30—7—61.

आज कित्येक भक्तांना असे वाटते की आपल्याला वेळ नाही व त्यामुळे आपल्या हातून सेवा-साधना होत नाही.गेल्याच आठवडय़ात आपण जो रोज संकल्प करतो त्याचीच गुरुदिक्षा घेतली व 1100 गुरुमंत्र करण्याचे ठरवले.पण वेळ नाही ही आपली सबब आहे.गाडीतून येता-जाता आपण जो निष्कारण गप्पा मारण्यात आपला व इतरांचा वेळ घालवितो तो जर नामस्मरणात घालविला तर दिवसाकाठी सहज जप होऊन जाईल.पण हे घडण्यासाठी आपला विचार निश्चित पाहिजे.काहिंना वाटते की पायात बूट आहेत मग कसा करणार जप.वास्तविक जो प्राणी मेला त्यानंतर त्याने आपले कर्तव्य केले तेणेकरुन त्याच्या कातडय़ाचे बुट होऊन त्यांनी तुमचे संरक्षण केले.तुमच्या पायावर देखील कातडे आहे.जप करणार तो मनापासून करणार तरी या बाह्य गोष्टींची आडकाठी आणू नका.आता चार्तुमास चालू झाला.व्रत वैकल्यांना अगदी जोर येणार.बाबा हय़ा सर्वांपासून सोडवण्यास आज तयार आहेत तेव्हा वेळीच सोडवणूक करुन घ्या.पुढे येणा-या तुमच्या मुला बाळाच्या हातून या गोष्टी होणार नाहीत.साधे बिल्वपत्र शंकराला वहावयाचे ठरविले तर “दर सोमवारी वाहीन” इ. संकल्प करुन बांधून घेऊ नका.“प्रेमाने वहात आहे”, येवढेच म्हणा.पादुकांवर आभिषेक करावयाची इच्छा आहे तर भटजी वेळेवर येत नाही कारण त्यांना काम फार. तरी स्वतः 108 वेळा नामस्मरण करुन पाण्याचा आभिषेक करावा.त्याला काही भटजी लागत नाही.स्वतः आभिषेक केल्याने भावनेची पवित्रता असल्याने मनाला समाधान वाटते.

जगात अनेक गोष्टी आहेत. उदा. हवा की जी दिसत नाही.पण त्यामुळेच आपले जीवन चालू रहाते.त्याच प्रमाणे बाबांचा दुवा आशिर्वाद आपले काम करीत असतो.तो दिसत नाही पण त्याशिवाय आपण जगूच शकत नाही

[भकतांच्या जीवनाला शिस्त लागून त्यांचे जीवन सुखी व्हावे हा उद्देश या मुलाखतीत आहे.तसेच समितीतर्फे जी सेवा भक्त भाविकाना सूचित केली जाते ती अत्यंत साधी,सोपी असते.असे असून देखील पूर्वग्रहातून वेगवेगळे अनुचित विचार आल्याने सेवा करण्यात टाळाटाळ केली जाते. अज्ञान किवा अंधश्रध्देतून आलेले विचार जीवन समृध्दीसाठी कसे  धातक असतात ते विविध उदहरणातून समजावून दिले आहे.त्यामुळे पर्यायाने भकतांचे नुकसान होते हे लक्षात यावे हा हेतू आहे.]