मेजर सदुभाऊ गुणे वं.दादांचे मामा

मेजर सदुभाऊ गुणे, हे वं.दादांचे मामा.ते भिलवडी येथे रहात होते.तेथे त्याचे घर व मळा होता.त्या म•यातील विहिरीवर ज्याला ते कांचनकट्टा म्हणत असत, तेथे बसून वं.दादा मामांशी विचारविनिमय करत असत.मेजर गुणे यांचा मूळ पिंड धार्मिकवृत्तीचा असल्याने त्यांचे व कौटुंबियांचे, घरातील आचरण सत्शील होते.त्यांनी नित्य नेमाने गीतापठण पन्नास वर्षे केले असल्याने गीतेवर त्यांची गाढ श्रध्दा असल्याने त्यांचे गीतेवर प्रभुत्वही होते.त्याना विविध भाषा होत्या.मामांचे उर्दूभाषेवर प्रभूत्व असल्याचे प.पू.हाजी मलंग बाबानी, वं.दादा औदुंबर येथील सेवेत असताना सांगणे यातच, मामांना गौरवले हे स्पष्ट दिसते.
एकदा मामांनी वं.दादांना भक्त-भाविकांच्या पारमार्थिक प्रगतीसाठी परमार्थ-प्रश्नावली लिहून दिली.ती भक्त-भाविकांना अत्यंत उपयुक्त असल्याने, वं.दादानी तीचा समवेश “साधन-पत्रिकेत” केला.तसा उल्लेखही पत्रिकेत केला आहे.

१.      परकाया प्रवेश

वं.दादा, प.पू. बाबांच्या आज्ञेनुसार औदुंबर येथे सेवेत असताना प.पू.हाजी मलंग बाबांचे आगमन, मामांच्या घरी झाले.त्यावेळी त्यानी ‘परकाया प्रवेश’ या विषयाबद्दलचे ज्ञान उर्दूभाषेतून केले. त्याचा अर्थ मामांनी अनुवादीत करून वं.दादांना समजावून दिला.मामांची अध्यात्मिक मार्गातील प्रगती चांगली असल्यानेच हे महत्वाचे काम ते करू शकले.

२.      परलोक

औदुंबर येथील वास्तव्यात परलोक मार्गाची ओळख झाल्यावर तो विषय किती खोल आहे हे समजले.या विषयाची सखोल माहिती मिळविण्याच्या उद्देशाने ते मामांच्या घरी असताना, मामांशी चर्चा केली. त्यावेळी मामा म्हणाले–
असा विषय जर तुम्ही सिध्द केलात तर भवितव्यात असंख्य लोकांना त्याचा लाभ होऊन, इहलोकात व परलोकांत ज्या आत्म्यांचे वास्तव्य असते, अशांना मुक्ती व सद्गती प्राप्त होऊ शकेल.कारण कुटुंबातील व्यक्तींना, आत्म्याची मरणोत्तर जीवनामध्ये काय इच्छा-वासना आहे, हे न समजल्यामुळे, त्या आत्म्याची पीडा कुटुंबाला होत असते.अशावेळी नुसती पीडा आहे, तिचे क्षालन होऊन चालणार नाही.नुसता कर्माचा होणारा त्रास, निवारण करणे हे ठीक नसून, जो आत्मा आपल्या कृतकर्मामुळे पीडित झाला आहे, ती पीडा बाजूला केली पाहिजे.व आत्म्यालाही सद्गती प्राप्त व्हावयास पाहिजे.यासाठी मरणोत्तर जीवन हे “जीवन” असून, त्या जीवनात काय काय अंतर्भूत झाले आहे, ह्याचा नुसता विचार करून चालणार नाही.जो आत्मा पिशाच्च योनीमध्ये वावरत आहे, अशाशी संपर्क साधल्याशिवाय, त्याची इच्छा काय आहे हे अनुमानाने सांगून चालणार नाही,” हे मामांचे म्हणणे बरोबर होते.जे दृष्य मी औदुंबरला पाहिले, त्याप्रमाणे दिवंगत आत्म्याचा त्रास होऊ नये, म्हणून दानधर्म करणारे अनेक लोक असतील, ज्याना होणारा त्रास हो कशामुळे आहे, हे निश्चित समजत नाही, त्या व्यक्तींना आपल्या घराण्यातील दिवंगत व्यक्तीना मुक्त करण्याचे कर्तव्य करावयाचे आहे, हे जर समजले तर नःसंकोच हा विधी तीर्थक्षेत्री करतील, पण होणारा त्रास समजत असूनही, आज कांही एक करता येत नाही.ज्या परलोकवासी झालेल्या व्यक्तींच्या पीडा आपणास होतात, त्यासाठी शास्त्रात त्रिस्थळी यात्रा, दानधर्म, अन्नदान, वस्त्रदान आदी विधी, याशिवाय नागबली, नारायण नागबली आदी विधी सांगितले असून, ह्या विधीमाध्यमातून अंशमात्र सुटका होते.जो आत्मा वासनावलयामध्ये बध्द झालेला आहे, त्याची मुक्तता ह्या विधीनी होते.परंतु वासनावलय म्हणजे कर्म, हे शिल्लक राहून, त्याचे अस्तित्व कुटुंबाशी संबंधीत राहते.व पीडा शिल्क राहते.आत्म्याची मुक्तता ह्या विधीनी होऊ शकेल, पण आत्म्याचे जे कर्म अपायकारक म्हणून शिल्लक राहिलेले असते, ते कर्म कुटुंबातील इतर व्यक्तीना भोगावे लागते, त्या कर्माचाही क्षय व्हावयास पाहिजे.”असा थोर विचार करून, आपण आपले साधन सिध्द करा.” असे माझ्या मामांनी सांगितले.
वरील विवेचनावरून मामांचा इहलोक व परलोकाचा अभ्यास किती सखोल होता हे स्पष्ट दिसते.
औदुंबर येथील वास्तव्याची सेवा पूर्णत्वास आल्यावर, मामांचा निरोप वं.दादांना आला की, मला येऊन भेटून जा.त्याप्रमाणे वं.दादा मामांच्या घरी गेल्यावर दुपारी जेवणानंतर विहिरीवरील कांचनकट्ट्यावर मामांच्या सोबत बसले.त्यावेळी मामांनी अचानक असा उच्चार केला की,
।। यदा यदा ही धर्मस्य, ग्लार्निभवती भारत ।।”

      त्यांची अशी वाणी वं.दादानी प्रथमतःच ऐकली कारण ते जवळ जवळ 50 वर्षे गीता म्हणत होते पण या वेळी त्यांचा उच्चार ऐकून वं. दादांची मती गूंग झाली.अर्धा तासपर्यंत वं.दादा व मामा स्तब्ध बसले.शेवटी मामा ऊठून म्हणाले, 

   दादा आपली इच्छा असते वेगळी, व ईश्वराची असते वेगळी.आता मी जे कांही म्हणालो, त्याची मला आठवण ही नव्हती.तुम्हाला सांगावयाचे वेगळे होते, पण झाले दुसरेच.मला जे स्वप्न गेल्या आठवड्यात पडले ते तुम्हाला सांगावयाचे होते, ते असे कीं, पहाटे माझ्या स्वप्नात श्रीकृष्ण आले व म्हणाले, “ईश्वराचे कार्य आहे, त्या कार्यास कुणीतरी मध्यस्थ लागतो.हा मध्यस्थ म्हणजे ईश्वर नसून, तो ईश्वराचा संदेश घेऊन येतो.ह्यावर पूर्ण श्रध्दा ठेवली तरच ह्या जगाचा उध्दार होईल.जर ‘ संदेह’ निर्माण झाला तर जग बुडाले” व मी जागा झालो.गेले चार दिवस, हा संदेश माझ्या कानाशी सारखा गुणगुणतो आहे.म्हणून तुम्हाला बोलावणे पाठविले.”मग मी त्याना गेल्या आठवडाभर माझी काय अवस्था झाली होती ते सांगितले.म्हणजे दोघानाही ईश्वराचा आदेश झाला, ही गोष्ट सत्य आहे.

वरिल विवेचनावरून मामांनी देखिल अध्यात्मिक मार्गातील किती उच्च अवस्था प्राप्त केली होती हे समजते.तसेच वं.दादा व त्यांचे मामा यांचे ऋणानुबंध जरी नाते संबंधातून जुळले होते तरी आत्मिक ओढ ही अनेक जन्मांचीच होती.ती ओढ “श्री.साई अध्यात्मिक समिती”च्या कार्याशी युक्त होती.