अध्याय ३ घराण्यातील कुलधर्म.

सध्या समाजात ज्या विषयाबद्दल अज्ञान आहे असा एक महत्वाचा विषय म्हणजे “कुलधर्म”! त्या विषयाचे समग्र व शास्त्राय ज्ञान सर्व सामान्याना व्हावे व त्यातून समाजाला निरंतर सुख, शांती, समाधान प्राप्त व्हावे या सद्हेतूने श्री साई अध्यात्मिक समितीने सविस्तर  विवेचन या अध्यायात केले आहे.हा संपूर्ण अध्याय शांत चित्ताने वाचून मनन करावा जेणे करून आपणास योग्य तो लाभ घेता येईल.या विषयाची शास्त्राóय कारण-मीमांसा करताना मूळ स्त्रा÷तापासूनचा आढावा घेतला आहे.तो थोडक्यात असा

ऋषिमुनीनी लोक-कल्याणार्थ ‘निराकार’ शक्तिला प्रार्थना करून, सृष्टीचे पावित्र्य राखण्यासाठी व त्यातून पुढे मानवाच्या निरंतर सुख, शांती, समाधानासाठी, त्या निराकार शक्तिला त्रिगुणात्मक अशा महान शक्तित ‘साकारले’.

त्या शक्ति म्हणजे, ब्रह्मा,विष्णु,महेश.

अशा महान शक्तिने भूमीवर येऊन पुढे तीन सौम्य व विविध स्वरुपे धारण केली.

1.इहलोकासाठी प्रकृती-तत्वात ‘देवता’ स्वरुपात स्थापित झाल्या,त्या कुलस्वमिनी.(श्री.महाकाली, श्री.सरस्वती, श्री.महालक्ष्मी ) .

2.परलोकासाठी पुरुष तत्वात ‘देव’ म्हणून अधिष्ठित झाले, ते कुलस्वामी (श्रीशंकरांचे विविध स्थळी, गरजेनुसार सौम्य अवतार).

3.स्वर्गलोकासाठी ‘उपास्य दैवत’ म्हणून वास करते झाले (ते श्री.दत्तात्रेय, श्री.गणेश, श्री.कृष्ण)

अशा विविध शक्तितून इहलोकातील मानवाला,निरंतर सुख-शांतीच्या प्राप्तीसाठी,प्रथमावस्थेत उपासना करावी लागते ती ‘देवतां’ची.त्यातून प्राप्त झालेला आशिर्वाद सतत वास करीत रहावा म्हणून उपासना करावी लागते,ती ‘देवा’ची.सत्कर्मातून व देवदेवतांच्या उपासनेतून प्राप्त केलेली ठेव कार्यान्वित करण्यासाठी उपास्य दैवते आशिर्वाद देत असतात.

अशा देवदेवतांच्या स्थापना, प्राणप्रतिष्ठा, पूजन, नैवेद्द इत्यादी संबंधी, घराण्यातील देवता ओळखण्यासाठी देवतांच्या पूजन-नैवेद्द पध्दतीसंबंधीचे विवेचन शांत चित्ताने वाचून, ग्रहण करून त्याप्रमाणे आचरण केल्यास जीवन समाधानाने व्यतीत होईल त्यामुळे फल-प्राप्ती होण्यास आपण कारण व्हाल.

‘ब्राम्हण’ या शब्दाची व्याख्या / यज्ञोपवित-त्याचे महत्व व कार्य / लग्नाबद्दलचे विवेचन / विवाहापूर्वी मुलीनी करावयाचे व्रत-विधी / विवाहोत्तर करण्याची व्रते-विधी / लग्नविधी / कन्यादानाचे महत्व.इत्यादिंचे विवेचन शांत चित्ताने वाचून मनन करावे.

“मानवता धर्म” याबद्दलच्या विवेचनातून समस्त मानवांना, समिती कोणता संदेश देऊ इच्छिते, त्याचे मनन करावे.

परमेश्वराने,मानवासाठी केलेली तरतूद लक्षात घेण्यासारखी आहे.त्याबद्दलचे विवेचन बारकाईने वाचावे.

सध्याची सामाजिक परिस्थिती व सामाजिक मानसिकता लक्षात घेऊन समितीने प्रचलित असलेल्या प्रखर, क्लिष्ट अशा परंपरेतून सोडवणूक करून दिली आहे.तसेच पर्यायी साधी,सोपी,सोईस्कर व पुढील शेकडो वर्षे कार्यान्वित राहिल अशी जीवन पध्दती सूचित केली आहे.त्याचे सविस्तर विवेचन पुढील अध्यायात येणार आहेच.यास्तव या अध्यायातील विषयांच्या अभ्यास करताना कोणताही संदेह वा संभ्रम निर्माण होऊ देऊ नये.

समितीची कांही मननीय वचने-

1.“असे हे जगाच्या अंतापर्यंत त्या देवदेवतांचे कार्य बदलत्या काळाप्रमाणे बदलणार नाही व कोणाच्याही इच्छेप्रमाणे ती बदलणार नाही,हे सूज्ञ भक्तांनी लक्षात घ्यावे”

2.“मानवाच्या कल्याणार्थ किती खोलवर विचार करून, शास्त्रशुध्द पध्दतीवे जीवन साकार करण्याचा महत्कार्यभाग अंगिकारला आहे.तो अनंतरूपी परमेश्वर आपल्यासर्वास आपली लेकरे म्हणून वागवीत असून, त्याने कोणाही व्यक्तिचा धर्म म्हणून किंवा जातपात म्हणून आव्हेर केलेला नाही”

3.“प्रत्येकाने आपला धर्म कोणता आहे,आपली जात कोणती आहे,आपली पोटजात कोणती आहे, हे विचार कीं जे आज समाजाला पोषक नाहीत,ते बाजूला ठेवून सूज्ञपणे एकाच विषयाशी दृढ व्हावे,कीं ’आम्हा सर्वाना परमेश्वराने मानव म्हणून जन्माला घातले आहे,तेंव्हा आमच्या आचार-विचारात, बोलण्या-चालण्यात हे द्वैतभाव न घेता आम्ही एक ‘मानवता धर्म’ म्हणून स्वीकारावयास हवा.’ ही भूमिका जर कुटुंबापासून राष्ट्रापर्यंत सर्वांच्या ठिकाणी सदैव वास करील तर जागतिक शांततेसाठी कोणत्याही राष्ट्राला शांतता परिषद बोलवावी लागणार नाही”

4.“जीवनाचा योग्य विकास व्हावा याची परमेश्वराने सर्वतोपरी तरतूद करूनसुध्दा तुम्ही अज्ञानाने जर हे जन्माचे परमपवित्र असे फळ अनुभविता, तर ‘मी दुखी आहे.पण देव अजून माझ्या हाकेला ओ देत नाही’ असे म्हणून चालेल कां?

5.“कर्माचा क्षय कर्तव्यपूर्तता केल्यानेच जो होतो, त्यामुळे आपोआपच म्हणजे निसर्गतःच मुक्ति किंवा मोक्ष प्राप्त होणे हा सहजधर्म आहे.”

6.“दिवंगत झाल्यावर कृपाशिर्वादाचे वलय आहे,ते निसर्गाधीन होते.तिला साकार करण्याचे कार्य गुरुमाध्यमाशिवाय कोणालाही करता येत नाही.”