आत्मनिवेदन पान 4 ।। श्री शक्तीपीठ प्रार्थना ।।

।। ॐ ।।

।। श्री शक्तीपीठ प्रार्थना ।

आम्ही गुरूभक्त श्री जगद्गुरू साईनाथ महाराज यांचे चरणी भक्तीभावनेने आज अशी प्रार्थना करीत आहोत की आपण कृपावंत होऊन जगत्कल्याणासाठी “गुरूशक्तीपीठाची स्थापना” करून दिली आहे.त्या शक्तीपीठाची सेवा विनम्र भावनेने, श्रध्दा, भक्ति, निरपेक्ष, नःस्वार्थ बुध्दीने करून जे कोणी ह्या जगतात दुखी कष्टी आहेत त्यांची सेवा काया वाचा मनाने करू.

जगतात आम्हां मानवांना प्राप्त झालेल्या जन्मातील कर्तव्याची जाणीव व्हावी व जगतात सर्व मानवाला सुख,  शांती , समाधानाचा लाभ होऊन जगतात मानवी धर्माचा उदय होऊन मानवी जीवन ईश्वरमय व्हावे अशी आपल्या चरणी प्रार्थना.

 

।। शुभं भवतु ।।

>>