1.1.62. प.पू.महंमद जिलानी बाबा.
आजच्या नव-वर्षदिनी सुख,शांती व समाधान निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा असा मी तुम्हाला आशिर्वाद देत आहे.आजपर्यंत बाबांची पूजा केलीत पण त्यात अर्थ होता की परमार्थ? याचे उत्तर असे देता येईल की अर्थ किवा परमार्थ नहता तर स्वार्थ होता.हे सगळे दैवदैविक कशासाठी तर आर्थिक लाभासाठी.आज परमार्थासाठी काय केलेत? आर्थिक तरी निरासक्तबुध्दीने केलेत काय?जी काही कर्तव्ये आहेत ती कर्मऋणानुबंधामुळे. रूपये मोजले पण नामःस्मरण मोजलेत का? रूपयावर छाप सरकारचा.पण परमार्थावर छाप तुमचा पाहिजे.दुसऱयाचा चालणार नाही.कर्मऋणानुबंधाप्रमाणे नोकरी मिळणारच आहे.त्यासाठी कृपा वापरण्याचे कारण नाही. आशिर्वाद वापरलात मग तरी सुख मिळेल का? जर इतरेजनांचा ऋणानुबंध मुक्त झाला असता तर सुख मिळाले असते. मातेच्या उदरातून बाहेर आल्यावर जे एकदा हातपाय हालवू लागता त्या वेळेपासून शेवटच्या क्षणापर्यंत कर्मऋणानुबंध तुमच्या बरोबर असतो.कृपा ही इतरेजनांसाठी व कर्मऋणानुबंधाशी वापरायची नाही तर जन्मऋणानुबंधाशी वापरायची.नोकरी दुसऱयाची करता म्हणून पगार मिळतो.कर्मऋणानुबंध निश्चित दुसऱयासाठी आहे.देवऋणानुबंध तुम्हाला इतरेजनांच्या ऋणानुबंधातून सोडविल.साधनेला कार्य-केद्रावरच आले पाहिजे असे नाही.तर घरीसुध्दा चालेल.मात्र देवऋणानुबंध असायला पाहिजे की ज्यामुळे येणारे अपघात टळतात.(टळत असतात).प्रपंचाला परमार्थाची जोड नाही म्हणून दुख प्राप्त झाले.कर्मामधून या जीवनाचे जे सार्थक होणार आहे ते परमार्थिकच आहे.आंबा हा कधीच आंबट नसतो.आपण फळ कच्चे असताना पाडतो म्हणून आंबा आंबट लागतो.तसेच कर्म परिपक्व होऊ द्या.“माझी जन्मऋणानुबंधापासून मुक्तता करा” असा आशिर्वाद मागा.तो ऋणानुबंध मोकळा नाही म्हणून कर्म व इतरेजनांचा ऋणानुबंध मागे लागतो.तुमचा जन्म होतो त्यावेळी काया लहान असेल पण जन्मऋणानुबंध परिपक्व असतो.गर्भधारणा झाली की लगेच जन्म व कर्मऋणानुबंधाला सुरुवात होते,दोन्ही परिपक्व होऊन मग तुमचा जन्म होतो.या दोहोंबरोबर देवऋणानुबंध असतो व लहानपणापासून त्याचा संस्कार झाला तर तुम्हाला तो तारून नेईल.तसे झाले नाही तर एक हात लुळा पडल्या सारखी तुमची अवस्था होईल.अशा लु•या पडलेल्या हाताखाली प्रसाद देऊन बाबा टेकण लावतात.कवी काय म्हणत आहे की,“नही देर लगती मुकद्दर बदलते” पण मुकद्दर बदलायला स्वतः तुम्ही बदलायला पाहिजे.अंगावरचा कोट काढल्या शिवाय सचैल स्नान होणार नाही.कर्मऋणानुबंध ही आई आहे व जन्मऋणानुबंध हा बाप आहे असे हे दोन्ही बरोबर घेऊन मनुष्य सुख मिळविण्यासाठी परमेश्वराला चाचपडतो आहे.उशीर होऊन चालणार नाही कारण सगळे पुढे गेलेले आहेत.झाडावर कलम करतात.त्याप्रमाणे कर्मावर देवऋणानुबंधाचा संस्कार करावयाचा. देव पावावयाला फार सोपा.तुम्हाला दिले त्याच्यांतच त्याचे पोट भरले.बाबांनी ही गाडी दिली आहे.ती अमोल आहे.त्यात या जीवनाचा कचरा पडू द्या.एक दिवस तरी असा येऊ दे की अगदी पुरे-पुरे माप आमच्या झोळीत टाकारण.पैसे देण्याला आम्हाला दुख नाही पण इतरेजनांचा ऋणानुबंध असेल तर दिलेले 10हजार रुपये घेऊन जाईल,एवढा जबरदस्त ऋणानुबंध असतो.
लक्षाधिश व भिकारी या दोघांनाही सुख नाही एक दगडावर झोपतो व दुसरा गादीवर.पण दोघांची गाडी अडलेली आहे.पेशानी बोलता येत नाही.अज्ञान झोळीत टाका.उपासना कोणाशी जोडायची हे कळलेच नाही.तुमची उपासना तुमच्याशीच जोडायला सांगत आहे.अज्ञान जात नाही म्हणून कृपेचे Pressureपाहिजे.मार्गाच्या बाहेर असणा-याला 100 प्रश्न पण मार्गात असणा-याला एकच प्रश्न व तो म्हणजे “भगवंता,तू एवढा प्रयत्न करतोस पण मी अजून का नाही उध्दरत! ” अन्न Kitchen मध्ये शिजते पण हा अन्न खावून झोपायला Bed-room मध्ये जातो.आम्हाला जागाच कोठे आहे!वास्तविक भिंतीवर मला बसता येत नाही पण भिंतीत मारलेल्या एका खिळयावर मी बसतो पण तुला मार्गात बसविल्याशिवाय रहाणार नाही.पण खिळा तरी तुझ्या कर्मानुबंधातला आहे का? खेदाने म्हणावे लागते कीं ज्या खिळयावर मला बसविला तो दुकानातून आणलेला नवीन खिळा नसून आपल्याच दरवाज्याच्या बाहेर सापडलेला व कधीतरी कामाला येईल म्हणून जपून ठेवलेला खिळा असतो.घरोघरी हेच बघायला मिळेल.पण परमेश्वराला त्याचे दुख नाही.कारण तो जाणतो की हा नैसर्गिक मानवी धर्म आहे.जोडे घालून देवाला शिवलात तरी चालेल.जोडयांचा विटाळ नाही.पण तुमचा विटाळ होतो.त्या एका प्राण्याने आपले कर्तव्य केले व तुम्हाला जोडे मिळाले. ऊन्हापासून पायाला संरक्षण मिळाले.तुम्ही देखिल असेच कर्तव्य कराल त्यावेळी मला विटाळ होणार नाही.अजून जोडयांची लायकी आपणात आलेली नाही हे लक्षात असू द्या.माझ्यासमोर बसता व पेन कोणाचे आहे तर “माझे आहे” असे उत्तर देता.पेन अनेक रंगाची आहेत.पण बाबा एकच आहेत.
जन्माला येण्याचे कारण पहिले.त्यासाठी अनुष्ठान लावायस पाहिजे.पण तुम्ही अनुष्ठान अडचणीसाठी म्हणजे दुस-या कारणासाठी लावता.रामाला ब्रम्हविद्या वसिष्ठाकडून व क्षात्रविद्या विश्वामित्राकडून मिळाली.राम वनवासात गेला आणि त्याचे कार्य चालू झाले.ज्या मातेने श्रीकृष्णाला 9 महिने संभाळला तिला पुढे सांभाळ करणे जड होते का? पण तसे झाले असते तर,मातेचे वात्सल्य कृष्णाच्या आड आले असते म्हणून त्याला दुसऱया मातेकडे जावे लागले.हे सर्व ऋणानुबंध आहेत.ज्ञानेश्वरांच्या वडिलानी सन्यास घेतला,पण त्याच्या गुरुला कळले की अजून ऋणानुबंध बाकी आहे.म्हणून त्याना संसारात पुन्हा पाठविले.“तुझे कार्य अपुरे राहिलेले आहे तरी संसारात जा व प्रजोत्पत्ती कर”. ही गुरुची आज्ञा घेऊनच संतती जन्माला आली व ती अमर ठरली.या प्रकारामुळे त्याना धर्माने टाळले पण कर्माने जवळ केले.आजपर्यंत गव्हाचा कोंडाच खाल्ला कणीक नाही.नुसता कोंडाच पोटात गेल्यास ठसका लागेल म्हणून त्यात थोडी कणीक मिसळून देत असे.पण तुम्हाला त्याचे ज्ञान झाले नाही.आता बाबांना म्हणा की आम्हाला कणीक द्या.त्याची गोडी अवीट आहे.सगळे काही मागा.रममाण व्हा.प्रपंच करा.पण आशिर्वाद घेऊन. सहाध्यायी कोणाला केले आहे याची जाणीव ठेवा.समर्थ बोहोल्या वरून पळून गेले.कर्मऋणानुबंध सांगत असतो की हे शुभ आहे,मंगल आहे.पण सावधान रहा.पण आज दृष्टी अत्यंत विकृत झालेली आहे.लग्न लागल्यानंतर एकमेकाच्या गळयात नुसतीच फुलांची माळ घालावयाची नसते तर एकमेकारणा मांगल्याचा संस्कार द्यावयाचा असतो व प्रार्थना करावयाची की काही अमंगल जन्माला न येवो.आता जोडे घालूनच लग्न लागते म्हणून सगळा -हास झाला आहे.एकत्र आणताना हे अमंगल आहे असे सांगितले नाही.पण विवाहोत्तर जीवनात काही अमंगल असू नये,ही भावना.कामेच्छा अमंगल.पण पति-पत्नी मंगल व म्हणून शुभमंगल.
लग्न पहिल्यांदाच रजिस्टर केलेले होते व अनरजिस्टर होऊ नये म्हणून शुभमंगल पाहिजे.या त्रिभूवनात तुमच्यासारखे भाग्य कोणाचे नाही. धन्यता माना की,गुरुपीठ असे मिळाले आहे की,जेथे अज्ञानाने नमस्कारसुध्दा करावा लागत नाही.एकाच्या जीवनात धर्म आल्यावरच अनेकाच्या जीवनात आला.मूर्ती स्थापन झाल्यावर भक्त अनेक! मी किती तुमच्याशी जपून वागतो पण तुम्ही समोर बसल्यानंतर कसे वागता, उठता-बसता हे दिसत असते पण बोलता येत नाही.एखादा शब्द बोलल्यास लागणार तर नाही ना? एवढय़ा हळूवारपणे तुमच्याशी बोलावे लागते.दगडातून मूर्ती टाकीचे घाव घेत-घेत तयार होत असते.किती हळूवारपणे घाव घालावे लागतात.चुकून जोराचा फटका बसला तर पापणी तर उडणार नाही ना?ही जशी काळजी मूर्तीकाराला तशीच मला तुमची घ्यावी लागते.पण एवढे सर्व करीत असता तुम्ही माझ्याशी कसे वागत असता याचा कधी विचार केलात का? तो कारण फार वेगळा होता.
मौजीबंधना नंतर पहिली भिक्षा “अग्नी मिळे पुरोहितं”,“अहं ब्रम्हास्मि” व चौथी भिक्षा गुरुपाशी! गुरुगृही जाऊन 12 वर्षे विद्याभ्यास करावयाचा. प्रातःकर्मे आटोपल्यानंतर संथा घ्यावयाची.उदात्त, अनुदात्त,स्वरीत, मंडल संहिता व गायत्रीतुल्य वाणी साध्य करावयाची.श्रृति म्हणजे ऐकले.मनन केले व लिहीले ते स्मृती ! शिकलात पण जीवनाला आवश्यक असे ज्ञान घ्याल,संस्कार करवून घ्याल तर लिहू शकारण.आज जीवनक्रम बदलला आहे व -हास होत अहे.उत्पत्ती, प्रथम संकट व मग देव!प्रथम लय व मग उद्या सूर्याचा उदय असा कधी होतो का?