वाद दिला कीं,
भवितव्यात ह्या ॐकार साधनेमुळेपिंडी ते ब्रम्हांडीम्हणजे काय?ह्याचे ज्ञान तुला साधकाला होईल.त्यासाठी ॐकार हीच साधना असून, ह्या साधनेत पांच अवस्था आहेत. त्यापैकी तीन अवस्था ह्या पिंडाचे ज्ञान होण्यासाठी दोन अवस्था ब्रम्हांडाचे ज्ञान होण्यासाठी असून, याप्रमाणे जी साधना मी शिकवितो आहे ती लक्षपूर्वक ऐक.जरं का त्यापैकी एका अवस्थेत शास्ञीय पध्दतीने चूक झाली तर भवितव्यामध्ये साधना सिध्द होणार नाही.यासाठी साधना करते वेळी लक्ष ठेवणे, ह्याचा अर्थसिध्द होणे असा आहे.तेंव्हा पांच अवस्था, ही ॐकाराची पांच रूपे असून, ती रूपे भवितव्यात सहस्त्रावधी रूपे होतील.म्हणजे साधनारंभी जरी पाच लोकाना ह्या ॐकाराची संथा शिकविलीस तरी पुढे हजारो भक्त तयार होतील, असा माझा फक्तआशिर्वादनसूनकृपाशिर्वाद आहे.”

 

श्री.दत्तगुरुंचा उपदेशः-

आज रात्री बारा वाजता .पू.हाजी मलंग बाबा हेमुलाखतघेणार आहेत. तेंव्हा तुझी इच्छा ते पूर्ण करतील.”

· .पू.गरीब नवाज, अजमेर याची आज्ञा :-

परत गेल्यावर पंत बाळेकुंद्रीकर याना जाऊन भेट.त्यांचा वाटा ह्या कार्यात मोठा आहे.तो ते भेटल्यावर सागतील.”

(आरती साधना सिध्द झाली)
(वं.दादाना) श्री गुरुनी परलोकातील आत्म्याची दयनीय अवस्था प्रत्यक्ष दाखविली त्यांच्या व्यथाही त्या आत्म्याकडूनच, व्यक्त केलेली ऐकविली)

श्री.गुरुदेव दत्त! आम्हाला या नरकयातनातून सोडवा.कर्माचे प्रायश्चित्त शकडो वर्ष भोगत आहोत.एक ना एक दिवस ही सुवर्णसंधी येईल, ही श्रध्दा होती.शेवटी दत्तप्रभूना दया आली.तुमचे आगमन झाले.जन्म कृतार्थ झाला.देवा! पुन्हा जन्म नको.देह असता तर जगाला देहाचे हाल पाहून दया येईल, पण आता देह नाही, यातना सगळ्या आत्म्याला.अशी यातना भोगता भोगता शेकडो वर्ष वाट पाहिली, आपले स्नान झाले कीं, महाराजांचे तीर्थ आमच्यावर सिंचन करा.यापेक्षा अधिक मुक्ती कोणती?जे कार्य भगीरथाने केले तेच कार्य तुम्हाला करावयाचे आहे.त्यात आम्हाला सहभागी करा. तथास्तु! गुरुदेवदत्त!”

 

ॐकाराचे महत्व विषद करताना श्री भैरवनाथानी केलेला स्वर, नाद व सप्तलोक या विषयी केलेला खुलासाः-

चौथ्या अवस्थेमध्येस्वर’, म्हणून आपण म्हणतो, त्याचा अर्थ शाब्दिक नसून, ह्या जगाचे जे कार्य अव्याहत चालू आहे, त्या कार्यामध्ये सृष्टीचा समावेश आहे.स्वराची उपपत्ती ब्रम्हांडाशी असून, ते ब्रम्हांड पृथ्वीप्रमाणे स्वतःभोवती प्रदक्षिणा करीत असते.त्यावेळी त्या फिरण्याने जी गती निर्माण होते, त्या गतीलानादअसे म्हणतात.पुढे हा नाद सृष्टीकडे येतो.याचे कारण गुरुत्वाकर्षण हा धर्म पृथ्वीचा असून, पृथ्वीकडे हा नाद येऊ लागल्यावर, त्या नादातून पुढे सात स्वर निर्माण होतात.ह्याच स्वराना ‘सप्तलोकअसे म्हटले असून पहिल्या स्वरात पहिल्या लोकाची प्राप्ती आम्हा मानवाना होत असते.इहजगतात जन्माला आल्यावरबालक जो पहिला आवाज उच्चारते तो पर्यायाने पहिला स्वर आहे.”

 

प.पू.हाजी मलंग बाबांची वाणी-

त्या दिवशी हाजी मंलंगबाबांचा उरूस होता.त्या दिवशी सायंकाळी प्रार्थना केली असता, ‘अभोगीचे सूर ऐकू येऊ लागले, हळूहळू आकाशात त्या सूरांचे रंग उमटले शेवटी हे इंद्रधनुष्य आहे.पण आकाशात पाहतो ते नसून, हे स्वरांचे आहे.ही जाणीव झाली.‘इंद्र’ हा देवांचा राजा, स्वर हा गाण्याचा राजा, सूर हा धनुष्यातील बाण, तो सूर आकाशाकडे चालला आहे, असे दिसले.याचा अर्थ पांच स्थानातून उमटणारे पांच स्वर पांच स्वरांचा एकच राजा म्हणजे इंद्र किंवा आत्मा!”

अशा संताना आपण जे पाहतो, त्यांचा जन्म आपल्यासारखा नसतो, त्या जन्माला अवतार असे म्हणतात.”विभूतीनी संतांनी काढलेल्या कांही निवडक उद्गारातून वंदनीय दादां हे प्रत्यक्षात अवतारी पुरुष आहेत यात कांही संदेह नसावा.ज्या श्री.साई अध्यात्मिक समिती स्थापनेच्या कार्यार्थ वंदनीय दादांनी संपूर्ण जीवन व्यतीत केले त्या समितीचा सभासद होण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *