26-1-1961 (सकाळी ) आत्मप्रचिती म्हणजे काय?
आत्मप्रचिती म्हणजे काय?
हल्लीच्या व्याख्येप्रमाणे एखादा धार्मिक विषय किवा (ज्ञान) मलाच समजतो,इतरांचा तो विषयच असू किवा होऊ शकत नाही.त्या विषयांचे प्रतिपादन करणारा मी एकच,हा जो अंहंभाव, त्याचे आत्मप्रचिती! वास्तविक आत्मप्रचिती, आत्मबोध, आत्मानुभव,आत्मनिवेदन या शब्दाच्या अवडंबराला अर्थ नाही.
हे शब्द म्हणजे शिडय़ा आहेत.या शिडय़ांच्या एखाद्याने चौथ्य़ा मजल्यावर चढून जावे व त्या परक्याच्या इमारतीत जाऊन वरील मजल्यावर बेल वाजवावी. दरवाजा न उघडला गेल्यामुळे कोणाचीच भेट न होता निराशेने खाली उतरून यावे.तद्वत हे शब्दजंजाळ वापरणा-यांची स्थिती होते.तुम्ही स्वतःच्या देहरुपी इमारतीवर चढून मिळणा-या शांतीची अनुभूती म्हणजे आत्मप्रचिती.
मला विचाराल तर जे तुमचे विचार मला समजतात व जे तुमच्या आत्म्याला कळत नाहीत ते त्याला समजणा-या भाषेत सुलभ करून सांगणे याचे नाव आत्मनिवेदन.
एखाद्याने विचार न करता दुस-यास पैसे द्यावे.त्याने ते परत केले नाहीत तर पहिल्यास वाटते आपण पैसे द्यावयास नको होते.या त्याच्या विचारांना पश्चाताप म्हणतात.परंतु विचार निश्चित केल्यावर येणा-या प्रचितीस अनुभव म्हणतात. अनिश्चित विचारांती येणा-या प्रत्ययास पश्चाताप म्हणतात तर निश्चित विचारांती येणा-या प्रत्ययास अनुभव म्हणतात.
[जीवन जगत असताना सामान्य मनुष्य शब्दजंजाळात न कळत अडकला जातो.त्यामुळे मूळ मुद्दा बाजूला पडतो. योग्य ते योग्य तवढे शब्द वापरून जीवन डगण्याचे शिकावे हा उद्देश आहे.मुलाखत परत-परत वाचावी. कारण आत्मा व आत्मप्रचिती हे विषय सर्वसाधारण मनुष्याला सहजासहजी समजणारे नाहीत. तरीही विभूतीनी तो एका साध्या उदाहरणातून समजावून दिला आहे.कोणताही पूर्वग्रह न ठेवता ही मुलाखत शांत चित्ताने वाचल्यास त्यातील गूढ अर्थ आपोआपच समजत जाईल. ]