24-1-1961 भावना.

माणसाला दोन देणग्या मिळालेल्या आहेत. – बुध्दी व मन.

डोळे व कान ह्याने बाह्या जगताचे माणसाला ज्ञान होते.मेंदू आक्रोडासारखा आहे.त्याभोवती द्रवरूप पदार्थ आहे.डोळे व कान ह्याने माहिती पुरविल्यामुळे पदार्थाचे ज्ञान मेंदूला होते.उजव्या बाजूला विचारांचा साठा आहे.मेंदूतील विचार अनिश्चित स्वरुपात त्या विचाराच्या कोठारात जमा होतात. (आ.2) दुखाशिवाय सुखाचा अनुभव मिळणे अशक्य आहे.सुखाची मजा दुखाशिवाय नाही.दुख सुख देते.निसर्गात 24 तासाचा  दिवस असत नाही.अर्धा दिवस व अर्धी रात्र,जसा प्रकाश तसाच अंधारकिवा उन्हाळा-पावसाळा-हिवाळा असे ऋतु असतात.तसेच संसारात निरंतर सुख असू शकत नाही.जेमतेम चटणी-भाकर मिळत असलेल्या माणसाला भाजी दिल्यावर त्या भाजीत त्याला जे सुख लाभते तद्वत दुखाशिवाय सुखाची गोडी कळणार नाही.रात्रीशिवाय आकाशातील चंद्र,तारे यांची शोभा कशी कळणार ?

अज्ञान हीसुध्दा ज्ञानाची अवस्था आहे.

बालपणी अज्ञान होते तारुण्यात ज्ञान होते व त्याचे रुपांतर अज्ञानात होते.तारुण्यात वडिलांनी लहान असताना भीमरुपी शिकविणारे वजिल मूर्ख होते अशा रितीने वृध्दावस्थेलाही कमी लेखून मिळलालेल्या ज्ञानाचे रुपांतर अज्ञानात होते.तुम्ही निर्वाहाचे ज्ञान घेतले.ते घेऊन नोकरी करू लागलात.नोकरीचे 8 तास काम करणारा आर्किटेक्ट 3 महिन्यात 1 कोटीची इमारत बांधू शकतो.परंतु 8 तासा व्यतिरीक्तच्या वेळात विचार त्याच्याच जीवनाची इमारत ढासळून टाकतात. ऑफिसातील विचार विधायक तर ऑफिसबाहेरील विचार विध्वंसक ठरतात. आम्ही जन्मतःच आईला रडविली.जन्माला आलेल्या बालकाच्या पाठीत एक धपाटा मारून त्याचे नाक मोकळे झाल्यावर ज्याप्रमाणे श्वसोश्वास सुरू होतो तसा गुरूकडे आल्यावर तो पिढीत धपाटा देतो.याप्रमाणे तुमचे विचार अनिश्चित असतात.ते निरंतर स्वरुपाचे नसतात.

नोकरीत आपल्यापेक्षा जास्त पगारदाराप्रमाणे तुम्ही वागू लागलात म्हणजे कर्जबाजारी झाल्यावर इथे विडा लावायला येता.वास्तविक कर्जाला जबाबदार तुम्हीच. एक मनुष्य आपल्यापेक्षा श्रीमंताकडे पाहतो.तो श्रीमंत त्याच्या पेक्षा जास्त श्रीमंतकडे पाहतो व याप्रमाणे या चक्र व्युहात सर्व आडकले जातात.

पूर्वजन्मी मनुष्याचे ठिकाणी असलेले विचार या जन्मी विसरून जातो.कारण मरणोत्तर त्याचे विचार वातावरणात विनील होतात.

मन हे काचेप्रमाणे आहे.काचेतून पलीकडील वस्तू दिसतात,परंतु त्याच काचेला पारा लावल्यास प्रतिबिंब दिसते. म्हणून मनाच्या काचेला सद्गुरूकृपेच्या निष्ठेचा पारा लावा.मनाने ईश्वरावर विश्वास ठेवा.विचाराने विश्वास ठेवणे म्हणजे अज्ञान ! अहंकार! कुटुंबातील मनुष्याचे वयात अंतर असल्यामुळे त्यांची वैचारिक पातळी सारखी नसते.म्हणूनच मतभेद असतात.

मनाचे प्रेम मनाला असते.म्हणूनच ये ये करताच घरातील कुत्रे तुमच्याकडे धावत येते.म्हणूनच तुम्हां आबालवृध्दांची वैचारिक पातळीत फरक असल्यामुळे आम्ही तुमच्या मनाशी बोलतो.मन सर्व माणसांचे व परमेश्वरापाशी एकच समान आहे.

 मनाचे कार्य हे चैतन्याचे कार्य आहे.

 दृष्टीचा दोष चष्म्याला समजतो.डॉक्टरला नाही.

तुमचे मन कशाने बिघडले आम्ही सांगत नाही.परंतु चष्मा आवश्य देतो.15 रुपयाचा चष्मा दृष्टी देतो.तर सद्गुरुकृपेने दृष्टी बदलली तर सृष्टी दिसेल. निर्णय घ्यायला शिका,मनाने बाबांना जवळ करा.मनाचे सामर्थ्य फार आहे.तथापी विचाराशिवाय मनाचे कार्य नाही.मनाच्या गाडीला विचारांचे घोडे लावले पाहिजेत.

3  – – ब्रम्हा . .    विष्णु . .        महेश (सद्गुरू)

3 – – आचार       विचार          आहार

3 X 3 =9 ;       3 + 3 = 6 ;  3 — 3 = O

सद्गुरू   3          3                 3

मी     X   3       + 3               — 3

____       ____            _____

9 (3)      6 (2)             O (1)

उलट क्रमाने गेल्यास मी  जन्मतःच दुधाच्या भुकेखेरीज ज्ञान नव्हते.म्हणजे मी शून्य होतो.ही बाल्यावस्था.पुढे माझ्या ठिकाणी 6 दोष होते.सबब मला नवविधा भक्ति करावी लागली.पुढे मी सद्गुरूरूप झालो.

एखादा विचार आला म्हणजे तो मेंदूतून खालील सहा विकारापैकी एखादा जागृत करतो.परंतु तोच खालील पातळी जी भावना तेथपर्यंत पोहोचला तर त्या भावनेमार्फत मनापर्यंत पोहोचतो.

[या मुलाखतीत बुध्दी व मन या विषयी जे विचार मांडले आहेत तेअभ्यासण्यासाठी दिले आहेत. विशेषतः मनाच्या कार्याबद्दल केलेला खुलासा पूर्णपणे समजेपर्यंत वाचावा.त्यावर चिंतन करावे म्हणजे आपल्या आचरणात योग्य ते बदल घडत जातील. ]