अध्याय ९. ॐ कार साधना.

समितीने ज्या अलौकिक ‘साधना’ सिध्द केल्या आहेत,त्यातील “ॐ कार साधना” ही एक आहे.मानवी जीवनात त्या साधनेचे कार्य महत्वाचे आहे.कार्याची महती व व्याप्ती एकाच वाक्यात सांगावयाची झाल्यास, ती असे सांगता येईल कीं,
“ जे देहिक माध्यम गुरुकृपाशिर्वादाने शुध्द झाले आहे,त्या माध्यमाची शुध्दता सतत कार्यरत रहावी, एवढेच नव्हे तर,आपल्या वंशातील दिवंगतांच्या पूर्वीच्या सात पिढींतील, सद्गती अभावी अडकलेल्या आत्म्यांना सद्गती देण्याचेही कार्य, ह्या ॐ कार साधनेतून होत असते.तसेच येणा-या पुढील पिढीत देखील गुरुंचा आशिर्वाद प्रवाहित करण्याचे ते एक माध्यम आहे.अनेक जन्मांचे कल्याण एका ॐ कार साधनेत सामावलेले आहे “.
अशी ह ॐ कार साधना वंदनीय दादांनी कशी सिध्द केली, त्याचे व त्या साधनेतून प्राप्त होणा-या प्रत्येक फलाचे विवेचन दीर्घपणे,शास्त्रीय मीमांसेवर आधरीत असल्याने ते विवेचन परत परत वाचावे.साधना कशी करावी, कां करावी, केंव्हा करावी, यातील एकेक मुद्दा लक्षात घेऊन तो विषय पूर्णपणे समजून घ्यावा.
ॐ कार साधनेत दोन मुख्य विषय आहेत.त्यातील एक म्हणजे, ज्या देहिक माध्यमातून ही साधना करावयाची आहे,तो देह. त्या देहिक माध्यमाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेणे महत्वाचे व आवश्यक आह्.े दुसरा विषय म्हणजे जी ॐ कार साधना आपण आत्मसात करणार आहोत, त्या साधनेत असलेल्या सूप्त व तरल अवस्थांचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेणेहे आवश्यक आहे.अशा दोन्ही विषयांचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यास आपणासच नव्हे तर इतरांनाही ती साधना आपण इतरांनाही शिकविण्या इतपत आपण सक्षम होऊ शकाल.स्वतःला व त्याच प्रमाणे इतरानाही उच्च प्रतिचे जीवन जगणे सहज शक्य होणार आहे.
पहिला भाग — मानवी देहीविषयी-
१) मानवी देहात जन्मापासून अन्नमय व प्राणमय कोश कार्य करू लागतात.त्यातील प्रथम प्राणमय कोशाचे म्हणजे श्वसन क्रियेपासून सुरू होते.यास्तव ॐ कार साधनेत महत्वाचे कार्य करणा-या पहिल्या टप्यातील कार्य करणारी श्वसन-संस्था कशी मह्तवाची आहे हे समजेल..
श्वसन संस्थेमार्फत होत असलेले कार्य म्हणजे आपण घेत असलेल्या श्वासात प्राणवायु असतो.तो फुफ्फुसाद्वारा संपूर्ण शरीरात खेळविला जातो.यात वायुकाशाचे कार्य कसे महत्वाचे असते ते खाली नोंदविले आहे.
२) रक्ताभिसरण यातून सर्व अशुध्द रक्त दोन महानीलांद्वारे उजव्या कर्णिकेत येते.पुढे ते उजव्या जवनिकेत जाते.उजव्या जवनिकेतून ते एका रोहिणीद्वारे फुफ्फुसात जाते.फुफ्फुसात ते वायुकोशाभोवतीच्या अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यामधूनप्रवाहित होते.याचवेळी प्राणवायु, वायुकोशाभोवतीच्या रक्तवाहिन्ययातील रक्तात शोषला जातो.रक्तातील कर्बवायु वायुकोशात ओढला जाऊन, तो उच्छ्वासावाटे वातावरणात फेकला जातो.प्राणवायुने युक्त असे रक्त हृदयामार्फत संपूर्ण शरीरात पुरविले जाते.अशी क्रिया होत असताना कोणतीही पेशी पूर्ववत् आपल्या स्थानी परत येण्यास सर्वसाधारण तीन मिनिटे लागतात.
३) प्राणायामः-.नेहमी श्वासोच्छ्वासात हा, १8 ते २0 वेळा होत असतो.परंतु प्राणायामाने हे बरेच कमी होते.संथापध्दतीने जेंव्हा नामस्मरणाचा उच्चार होतो,त्यावेळी नैसर्गिक व्यायाम होत असतो म्हणजेच प्राणायाम होत असतो..
४) सद्गुरुनामस्मरण संथा पध्दतीने होत असताना त्यातून तीन वेळा नैसर्गिक प्राणायाम होतो.ॐकाराचा उच्चार संथा पध्दतीने केल्यास ध्वनिलहरी प्रकाशमान होऊन, शरीरातील पेशीत,प्रकाशमान झालेल्या ध्वनिलहरी धारण होत असतात.अशावेळी अति तरल अवस्थेत जे कार्य होत असते ते सर्व साधारणपणे व सहजासहजी लक्षात येणारे नाही.पण ते कार्य होत असते हे निश्चित.ते म्हणजे.पूर्वकर्मातील प्रथमावस्थेत असलेल्या दोषांची शुध्दता करण्याचे कार्य होत असते.याचाच अर्थ ॐ कार लहरी परलोकातही कार्य करू लागतात.
5) देहिक शक्तः-अशा प्रकारे शुध्द झालेल्या रक्तातून,श्रीसद्गुरुंनी सिध्द केलेल्या ॐकारातून गुरुशक्तिचा पुरवठा होत असल्याने रक्त शुध्द व समृध्द होते.म्हणजे ते.पर्यायाने देहिक शक्तिला गुरुशक्तीची जोड मिळते.म्हणून देहिक शक्ति कमी खर्च होत असते.याचा परिणाम म्हणजे,न कळत आहार कमी होत असतो.अन्नमय कोशाची शुध्दता होत असते.तो विकसित होत असतो.
6) आरोग्य :-रक्तात धारण होणा-या गुरुशक्तीमुळे प्रकृती स्वस्थ्यावर चांगला परिणाम होत असतो.हृदय विकार,रक्तदाब आदि विकारापासून साधक दूर राहतो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यापासून ते शरीराचे तपमान समतोल राखण्याचे कार्यही होत असते.
7) न्यायः- ॐकार साधनेत न्यासाचे महत्व आगळेच आहे कारण ते नव्यानेच संशोधलेले तंत्र असून ते कार्य अति सूक्ष्म व तरल अशा रक्तवाहिन्यातून होत असते.नियमित होणा-या रक्त प्रवाहात, उच्चारातून व आचरणातून ॐकारातील ध्वनीलहरी व प्रकाशलहरीना स्पर्शसंवेदनातून सामावले जाते.अशा प्रकारे सक्षम झालेल्या रक्तप्रवाहाचा निश्चित मार्ग देहात ठराविक उद्दिष्ठासाठी खेळविला जातो जेणे करून देहातील पांचही स्थाने शुध्द होऊन देहाच्या विकासासाठी कार्य करू लागतील.
ज्या स्थानातून तळहातावरील संवेदनक्षम उंचवटे व बोटावरील उंचवटे त्वचेला अलगद स्पर्श करून फिरत असतात त्यावेळी ध्वनीलहरी व ॐकारलहरी (म्हणजे गुरुशक्ति) स्पर्शसंवेदनामुळे रक्तात सामावल्या जातात.पुढे असे सक्षम रक्त नियोजित पध्दतीने संपूर्ण देहात खेळविले जाते.असे शुध्द व सक्षम रक्त देहात खेळविताना गुरुशक्तिची धारणा पहिल्या तीन न्यासामुळे संपूर्ण देहाच्या शुध्दतेचे कार्य करीत असते.
वंदनीय दादांनी सिध्द केलेले पांच न्यास म्हणजेच मानवला मिळालेले वरदानच आहे.ती वंदनीय दादांनी मानवाला दिलेली खास देणगी आहे.हे लक्षात घेऊन, न्यासाचे शास्त्रीय विवेचन ध्यान देऊन आत्मसात करावे.
प्रत्येक न्यासाचे कार्य वेगळे असून त्यातून प्रवाहित केली जाणारी,ॐकार व गुरुशक्ति देहात धारण झालेल्या दूषित वलयांचे विमोचित करण्याचे कार्य करीत असते.त्याचे स्पष्टीकरण म्हणजे, न्यास करीत असताना,दोन्ही हाताच्या तळव्यानी देहाच्या वेगवेगळ्या व ठराविक स्थानापासून ते शेवटच्या ठराविक स्थानापर्यंत केलेल्या हळूवार स्पर्शाने,उच्चारातून व श्वासोश्वातून देहात घारण झालेली ॐकार व गुरुशक्ति विविक्षित प्रकारे पुरविली जात असते.त्वचा ही अनंत छिद्रानी बनलेली असते.त्वचेच्या खाली सात स्तर असतात.त्वचेच्या पहिल्या चार स्तरातून अपायकारक द्रव्ये म्हणजे घाम याचे विसर्जन होत असते.पुढील तीन स्तरांमध्ये चरबीचा समावेश असतो.न्यासाद्वारे चरबीतील अनावश्यक चरबीचे निर्मूलन होत असते.देहाची शुध्दता व पर्यायाने देह विकसित होण्याचे कार्य चालू होते.
8) आचरणः-ॐकारातून रक्तात समतोल तपमान राखला जातो, त्यातून.आचार-विचार देखील संतुलित ठेवण्यात मदत होते.जेणेकरून आचरण शुध्द होण्यास मदत होते.यातूनच पुढे, शरीरातील विविध प्रकारच्या स्त्रावांना समतोल राखण्याचे कार्य करीत असतात.म्हणून विचारात समतोलपणा येत जातो आणि त्याचा परिणाम आचरणात शुध्दता व समतोलपणा येण्यात होतो.
अशाप्रकारे,अंतर्गत देहात व मानवाच्या बाह्य आचरणात ॐकार साधनेतून अनन्य साधारण असा प्रभाव पडत असतो.अशा प्रकारे सर्वोत्तम बदल घडविण्याचे सामर्थ्य़ इतर कोणत्याच साधनेत क्वचितच पहावयाला निळेल.
9) वाणीची शुध्दताः-ॐकाराचा उच्चार हा पांच स्थानातून (नाभी,हृदय,कंठ,ललाट व ब्रह्म) करीत असतां,ध्वनीलहरी प्रकाशमान होतात.अशा प्रकारे प्रकाशमान झालेल्या ध्वनी लहरींचा उच्चार वाणीतून होत असतो.नित्य ॐकार साधनेने व त्यातच एकाग्र होऊन,केलेल्या साधनेने स्थानांची शुध्दता तर होतेच पण वाणीही शुध्द होत असते.ह्या सर्वांचे रूपांतर आपल्या दैनंदिन आचरणात व्यक्त होत असतो.ॐकार रूप झालेले काया-वाचा-मन एकाग्र होत असल्याने नित्य कामे सुरळीतपणे पार पाडली जातात.अडचणी आल्याच तर त्या लीलया पार पाडण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.दिवस उत्सहितपणे पार पाडीत जीवन योग्य प्रकारे व्यतीत होते.
१0) साधनाः-ॐकार साधना स्थळ,काळ,वेळ याचे भान ठेवून केल्यास,त्याचे विषेश परिणाम पहावयास मिळतात.कारण नैसर्गिक वातावरणाचा परिणाम नकळत देहावर व देहांतर्गत होत असतो.उदा. ब्रम्ह मुहुर्तावर केलेल्या साधनेत तेज-तत्वाचे आगमन होत व आकाश तत्वाचे गमन होत असते. अशावेळी समतोल राखला जाऊन तेज-तत्व व आकाश-तत्वाचा योग्य तो पुरवठा, अवश्यक अशा प्रमाणात होत असतो.अशी वेळ म्हणजे संध्या-समय व संधी-समय.
११) आसनः- योग्य प्रकारचे आसन असल्यास,देहातून विसर्जित होत असलेली दूषीत शक्ति बाहेर फेकण्यास मदत होते.अंतर्गत शुध्दता होण्यास चालना मिळते.शक्यतो लोकरीचे अगर धूतवस्त्र असावे.
१२) विमोचनः-सर्व साधारण मानवी जीवनांत, काया-वाचा-मन या त्रिपुटीचे कार्य समप्रमाणात होत नसते. त्यामुळे कर्मदोष व ऋणदोषांची निर्मिती होत असते.याचे कारण असे कीं, मनाची गती अमर्याद असते,तर देहाची गती पृथ्वीच्या गतीप्रमाणे असते.ज्यावेळी मनाच्या गतीवर नियंत्रण ठेवून कायेने व वाचेने क्रिया केली तर ती क्रिया व पुढील कार्य हे सम प्रमाणात होऊन कार्य करू लागताच, मनाचा त्यात समावेश होतो.अशा प्रकारें त्रिपुटी एकत्र करून जीवन जगत राहित्यास,जीवनात सुख-शांती-समाधान यांची प्राप्ती होत असते.म्हणजेच उच्चार,विचार व आचार हे संतुलित होऊन कार्य करीत असतात,त्यामुळे जीवन समतोल बनते.जीवनाला आकार येत असतो.
१३) दीक्षाः-वरील प्रमाणे कर्मांचे व ऋणानुबंधांचे विमोचन होताच, सद्गुरु कृपावंत होऊन दीक्षा देतात.एकूण पांच दीक्षा जरी असल्या तरी आपले देहिक माध्यम त्या धारण करू शकत नसल्याने गुरू,ती दीक्षा पांच भागात विभागून देतात.म्हणजे देहिक विकास जस जसा होत जातो, तस तशा दीक्षा सामावण्या इतपत दिल्या जातात.दीक्षा धारण होऊन आपण ज्यावेळी ॐकार साधना उत्तरोत्तर धारण करीत असतो,त्यामुळे आपली अवस्था साधक या अवस्थेतून सिध्द ह्या अवस्थेप्रत जात असते.ही ‘सिध्द’ अवस्था टिकविणे अति कठिण असते.कारण त्या अवस्थेत प्रलोभने येत असतात.अशावेळी अवधान ठेवणे कठिण जाते.सभोवारच्या परिस्थितीचा व सवयींचा प्रभाव पडत असतो,त्यासमयी दीक्षापरत्वे प्राप्त झालेल्या उच्च अवस्थेचे भान राहात नाही.
अशा प्रकारे शुध्द झालेले देहिक माध्यम,काया-वाचा-मन यांच्या एकरूपत्वातून कार्य करीत असल्याने ते शक्तीमान होते.म्हणून तो शुध्द व विकसित होत असलेला देह इष्टकर्तव्यार्थ कार्यान्वित होऊन इतरांच्या कल्याणासाठी कांही करण्याचे उद्दिष्ट साधता येते.देह त्यासाठी समर्थ होतो.
समितीची कांही वचने-
१) “गुरुमार्गदर्शनाप्रमाणे विमोचनादि विधी झाल्यावर आपण भक्तांस साधक अवस्था प्राप्त होते”.
२) “वास्तविक शास्त्रशुध्द पध्दतीप्रमाणे जीवनाची सार्थकता याचा अर्थ असा कीं, अंगिकारलेल्या साधनेने हे काया-वाचा-मन ईश्वरमय विचारांनी एकरूप करणे”.
३) “गुरुमार्गात गुरुशक्तीचे रूपांतर हे साधनेद्वारा रक्तांत केले जाते.याउलट हठयोगी ही शक्ति कायेशी एकरूप करतात.म्हणून जरी अनेक प्रकारचे चमत्कार करीत असले तरी त्याना दुखनिवारणार्थ पीडितांना आशिर्वाद देता येत नाही”.
४) “ॐ कार साधना ही संजीवनीप्रमाणे आहे, किंबहुना त्याहीपेक्षा श्रेष्ठ साधन आहे”.
5) “ज्या सोप्या अशा मार्गाचा अवलंब केला असतां,ही तिन्ही माध्यमे एकाच पातळीवर येऊन,समप्रमाणात जर एक झाली तर जीवनातील सुख,शांती,समाधान ह्या देहाबाहेर नसून,आपल्यातच आहेत हे अनुभवास येईल व आपण विश्वशांती निर्माण करू शकू, हा विश्वास आपल्यात निर्माण होईल”.