29 – 3 – 61

आपण जे कर्मविपाकाचे प्रसादाचे पुजन करतो त्यामुळे आपल्या जीवनात काय घडणार आहे?व कर्मविपाक म्हणजे काय?याची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.हय़ा गोष्टीची माहिती जर आपण करुन घेतली नाही तर प.पू.बाबांची आपल्यावर किती कृपा आहे हे कळणार नाही.आज आपले जीवन कसे चालले आहे?शेतात गांजा लावताना.त्या भोवती सब्जा लावण्याची खबरदारी घेतात कारण गांज्याचा वासा बाहेर जाऊनये.पण माळी मात्रगांज विकायला पाठवितो व सब्जा देवाच्या चरणी वाहिला जातो. पण तोच गांजा पिऊन तर्र झालेला माणूस ज्यावेळी देवाच्या दर्शनाला येतो त्यावेळी नशेत असल्यामुळे त्याला मात्र देवाच्या चरणी वाहिलेल्या सब्जात गांजा दिसत असतो. मानवाला दोन प्रवृतीशी सामना करावा लागतो.एक दुर्बुध्दि व दुसरी सुबुध्दि.तुम्ही बाबांच्यासमोर बसल्यावर त्या दोघीजणी आर्शिवाद मागत असतात.पण गतजन्मातील कर्मामुळे आपले शरीरबध्द झालेले असल्यामुळे सुबुध्दिला वावच मिळत नाही.या विश्वात 3भाग पाणी आहे पण आपण मात्र तहान लागल्यानंतर त्यातील एकच भांडे पाणी पितो. पुन्हा तहान लागली तरीसुध्दा साऱया जगावर पाण्याचा एवढा साठा आहे म्हणून काही घागर भर पाणी पित नाही.त्याचप्रमाणे या जगात सुखाचा एवढा पसारा पडलेला आहे म्हणून आपल्या कल्पनेने निर्माण केलेले प्रत्येक सुख मिळावे म्हणून जर घडपडू लागलो तर जमणार नाही.तर आपणास जरुर असेल तेवढेच सुख मिळवण्याची व तेसुध्दा गुरुसान्निध्यात राहून भोगण्याची प्रवृती ठेवली तरच आपण खऱया अर्थाने सुखी होऊ.गंगाजल हे शुध्द व पवित्र असते.पण ज्या भांडय़ात भरुन घेणार ते भांडे जर स्वच्छ नसेल तर पाणी खराब लागेल व तहान भागणार नाही.आपण तहान लागल्यावर कुठल्याही हाटेलात पाणी प्यावयास शिरलो.त्याचप्रमाणे रस्त्यावरुन जाता-जाता कळले की या ठिकाणी साईबाबांची गादी आहे म्हणून एखाद्या हॉटेलात चहापिण्यासाठी शिरावे इतक्या सहज तुम्ही येथे येता.हॉटेलात चहा मागवल्यावर पोऱया चहा बरोबर पाण्याचे ग्लास आणून देतो व जाताना आपण चहाचे पैसे देऊन जातो.वास्तविक चहा पाण्याचाच केलेला असतो पण म्हणून पाण्याचे पैसे मागितले तर तुम्ही हॉटेल मालकास मुर्खात काढाल.या येथे आल्यावर आम्हाला माहीत असते की आपण बुभुक्षू आहात तरीसुध्दा सद्गुरु आपल्या कृपेच्या पाण्याचा ग्लास देत असतात.ज्याला तहान लागली आहे तोच ते  पाणी पिईल.नाहीतर हॉटेलाच्या पोऱयाने चहाबरोबर दिलेले पाणी न पिता तुम्ही जसे उठता तसेच इथून जाल.पण घरी झोपण्यापूर्वी तुम्हाला तहान लागणार आहे.त्याची सोय तुम्ही केली आहे काय?कारण ज्यावेळी मनुष्य इहलोक सोडून जातो त्यावेळी ‘गंगाजल’ घाला असेच म्हणतो.त्यावेळी काही सोन्याचा रस घाला किंवा इतर काही गोष्टी मागत नाही.तेव्हा जीवनात त्यावेळी तरी सदगुरुकृपेने मिळणाऱया गोडय़ा पाण्याची आवश्यकता ही लागणारच आहे.इथे बाबा बसलेले आहेत.आपली कार्यपध्दत आहे म्हणून वाटेल तेव्हा आम्ही येणार नाही.पहिल्या प्रथम तुम्हाला खरोखरच तहान लागली आहे का?तुमच्यावर काही संस्कार झालेले आहेत काय?याचा विचार करतो.सदगुरुकृपेचे जल वाटेल तेव्हा मिळतच नाही. ठरलेल्या वेळीच ते मिळणार.मुंबईत पाणी येण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत की नाही.त्याप्रमाणेच हे सगळे आहे.पण पाणी घेण्यापर्वी आपले भांडे स्वच्छ आहे की नाही हे बघून घ्यावे.रस्त्यावरुन जाणारा एखादा मनुष्य अगर येथे येणारा भक्त हा  ‘ॐ श्री साईनाथायनमः’ हा मंत्र म्हणत असतो.एकाला आर्शिवाद एकाला कृपा व स्वतः एकीकडे.जातात.आर्शिवाद हा उपस्थितांचे काम होण्याकरीता असतो.ते काम झाले की पुन्हा दुसऱया कामाच्या सफलते करता आर्शिवाद लागणारच.कृपा ही एकच नव्हे तर त्या पुढील येणाऱयांची कामे होऊन धंदा-पाणी नीट चालावा एवढय़ाकरीता असते व जन्माचे कल्याण करुन घ्यावयाचे असल्यास प्रत्यक्ष बाबाच लागतात.

[समितीच्या कार्यपध्दतीत ‘प्रसाद’ याला महत्व आहे.’ प्रसाद’ हा जरी दृष्यमान असला तरी त्या मागील आशिर्वादात्मक शक्ती अदृष्य असते. प्रत्यक्षात तीच अदृष्य शक्ती कार्य करीत असते. त्या शक्तीमुळे भक्तभाविकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असतात.हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ही  मुलाखत आहे.]