अध्याय ६ उपास्य दैवते व करावयाची उपासना

पूर्वीच्या एका अध्यायात देवदेवतांबद्दल शास्त्राóय मीमांसा केली आहे.त्यात कुलदेवता,कुलदेव,उपास्य दैवते याबद्दल विवेचन केले आहे.अशा देवतांच्या उपासनेतून मानवाच्या जीवनात कोणते व कशाप्रकारे कार्य निरंतर चालत असते याचे विवेचन केले आहे.तथापी तोच विषय पुनःश्च विवेचनार्थ घेण्यातील आशय वेगळाच आहे.मानवी देहात सत्वगुण कसा महत्वाचे कार्य करीत असतो व त्याच्या अस्तित्वाखेरीज उपास्य दैवतांच्या आशिर्वादाचे फल पूर्णत्वाने मिळू शकत नाही, याची मीमांसा त्यात आहे..कारण देहातील तम, रज व सत्व गुण पंचमहाभूत-तत्वाच्या परस्परात समावून जाण्याच्या प्रमाणाशी जरी निगडीत असले तरी त्यातील तम व रजगुण हे देहाशी निगडीत असतात व सत्वगुण हा निसर्ग (आत्म्याशी) तत्वाशी निगडीत असतो.मूळ त्रिगुणात्मक तत्व जेंव्हा साकार होऊन पृथ्वीतलावर अवतरले,ते ‘दत्त’ स्वरुपात,(म्हणजे उत्पत्ती,स्थिती,लय तत्वात).प्रत्येक तत्व स्वतंत्र व सौम्य स्वरूप धारण करून कार्य करीत असतो, त्या वेळी त्यांच्या कृपाशिर्वादाचा काल कमी असतो.सर्व साधारण मानव तेव्हढा काल सेवा करू शकेल,असा असतो.पण खास कृपाशिर्वाद प्राप्त करावयाचा असेल तर सेवा-काल दीर्घ होत असतो.त्यातून सर्व तत्व (तिन्ही) एकत्र असलेल्या ‘दत्त’तत्वाचा कृपाशिर्वाद प्राप्त करावयाचा सेवाकाल सर्वात दीर्घ आहे.तो म्हणजे 36 वर्षे.अशी प्रखर व दीर्घ सेवा, करणारे आजही आहेत, त्यानाच आपण तपस्वी / साधु म्हणतो.सामान्य मानवाला उपास्य दैवतांच्या कृपाशिर्वादाची आवश्कता असते, पण प्रखर सेवा ते करू शकत नाहीत तेंव्हा अशांच्यासाठी परमेश्वरानी एक सोय करून दिली आहे. ती म्हणजे सत्वगुणाची जाणीव होऊन ती वाढीस लागावी यास्तव कुलधर्म व कुलाचार यांचे पालन करून घराण्यातील देवदेवतांचा आशिर्वाद प्रथम प्राप्त केल्यास उपास्य दैवतांचा कृपाशिर्वादही प्राप्त होऊ असतो.कारण उपास्य दैवतांना कुलधर्म व कुलाचारात सामावून घेतले आहे.याबद्दलचे सविस्तर विवेचन या अध्यायात केले आहे ते मनःपूर्वक वाचावे.
विवेचनात घराण्यातील इष्ट देवतांखरीज इतर अनिष्ट देवतांच्या उपासनेतून निर्माण झालेल्या अडचणीतून सोडवणूक करून घ्यावी लागते.’सोडवणूक’ व ‘उद्यापन’ या शब्दातील अर्थ आपल्याला समजलेला नसतो.त्याबद्दलचे मार्गदर्शन मनन करावे.
विशिष्ठ काल-समयाबद्दलची शास्त्राóय मीमांसा ( उत्तरायण, दक्षिणायन,भाद्रपद,अश्विन,श्रावण) नीटपणे समजावून घ्यावी.त्याचे विवेचन बारकाईने एव्हढ्यासाठीच केले आहे कीं, समाजात अनेक प्रकारचे गैरसमज प्रचलित असून सत्य काय, याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे.तो संभ्रम या अध्यायातील विवेचनातून दूर होण्यास मदत होईल.
तसेच सीमोल्लंघन–दिपावली, पोथ्या-कवच-स्तोत्रे वाचन,– बळी देण्या मागची प्रवृत्ती,– कौल-प्रसाद यातील सत्य–.सत्वगुणाचा विकास -संचार अवस्था,–ग्रहदशा,साडेसाती-मंगलाचरण—परमेश्वरावरील निष्ठा–याबाबतचे सविस्तर व शास्त्राóय विवेचन शातपणे वाचावे.त्यातील एक वाक्य
“ अशा प्रथमावस्थेतील उपासना-साधनेने तुमचा जेंव्हा पाया तयार असतो व जेंव्हा जीवनात दोषपरत्वे आलेल्या पीडा निवारण करण्यासाठी तुम्ही साधकाकडे आपल्या दुखनिवारणार्थ जाता, तेंव्हा जीवनातील दुखे निर्माण होण्याची जी कारणे आहेत, त्याला योग्य असे निराकरण केल्यावर, त्या निराकरणपरत्वे तुमच्या जीवनातील किंवा कुटुंबातील दुख तथा अशांतता निर्माण करण्यास कांही दोष कारणीभूत होतात, त्यांच्या निवारणार्थ साधकाला जी उपाययोजना करावी लागते, त्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी जे भक्तभाविक उपस्थित असतात, त्यानी कृपाशिर्वादार्थ आपल्या जीवनाचा पाया जर सुलभ अशा उपासनेतून तयार केलेला असेल, तर हे दोष निवारण होण्यास वेळ न लागता, इच्छित असे प्राप्तसुख आपण सहजासहजी मिळवू शकू.”
समिती जी निराकरण-पध्दती भक्तभाविकांना सूचित करते ती सिध्दसिध्दांत पध्दतीने सिध्द असून, समितीच्या कार्याच्या लाभ शास्त्रीय पध्दतीने जर घेतलात, तर आपणच आपल्या सुखाचे वाटेकरी व्हाल.”