अध्याय ४ पूजनादि विधी व तिचे महत्व.

या अध्यायात देवदेवतांचे पूजन,पूजनाचे विधी,त्यासाठी लागा-या वस्तू, यांची शास्त्रीय मीमांसा मार्मिक असून,त्यातून बोध घेतल्यास कोणत्याही जाती-धर्मातील विधीत शास्त्र हे एकच असते व तेच महत्वाचे असते,हे स्पष्ट होईल.पध्दत,वस्तू,स्थळ,काळ,वेळ इत्यादित फरक असू शकतो.पण तत्व हे समान असते.शास्त्र व व्यापक-दृष्टीकोन ठेवून पूजन म्हणजे काय, ते  कसे व कशासाठी करावयाचे हे अभ्यासून, आपापल्या श्रध्दा-स्थानाचे पूजन केल्यास, पूजनाचा विधी केवळ आनंददायीच असतो असे नसून फलदायी देखिल असतो,हे लक्षात येईल.पूजन करणारी व्यक्ति स्थूलतत्वतील  असते व श्रध्दा ही निर्गुण निराकार असते.त्या निराकार शक्तिला साकार करण्याचा एक शास्त्रीयउपचार म्हणजे पूजन होय. याचाच अर्थ स्थूल-देहापलिकडे देखिल कांही तरल अशी अवस्था असते.ती प्रखर व प्रभावी असल्यामुळे देहिक माध्यमात असलेल्या मर्यादित कर्मेंद्रियातून व ज्ञान्येंद्रियातून,त्याचे ज्ञान सहजतेने धारण करता येत नाही.पण देहिक माध्यम जर विकसित केले तर ते सहज शक्य असते.विकसित करण्याच्या पध्दतीतील एक विधी म्हणजे पूजन.पूजनासाठी कांही शास्त्रा÷क्त विधींची गरज असते.पूजनात दोन महत्वाचे भाग असतात. एक पंच-औपचार व दुसरा पंच-उपचार.पंच-औपचारात साहित्य महत्वाचे तर पंच-उपचारात विधीस महत्व असते.पंच-उपचारात इष्ट देवदेवतांबद्दल जो पूज्य भाव आपल्या ठिकाणी आहे,तो पूजासाहित्यातून देवाला व्यक्तकरावयाचा आहे. तर केला गेलेला विधी, त्याची जी प्रतिक्रिया, ती आपण काया-वाचा-मनाने धारण करावयाचा आहे,त्या विधीस पंच-उपचार असे म्हणतात.शास्त्रा÷क्त विधी म्हणजेच भावनिकतेतून केलेले पूजन. पूजन भावनिकतेतून केल्यामुळे वलय रूपातील कृपाशिर्वाद फलदायी होऊ शकतो,याचाच अर्थ स्थूलदेह, ती वलयें सामावून घेऊ  शकतो, हे उमगेल.तरल अवस्था ही सर्वव्यापी असून तिचे कार्य पृथ्वितलावर सतत चालू असते, याचीही प्रचिती येईल.
पूजन विधीत उपवास,व्रतवैकल्ये,पूजनविधी, वार्षिक कुलोपासना इत्यदिं सामावलेली असतात.त्याबद्दलचे शास्त्रीयविवेचन अभ्यासण्यासाठे आहे.त्यात,आसन,दिशा,आचमन यांचे विवेचन महत्वपूर्ण असून त्याचे अध्ययन बारकाईने करावे.अत्तराचा उल्लेख करताना जसे त्याच्या  विविध प्रकारच्या  कार्याची महती निवेदन केली आहे तसेच अत्तराबद्दल जे सहजतेने उद्गार प्रकट केले आहेत, ते मनन करावेत.
”माझा भक्त जरी पूर्वजन्मीच्या कृतकर्माने दुर्गुणी आहे तरी माझ्या कृपाशिर्वादाने आज ना उद्दा तो निश्चित गुणी होऊन, त्याचा सुगंध इतरांच्या कल्याणार्थ तो परोपकार म्हणून आचरणात आणील”
तसेच हळद-कुंकू याबद्दलचे विवेचन उद्बोधक आहे.ते बारकाईने वाचावे.त्यातील ऋþध्दि-सिध्दि हा विषय विशेष महत्वाचा आहे.ब्रम्हांडातील अति प्रखर अशा तेज तत्वाचे ते सौम्यात सौम्य प्रतिक आहे.निसर्गाने ते एव्हढे सौम्य केले आहे कीं, सृष्टीतील एका झाडाझुडपात ते स्थित केले. पुढे मानवाला त्याची ओळख करून देऊन त्याचा उपयोग मानवी देहाला झेपू शकेल.अशा स्वयंसिध्द असलेल्या हळद-कुंकूवाचे महत्व नित्य व्यवहारात किती आहे,हे लक्षात घ्यावे.हळद-कुंकवातील शास्त्रीयगुणधर्म व त्या शास्त्रीयतत्वावर अधिष्ठीत अशा धार्मिक विधीतील  तत्विक महत्व जाणून घेऊ शकू. तसेच अक्षता,मंत्रोच्चार,गंध उगाळणे,इत्यातील शास्त्राóय, धार्मिक व अध्यात्मिक महत्व जाणून घ्यावे.गंध उगाळण्यातील क्रिया बारकाईने अभ्यासावी. हातातील चंदनाचे खोड सहाणेवर उगाळताना हाताची क्रिया,कशी असावी याबद्दलचे शास्त्रीयविवेचन विशेष करून आभ्यासण्यासाठी आहे.
फुल व अत्तर यांची महती सांगताना फुलातील विविध गुण व ते मानवाला कसे उपयुक्त असतात, हे मनोरंजक  आहेच तसेच ते मार्मिकही आहे.
मानवी देहातील प्रधान गुण म्हणजे सत्वगुण,त्याचे कार्य किती व्यापक आहे व ते कसे चालते, हे बारकाईने अभ्यासावे.त्याबद्दलचे एक वचन समस्त मानवाला सतत स्मरणात ठेवण्यासारखे आहे
“आम्हा मानवांच्या ठिकाणी जो सत्वगुण आहे, त्याचे प्रधान कार्य म्हणजे,सर्वाभूती आत्मा एकच असून, सर्वांच्या हितार्थ ह्या जन्मात,या जन्माचे कारण आहे, हे जाणून घेणे होय”
देवाला, फल समर्पण करण्यापूर्वी फलाच्या तीन अवस्था असतात, हे लक्षात घ्यावे.त्या तीन अवस्था म्हणजे कच्ची,अर्धकच्ची व पक्व, अशा तीन अवस्था. त्यांचे पूर्णत्व म्हणजे परिपूर्णता.तशा परिपक्व फलाबद्दल समितीने प्रकट केलेले उद्गार सतत स्मरणात ठेवाण्यासाठी आहेत.ते उद्गार म्हणजे “ मलाही त्या तिन्ही स्थिती असून, माझा काहींच विकास अजून झाला नाही याबद्दल मला दुख होत आहे “ हे देवाला निवेदन करण्याचे माध्यम म्हणजे फळ.
आरती ओवाळणे या विधीचे शास्त्रीयविवेचन शांतपणे वाचावे व निवांत वेळी त्याचे मनन करावे.प्रत्येक वस्तूत कोणता आशय दडलेला आहे ते लक्षात घ्यावे.त्यातील निरांजन व तूप या विषयीचे विवेचन खास महत्वाचे आहे.अशा विविध विषयांचे विविधप्रकारे केलेले शास्त्रीयव समर्पक विवेचन महत्वपूर्ण असल्याने,अभ्यासण्यासाठी दिले आहे.तसेच प्रचलित अज्ञान व अंधश्रध्दा दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे.’भाव’ व ‘भावना’ यांची शास्त्रीयमीमांसा खूप मनोवेधक असून,त्या तरल अशा मानसिक अवस्थेची (अध्यात्मिक) ओळख करून देणारी आहे.त्याचा अभ्यास जरूर करावा.त्यातूनच पुढील विषय अभ्यासायचे आहेत.अशावेळी वस्तू ही वस्तू न रहाता त्यांचा संबंध पूजनादि विधीतून निराकर शक्तिकडून आशिर्वाद प्राप्त करून  तो साकार-शक्तिकडे (मानवाप्रत) प्रवाहित करण्याचे माध्यम ती वस्तू बनते.याचाच अर्थ स्थूल अवस्थेतून सूक्ष्म अवस्थेकडे व पुढे कारण अवस्थेप्रत जाण्याचा सुलभ मार्ग म्हणजे मनोभावे श्रध्दास्थळाचे पूजन होय.
पंचोपचार षडोपचार याबद्दलचे विवेचन करताना श्रध्दास्थानाबद्दल पूज्यता असते म्हणूनच आपण  पूजन करीत असतो.पण पूजनाचे वेळी कोणतातरी हेतू मनात ठेवूनच पूजन करीत असतो.श्रध्दास्थानाबद्दल फक्त पूज्य भाव असावा,मागणे नसावे.पूजन विधीचे वेळी अशी निरपेक्षता असणे आवश्यक असते.सहसा तशी अवस्था प्राप्त होऊ शकत नसल्याने,पर्यायी जो विधी सूचविला आहे त्याचे पालन करणे हितावह असते.यास्तव तो बारकाईने वाचावा.