3-2-1962 शनिवार
360 अंश. प्रत्येक राशीला 300, शनिला 2।। वर्षे,चंद्र 2।। दिवस
आठ ग्रह आज एकत्र येणार व आपणावर काही आपत्ती येणार ही भावना मनातून काढून टाका.ग्रहांची युती पूर्णत्वाने कधीं होत नाही.गेल्या15 दिवसापासून काही ग्रह एकत्र आलेले आहेत व या पुढे काही एकत्र येतील.ग्रहांचा भविष्योत्तर जीवनाचा अर्था-अर्थी काहीही संबंध नाही.या युतीमुळे फक्त आपणालाच भिती वाटते.इतर अन्य पशूनां काही त्रास होणार नाही का?गाई-म्हशीनी दूध देण्याचे बंद केले नाही.त्यांनी त्यांचा धर्म केला पण ते दूध,नको त्या ठिकाणी ओतून आम्ही मात्र अधर्म करीत आहोत.ज्योतिष शास्त्राचा आधार म्हणजे भृगुसंहिता हा होय. 12 राशी व 9 ग्रह म्हणजे108योग. भृगूनें प्रत्येक अंशावर108कुंडल्यातयार केल्या. एकंदर 38,880कुडल्या तयार केल्या.‘अ’ या माणसाची कुंडली आज आहे तीच कुंडली बरोबर 30 वर्षांनी जन्माला येणाऱया ‘ब’ या व्यक्तीची असते.पण ‘अ’ हा लक्षाधीश असेल तर ‘ब’ हा भिकारी असेल किवा असू शकतो. आपल्या पृथ्वीच्या बाजूने इतर ग्रह नसते तर आपली पृथ्वी स्थिर राहू शकली नसती.
या ग्रहांच्यापासून निघणाऱया प्रकाशाचा किवा शक्तीचा परिणाम वातावरणावर होतो व त्यानंतर आपल्या पंचमहाभूतात्मक शरीरावर होतो.बाबांकडे येऊन आज 5 वर्षे झाली पण अजून मन स्थिर होत नाही व कारण तुमच्या राशीला शनी आल्याबरोबर लगेच आज तुमच्या जीवनात स्थिर झाला.आता लाभच लाभ हे म्हणता कसे ? थंडी पडली असेल तर नुसत्या हाताला गुंडाळून थंडी वाजण्याचे थांबणार नाही.त्याकरिता सर्व शरीरावर काहीतरी घ्यायला पाहिजे.हे जसे खरे आहे.तसेच एकटय़ा शनीने तुमचा भाग्योदय होणार आहे हे बरोबर नाही.तर ग्रहांचा देखील विचार केला पाहिजे.ग्रहांची युती वाईट म्हणता पण आपण किती वाईट आहोत याचा विचार केलात का? नेहमी आपल्याकड़ून ईश्वराकडे जायचे असते.ईश्वराकडून आपणाकडे यायचे नाही. म्हणजे मुळात आपण आहोत हे लक्षात येईल.युती म्हणजे वाईट होणार हे कसे! आपण दोघेजण एकत्र येऊन युती झाल्यावर वाईट गोष्टी घडतील का? दोहोपैकी एकजण दुसऱयाला चहा देतो. मी,नाना व जोशी एकत्र आलो तर काय होईल? नाना चहा देईल,जोशी बिस्किट देईल व दोघांनी दिलेला चहा व बिस्किटे खाण्याची इच्छा मला होईल,यात वाईट काय घडले? एकटाच जर कुणी असेल तर वाटेल तो बहकेल.कदाचित गाडीखाली देखील झोपेल. पण दुसरा बरोबर असेल तर निदान त्याला ओढून तरी काढेल.यावरून लक्षात येईल की एकटे असण्यापेक्षा युती होणेच चांगले.
तुम्ही येणार्या अष्ट-ग्रहांच्या युतीबद्दल विचार करता पण दररोज अंशात्मक ग्रहांच्या युती होत असतात.त्यांचा कधी वाईट परिणाम झाला का ? मन हे अनंत जन्मांचा संस्कार घेऊन आलेले असते.ते तुम्हाला सांगत असते की आज सकाळी गेलास तर तुझे काम निश्चित होईल, पण तुम्ही निघताना चंद्रबल आहे का? अशावेळी ज्योतिषाने सांगितले की दरवाजाच्या बाहेर दोन पावले चालल्या नंतर डावीकडे वळून तीन पावले टाका. पण जर डावीकडे भिंत असेल तर मग जाणार कुठे ? मन सांगत असते की 8 वाजता जा,काम होईल,पण ज्योतिषाने सांगितलेले असते की 6 वाजता जा.पण त्यावेळी मनुष्य निघून गेलेला असतो व काम होत नाही.सगळय़ा ग्रहांची तुम्हाला स्वप्ने पडतात.पण कधी पृथ्वीचे स्वप्न पडले आहे का ? नेहमी शास्त्र पहिले व सिध्दांत नंतर मांडले जातात.पण ज्योतिषशास्त्रात नेमके उलटे आहे. प्रत्यक्ष घटना का घडली याची मीमांसा सांगितली जाते.
एखादा मनुष्य चांगल्या प्रकारे धंदा करुन लाख रुपये मिळवतो व एखादा कवडेशास्त्री म्हणतो की त्याचा गुरू उच्च आहे.रमलशास्त्री म्हणतात की शनी उच्च आहे.अनेक लोक त्यांच्या त्यांच्या अनुमानाप्रमाणे तर्कवितर्क करतात.सगळय़ानी त्याची कुंडली घेतली पण मी त्याची कर्तबगारी घेतली. इतरांनी त्यांचे ग्रह घेतले. मी त्याने योग्यवेळी लोखंड घेतले हे बघितले.एवढे सर्व चाललेले असते पण ज्याला लाख रुपये मिळाले तो अगदी स्वस्थ बसलेला असतो.आजपासून विज्ञानयुग संपले आहे.यापुढे ते मागे परतू लागेल.परंतु काही वर्षांनी असे आढळून येईल की जो अणूबाँम्ब मानवाच्या संहाराकरिता वापरला तोच बाँम्ब मानवाच्या हिता करिता वापरला गेला.
आजसुध्दा प्रत्येक ग्रहाकड़ून निघणारी शक्ती या वातावरणातून आपणास मिळत असते.पण आज जी शक्ती विसंगत स्वरुपात मिळत असते या युतीमुळे ती शक्ती 8 ग्रहांची एकदम मिळणार आहे.कारण 1500 ते 2000वर्षानंतर आलेला आहे व पुनः तुमच्या जन्मात येणार नाही,तरी याचा लाभ प्रत्येकाने घ्यायला पाहिजे.आज सगळीकडे युतीमुळे त्रास होऊ नये म्हणून होमहवन होत आहेत. वास्तविक जास्तीत-जास्त प्रमाणात या युतीपासून फायदा व्हावा, शक्ती मिळावी म्हणून होमहवनें व्हावयास पाहिजेत.ग्रह कंटाळलेले नाहीत, वैतागलेले नाहीत.ते त्याच्या नियमानुसार सारखे फिरत आहेत.मी मात्र वैतागलो आहे व त्यांची शांत करायला निघालो आहे.काय न्याय आहे!
आज गुरुला वाईट म्हणता, मग उद्या त्याच गुरुपासून मिळणारा पैसा नाकाराल का? या जगात काहीही अनिष्ट नाही.फक्त मनुष्याला मनुष्यच अनिष्ट आहे.तो इष्ट झाला की सर्वजण इष्टच आहेत!एका सेवकारणा विचारले की,त्या टोकापासून हळूहळू तू ह्या टोकापर्यत आलास.आता पुढे सरकायला वाव नाही.कारण पुढे बाबांचा फोटो आहे.आता पुन्हा मागे जा व हळूहळू पुढे ये.एवढे लक्षात ठेव की पाय आहेत म्हणून पुढे येऊ नकोस तर मार्गाने पुढे ये.सर्वप्रथम आल्यावर ज्या काही अपेक्षीत सुखासाठी आलो होतो तीच अपेक्षा पुन्हाः पुढे जात असताना आपणापाशी नाही ना याची खात्री करुन घे.
गुरुजवळ जावून पुन्हा मागे येणे व पुन्हा पुढे जाणे ही शिकवण लागली पाहिजे.पहिले पाच नवनाथ जन्माला आले म्हणजे पंचतत्वेच जन्माला आली.राम,लक्ष्मण,सीता म्हणजे उपत्ती,स्थिती व लय.दहा हाताचा रावण म्हणजे देहावरची पंचकर्मेद्रियें व ज्ञानेंद्रियें अशा या रावणाने सीतेचे हरण केले हे अध्यात्मिक दृष्टीने अभ्यासले पाहिजे.मानवाला लय म्हणजे मृत्यूची भिती लागलेली आहे. राम जन्माच्या आधी रामायण लिहिले गेले व त्याच प्रमाणे घडत गेले.कारण उपत्ती,स्थिती व लय यांचा परस्परांशी ऋणानुबंध कसा असतो हे सांगितलेले आहे.