2.1.1962
1962 हे साल सिध्द होण्यासाठी नाही तर साध्य मिळविण्यासाठी आहे.तुमचा दृष्टीकोन असा पाहिजे की बाबा इच्छित-कामना पुरी करत आहात म्हणून तुमच्याकडे आलो नाही किवा ती कामना पुरी करत नाही म्हणून देखील तुमच्याकडे आलो नाही.यापुढे मला पाहिजे ते मी माझ्या ईश्वराकडून मिळविन.दुकानदाराला साखर मागितली तर साखर मिळते.दुकानदार वजन तुमच्या पदरात टाकत नाही.दुसर्या गिर्हाईकाना साखर देताना वजनाची जरूरी लागेल. तुम्ही समोर बसून अपेक्षा केलीत की ती मी तोलतो.अपेक्षा ही सिध्द आहे व वजन हे साध्य आहे.
तुमची गाडी अडली होती ती ढकलत-ढकलत आम्ही पंपावर आणली.पदराचे पैसे खर्चून पेट्रोल घातले.आता सुरू तुम्ही केली पाहिजे.पण तुम्ही म्हणता की अजून गाडी ढकला.तुमचा जीवात्मा असाच अडला आहे.पातकामुळे तो त्रस्त झाला होता.मला सोडव म्हणून त्याने देवाकडे धाव घेतली.त्याने टाहो फोडला,पण तुम्हाला वाटते की आपल्या इंद्रियात काही बिघाड झाला आहे,जिथून मार्गाला लागलो तिथे काया,वाचा,मनाला सोडले पाहिजे.
हा गुरू असा आहे की तुम्हाला सुख आठ दिवसानी मिळायचे असेल तर तो आजपासूनच तुमच्याकडे सुख पाठवील.पण त्याचप्रमाणे दुखही आठ दिवस आधी पाठवील.याला म्हणतात गुरू.जालंदरनाथांनी गोपीचंद राजाचे पाच पुतळे भस्म केले.याचा अर्थ समजला का? गोपीचंदांच्या ज्ञानेद्रियांच्या व कर्मेद्रियांच्या ठिकाणी पंचतत्त्वाची असणारी विशुध्दता जाळून टाकली.त्याचवेळी तो दीक्षा घ्यावयास सिध्द झाला.
आपत्तीच्या रूपाने तुमच्या मागे कर्माचे पुतळे उभे करून तुमची विशुध्दता जाळून टाकत आहे.जेवण करून झोपल्यावर दुसऱया दिवशी अन्न पचन झाल्यास तरतरी वाटते.वाजवीपेक्षा अधिक अन्नग्रहण केले असल्यास करपट ढेकर येते.साधनासुध्दा अशीच करायची असते.मला तुम्हाला जगापुढे लखलखीतपणे उभे करायचे आहे.जगाला दाखवून द्यायचे आहे की गुरूकृपा झाल्यावर लाख रूपये मिळत नाहीत तर मनुष्य कसा भिकारी होतो.या गोष्टीने आपल्या सभोवतालचा अंधःकार दूर होईल.