अध्याय ५ कुलाचार, कुलोपासना

या पूर्वीच्या एका अध्यायात कुलधर्म हा विषय घेतला आहे.आता घेतला आहे तो कुलाचार व कुलोपासना.म्हणजेच आपल्याला यातून तीन्ही विषयांचे पूर्ण व शास्त्रशुध्द ज्ञान होणार आहे.त्यामुळे जीवनात सुख, शाती व समाधान सहजतेने प्राप्त होऊन ते चिरकाल टिकणे सहजे शक्य होणार आहे.प्रथम कुलधर्म,कुलाचार,कुलेपासना यात कोणते अर्थ दडलेले आहेत, हे समजावून घेणे योग्य होईल. कुलाचार,हा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिच्या शुध्द आचरण्यासंबंधी असतो.कुलधर्म,हा कुटुंबासाठी सर्वानी मिळून पाळावयाचा (कर्तव्यचा) धर्म असतो.तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ शक्तिंची आराधना करून, त्यांचा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी असतो. कुलोपासना ही परंपरेने चालत आलेली देवदेवताची,प्रसंगोपात व ठराविक वेळी करावयाची सेवा-उपासना असते.त्याचा पाया आहारमीमांसेत आहे हे, या अध्यायातील खुलासा वाचल्याखेरीज सहसा लक्षात येणार नाही. कुलधर्म व कुलचार याचा बोध एका वाक्यात सांगितला आहे, तो म्हणजे–
“ कुलधर्म हा जीवनात पंचविस टक्केच मनोभावनेने करावयाचा असून, पंचाहत्तर टक्के कुलाचार म्हणून जो आहे, तो केला पाहिजे.आजपर्यंत आपण भक्तांना एव्हढेच ज्ञान झाले आहे कीं, कुलधर्म व कुलाचार म्हणजे एकच आहे.परंतु कुलधर्म हा जो विधी आहे तो घराण्याच्या परंपरेतील देवदेवतांसाठी असून, ह्या देवदेवतांच्या कृपाशिर्वादाला कुटुंबातील सर्व व्यक्ति पात्र व्हाव्यात यासाठी जो कुलाचार म्हणून सांगितला आहे,तो देवतांसाठी नसून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिसाठी आहे. कुटुंबातील सर्व सदस्याचे दैनंदिन आचरण कसे असावे,याची कल्पना वरील विवेचनातून येईल.
या विषयाच्या शास्त्रीय विवेचनात ‘अन्नशुध्दि’,’वास्तूपूजन’, ‘वास्तूशांत’, ‘मी-सरस्वती पूजन’, “आहार-मीमांसा” इत्यादिं विषय घेतले असून, त्यांचे मानवी जीवनातील कार्य व महत्व सहजतेने व मार्मिकतेने उलगडून दाखविले आहेत. त्यातील शास्त्रीय मीमांसा लक्षात घ्यावी.त्यातील कांही भाग आजच्या जीवनपध्दतीसाठी जरूर कालबाह्य आहे असे वाटल्यास ते गैर नाही.सुधारीत जीवनपध्दतीत कांही वस्तु-वापर हे गडप झाले आहेत.सध्याचे व पुढे येणारे इतर कालानुरूप बदल लक्षात घेऊन समितीने जी सुटसुटीत सोपी जीवनपध्दती सुचविली आहे, तीचे सविस्तर विवेचन पुढे येणारच आहे.प्रस्तुत अध्यायात मानवाच्या दैनंदिन आचरणातून पुढील जीवनाचा पाया ठरविला जात असतो, हे स्पष्ट केले आहे.छोट्या छोट्या कृतीतून आपली जी वैचारीक अवस्था प्रकट होत असते, त्या वैचारिक अवस्थेतूनच पुढील जीवन घडत असते. या शास्त्रीय आधारावर, पूर्वजानी साध्या, सोप्या दैनंदिन क्रिया करीत कर्तव्य पार पाडता येते, त्यात प्रत्येकाचे शारीरिक आरोग्य, काया-वाचा-मनाचे एकरूपत्व,मानसिक आरोग्य, एकमेकाबद्दलचा जिव्हाळा व देवदेवतार्जन असे सर्वसमावेशक हेतू, कुलधर्म, कुलाचार, कुलोपासना या त्रयीत सुंदर पध्दतीने गुंफलेले आहेत, हे लक्षात घ्यावे. फक्त देवतार्जन असा एकच विषय न घेता त्यात दैनंदिन जीवनातील अनेक विषय सामावून ठेवले आहेत,जेणे करून देवतार्जन आनंदी होईल. तसेच,या अध्यायात.”आहार-मीमांसा” हा भाग निवांतपणे वाचावा.कारण जो आहार आपण सेवन करीत असतो त्या आहाराशी अनेक विषय संबंधीत असतात व आहेत, हे त्या विषयींच्या विवेचनातून स्पष्ट होईल.आहाराचा संबंध देहातील गुणदोष पुढील पिढीत प्रवाहित करण्यापासून ते कुलोपासनेपर्यत असतो, असे वाचून आपल्याला आश्चर्य वाटेल. पण याचा सविस्तर खुलासा जो केला आहे तो नीट ध्यानी घ्यावा. यापुढील विषय म्हणजे,वास्तूपूजन.
लक्ष्मी-सरस्वती पूजन व कुलाचार.हे सर्व विषय दैनंदिन जीवनातील महत्वाचे आहेत.त्याबद्दलचे शास्त्रीय विवेचन अभ्यासण्यासाठी दिले आहे.त्यातील तात्विकता लक्षात आल्यास छोट्या छोट्या विधीत किती आशय दडलेला असतो हे लक्षात येईल.
कुलधर्म (जादा खुलासा.)
ऋषिमुनींच्या काळी जीवनाला उपकारक व संजीवक अशा ज्या ज्या शक्तिंचा परिचय झाला,त्या त्या शक्तिंना निसर्गतत्वानुसार वश करण्याचा प्रयत्न झाला.त्यातूनच मानव-व्यापी यज्ञसंस्था निर्माण झाली.पुढे विकास पावली.अनुभव व्यापक बनला.त्यातूनच गरजेनुसार ऋषिमुनींना निर्गुण निराकार शक्तिला साकार करून पृथ्वीतलावर अवतरण्यास विष्णु,इंद्र,वरुण,यम अशा यज्ञातील प्रमुख देवता झाल्या.त्यांचे स्वरुप बदलून आज त्यांची शब्दांनीच ओळख शिल्लक राहिली. उपासना, उपचार यांचे स्वरुप बदलून पुराडोश, सोमरस, हविद्रव्ये इत्यादी अग्नीद्वारा समर्पण करणे यात सीमित झाला.पुढे हविर्द्रव्ये ही ग्रहणद्रव्ये बनली.ग्रहण न केल्यास प्रसाद म्हणून स्वतः ग्रहण करणे, असे त्याचे स्वरुप बदलले.पुढे तीच उपचार-द्रव्ये बनली.त्यातूनच वस्तूनिष्ठ सेवेला सुरुवात झाली. वैदिक कालात सूत्रे महत्वाची हाती.त्यातील तत्वे निसर्ग-निगडीत होती.यज्ञात नितीयुक्त सेवा होती.प्रत्यक्षात मानवाकडून तशी होतही होती.म्हणून ऋषिमुनीनी लोक-कल्याणार्थ त्रिगुणात्मक शक्तिला तीन प्रमुख पुरुष व प्रकृती तत्वात साकारले.सौम्य स्वरुपातील त्या शक्ति म्हणजे श्रीशंकर व प्रकृती स्वरुपातील श्रीमहासरस्वती, श्रीमहालक्ष्मी,श्रीमहाकाली.यानंतर सेवा अनुमानिक होत गेली.पुढे पुढे आपल्याला आवडेल त्या देवतेशी सेवा जोडली गेली.यातून परकोटीचा बदल म्हणजे “ॐकार”सेवा.
पूर्वीच्या काळी, त्यागाने धर्माची धारणा होत होती.त्यागाला फार महत्व होते.त्यागाला पुढे संकुचित स्वरुप येत गेले.समाजापेक्षा व्यक्ति श्रेष्ठ बनत गेली.व्यक्ति-स्तोम,व्यक्तिपूजेला अनन्य साधारण महत्व येत गेले. यज्ञात देवपूजा, संगतिकरण आणि त्यागाची महती होती. यज्ञात देवतांचे समाराधन होते.आता ते सर्व लोप पावून व्यक्तिला महत्व प्राप्त झाले.त्यातही कांही काळ व्यक्तिमध्ये देवत्व पाहण्याची वृत्ती होती.म्हणून मातृदेवोभव-पितृदेवो-भव,गुरुर्देवोभव,अतिथी-देवोभव असा दंडक घालून दिला.सर्वश्रेष्ठ असा भाव निरंतर जोपासला जावा ही त्या मागील उद्देश!.
तोही लोप पावत असून,त्याची परिसीमा म्हणजे आजचे स्वार्थासाठी केले जात असलेले व्यक्तिपूजन.त्यात ही हीनतेची पातळी गाठण्यात चढाओढ लागलेली दिसते.या सर्वावर मात करण्यासाठी कुलाचार, कुलधर्म यांचे पालन करणे. कुलधर्मात, देवतार्जन थोडेसे असून कुलाचार हा महत्वाचा असून, त्यात प्रत्येक व्यक्तिच्या दैनंदिन आचरणाला महत्व आहे व्यतीगत आचरणात स्वतःपेक्षा इतरांना महत्व देऊन समाजात सर्व स्तरावर समतोलपणा राहील याची दक्षत घेणे. याचाय अर्थ मानवतावाद किंवा मानवतधर्म.