३१-१२-१९६० प.पू.हाजी बाबांची मुलाखत.

गेल्या ७ वर्षातील समितीचे कार्य लक्षात घेता आपणास असे आढळून येईल की प्रत्येक वर्षी आपण कोणत्या ना कोणत्या दोषाची बाजू आपल्या नित्य उपासनेने दूर केली आहे.१९५८ मध्ये वंशविमोचन करुन आपण आपल्या जीवनातील निम्या दोषांची बाजू दूर केली.१९५९ सालात आहार मीमांसा शिकलो पण आचरणात आणली नाही.१९६० सालात वैयक्तिक कर्मविपाक करुन त्याच्या परिमार्जनार्थ नित्य सेवा-उपासनेची सवय लावून घेतली.अशा तऱहेने आपण सेवा करीत असता ती सद्गुरुपर्यंत पोहोचते का? व पोहोचत असल्यास ती कोणत्या उपायाने पोहोचते?हा अभ्यास होणे जरूरीचे आहे.आपली सेवा पोहोचण्याचे माध्यम म्हणजे आपल्या वातावरणात निर्माण होणारे असंख्य कंप (waves).प्रत्येक गोष्टीपासून असंख्य लहरी निर्माण होत असतात व म्हणूनच दुस-याने उच्चारलेला शब्द आपण ऐकू शकतो.

आज आपल्या जीवनात सुख लाभले का?.जे काही सुख लाभले आहे ते अती अल्प आहे.तो काही सुखाचा ठेवा होऊ शकत नाही.पाऊस पडून गेल्यानंतर पीक येते.असे पीक काढल्या नंतर देखील जमिनीत काही काही ठिकाणी ओलावा राहिलेला असतो व त्यामुळे थोडे फार धान्य मिळू शकते.हे जे काही येणारे थोडेफार धान्य म्हणजेच आज आपण जीवनात अनुभवित असलेले सुख होय.या राहिलेल्या ओलाव्यात जे धान्य पेरु तेच आपणास मिळेल.आपण जर त्यात वासनारुपी पिंपळाचे झाड लावले तर  त्या झाडावर कावळय़ाशिवाय कोणीही बसत नाही.कावळा हा असा आहे पक्षी आहे की जो सगळय़ांचे खातो पण त्याचे कोणीच खात नाही.असे लावलेले पिंपळाचे झाड एकदा मोठे झाले की त्याची पाळेमूळे इतस्ततः खोलवर जातात व मोठा वृक्ष होतो.पण काही कालानंतर ओलव्याच्या अभावी हा वासनारुपी पिंपळवृक्ष वठायला लागतो.मग आपण म्हणू लागतो की “बाबांची कृपा असताना हा पिंपळ वठला कसा?वरुन जर पाऊस पडला नाही तर वृक्ष हा वठणारच!मग वरुन सद्गुरुकृपेचा पाऊस पडण्याकरीता आपण काय प्रयत्न करतो?याचा विचार होणे आवश्यक आहे.आपल्या गतजन्मात जी पुण्यकर्मे असतात ती लगेच वर जाऊन विश्वंभराचे वातावरण आहे त्यास जाऊन मिळतात व तेथून आपल्या जीवनात सद्गुरुकृपेचा थोडा-थोडा वर्षाव होत असतो.पण या आपल्या रखरखीत जीवनात त्याचा आपणास  मागमूसही लागत नाही.ज्याप्रमाणे सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते व ती वरच्या थरात जाते.तेथे गेल्यानंतर त्या ढगात वातावरणातील ओलावा मिळाल्या नंतर तोच ढग पावसाच्या रुपाने खाली येतो.मग शेते पिकतात.तेव्हा एक गोष्ट खरी की पाऊस हा वरुन पडावा लागतो.जमिनीवरील पाण्याचा जरी ढग होत असला तरी पाणी इथल्या इथे मिळत नाही तर ते वरुनच मिळावे लागते. ही क्रिया अविरत चालू असते.आपल्या गतजन्मातील जी पुण्य कर्मे असतात ती ताबडतोब वरच्या विश्वंभराच्या वातावरणात जाऊन विलीन होतात “जे ज्याचे आहे ते त्यालाच जाऊन मिळणार”हा नियमच  आहे.मग आपल्याला भोगायला रहातात ती दुखे.जशी पुण्यकर्मे वरच्या वातावरणात विलीन होतात तशी दुखे वर जाऊन विलीन होऊ शकत नाहीत.मग ही दुखे घालवावयाची कशी?हा प्रश्न रहातो.त्याला उपाय एकच की आपल्या जीवनात आकृती २ मध्ये दाखविल्याप्रमाणे एक एक दुख वर यावयास लागले तर त्याचे बाजूला सद् गुरुकृपेची मोठी भिंत उभी करावयाची व अशा त-हेने व कर्मातील येणार्या दुखाचे अगर दुष्कर्माचे निर्मुलन करावयाचे व म्हणून ही गोष्ट साध्य होण्याकरीता नियमितपणे केंद्रावर यावयाचे.त्याचप्रमाणे दिलेल्या  प्रसादांचे पूजन करुन दुखाचा उगवलेला अंकुर जाळून टाकावयाचा.

आपण जी काही सेवा करतो ती मान्य होण्याचे अगर ईश्वराप्रत पोहचण्याचे साधन काय? या पृथ्वीतलावर असंख्य कंप निर्माण होत असतात हे कंप (vibrations) सारे विश्व व्यापून उरले आहे म्हणूनच आपल्याला दुसऱयाचे बोलणे ऐकू येते आपल्या मनात विचार येतात इ…या पृथ्वीपासून असंख्य मैल दूरवर शुध्द सात्विक असे विश्वंभराचे वातावरण आहे.त्या वातावरणातून विधात्याच्या कृपेचा प्रत्येकावर वर्षाव होत असतो. मग तो मनुष्य ईश्वर भक्त असो वा नसो.त्यावर वरील कृपादृष्टी ही होणारच.वरील वातावरणातून प.पू,बाबांच्या कृपेची धारा अविरत पडू दे.या पावसात भिजलो तरी चालेल पण हे सर्व पाणी आपल्या पूर्वजन्मानुसार जे शेत मिळालेले आहे त्यात पडू दे.शेतात पडलेले पाणी बाहेर जाऊ नये म्हणून ताल (बांध) घालावी लागते.ध्यान-धारणा, पुजन, अर्चन, निश्चित आचार-विचार-आहार या गोष्टींनी आपण आपल्या शेताला ताल घातली तर आपल्या शेताला सद्गुरु कृपेच्या पडलेल्या पावसाचा निश्चित उपयोग होईल.हे जर केले नाही तर शेतातील पाणी वाहून जाईल व शेत आहे तसेच कोरडे राहिल.मुक्ती ही येथेच आहे.त्या करीता काशी क्षेत्री जाण्याची जरुरी नाही.आपले हे जे राकेट आहे ते वर अंतराळात उडवावयाचे असेल तर त्याचे पोट म्हणजे आत्मतत्व आणि या ठिकाणी जे इंधन घालू ते जर शुध्द-सात्विक असेल तर ते प्रखर होत जाईल तेणे करुन आपले राकेट वर उडायला सोपे जाईल. आपली उपासना सुसंबध्द व सात्विक असेल तर आपले रॉकेट निश्चित वर जाईल.त्यासाठी समाधीची जरुरी नाही.आपण चाथ्या मजल्यावर जाणार तर तळापासून स्वच्छता नको का?आपल्याला अनेक मित्रमंडळी भेटावयास येणार.मग सगळीकडे दुर्गंधी असल्यावर ते नाराज होऊन परत जाणार नाहीत का? आत्मा हा पाण्यासारखा आहे.तो ज्यात मिसळेल त्यासारखा होईल. चैतन्य हे स्वतः प्रत्यक्षपणे कार्य करीत नाही. उदा.चाकूने कापले जाते पण चाकू कापत नाही तर चाकूची धार कापते. आपले शरीर ही एक पाणबुडी आहे. पाणबुडीला आपले भक्ष शोधण्यासाठी पाण्याच्या वर यावे लागत नाही. पाण्यावरील भागात दुर्बिण असते.समोर येणा-या प्रत्येक गोष्टीचे चित्र त्या दुर्बिनीच्या साहाय्य़ाने पाणबुडीतील मुख्य नावाडय़ाला म्हणजेच आपल्या आत्म्याला दिसत असते. या मुख्य नावाडय़ाचे सहकारी म्हणजे आपली काया व षड्विकार,हे होत. एखादे भक्ष समोर आले की चैतन्यरुपी नावाडी आपल्या सहकाऱयांना विचारतो की गोळी चालवावी का?सहकारी जर चांगले असतील तर योग्य़ तोच सल्ला देतील नाहीतर म्हणतील मार ना गोळी.या वेळी बिचाऱया मनोनिग्रह आणि सद्विवेकबुध्दि यांना नुसते बघत बसावे लागते कारण त्यांचे स्थान वर दुर्बिणी जवळ असते त्यांचे काम एकच समोर येणा-या प्रत्येक गोष्टीचे प्रतिबिंब खाली आत्म्यातत्त्वावर पाडावयाचे.पुढे गोळी उडाली अगर न उडाली त्यांना त्याबाबत काही एक करता येत नाही.समोर येणा-या बऱया वाईट अशा प्रत्येक गोष्टीचे प्रतिबिंब हे आत्म्यावर उमटणारच.हा त्याचा धर्मच आहे.एखाद्या वाईट गोष्टीचे प्रतिबिंब उमटले म्हणून खंत वाटायला नको.प्रश्न आहे चित्र उमटल्यानंतर होणाऱया प्रतिक्रियेचा.ही शुध्द सात्विक स्वरुपाची असली म्हणजे झाले.खरे पाहता या जगात एकच तत्व आहे व ते म्हणजे सत्व.सत्वाचा अभाव म्हणजेच रज व तम हे होत .उदाहरणार्थ-Nitrogen हा वायू मिळत नाही पण oxygen चा अभाव म्हणजेच Nitrogen होय.त्याचप्रमाणे दिव्याची ज्योत.ज्योत ही शुध्द सत्व-तत्व होय.ह्याचा उपयोग एकच की प्रकाश देणे.प्रकाश देणे ही क्रिया नैसर्गिक आहे.पण त्याच बरोबर शुध्द विचार नसतील तर त्याच ज्योतीने आग पण लावता येते.मनुष्याच्या ठिकाणी सत्व-तत्व आहे पण त्याचा आचार-विचार-आहार यात बदल झाला म्हणजे त्याच्या हातून अनेक विसंगती होत असतात.

पृथ्वीपासून अत्यंत जवळ असे पंचमहाभूताचे वलय असते.त्यानंतर असते ते देवादिकांचे संचार अवस्थेचे निरनिराळे प्रकार दाखविणारे वलय व त्यानंतर सर्वात वर असते ते शुध्द सत्विक मार्गाकडे नेणाऱया विभूतिचे. म्हणजेच सद्गुरुचे वलय हे होय.साधकाला कानामध्ये काहीतरी सांगितले गेल्यामुळे त्यावर चरितार्थ चालविणाऱया एका घटकाला प्रथम तोंड द्यावे लागते.त्यानंतर देवादिकांची स्वरुपे,त्यांना लागणारे बळी हे दुसरे वलय होय.अशा सर्व गोष्टींची नाकेबंदी सद्गुरु उपासनेनेच करता येते.आपल्या शरीरात एका दिवसात २२ लक्ष कंप (frequencies) निर्माण होणे हा त्या शरिराचा धर्म आहे.असे समजा दररोज या कंपांचे प्रमाण कमी-जास्त झाले तर आपल्याला त्रास होतो.आपण असे समजू की पंचमहाभूततत्वांचे १ ले वलय आहे.त्याची आपण उपासना केली तर २८ हजार कंप मिळतात व २र-या वलयाची म्हणजे देवादिकांची उपासना केली तर ३० हजार कंपने मिळतात व ३ -या वलयाची म्हणजे सद्गुरुंची उपासना केली तर पहिल्या दोन वलयांपेक्षा कितीतरी पटीने जास्त कंप आपल्या शरिरात निर्माण होतात.आता आपण असे समजूया की या एका भक्ताच्या शरीरात सर्वसाधारणपणे २२ लक्ष कंपने निर्माण होतात की जेणे करुन त्याचे दिवसाचे सर्व व्यवहार तो व्यवस्थितपणे पार पाडू शकतो.दिवसभर आपल्या व्यवहारात आपण आपल्या जीवन-शक्तिचा ऱहास काया-वाचा-मनाने करीत असतो.हा ऱहास होतो पण त्याची कल्पना आपल्याला येत नाही.आपण जर ५ मिनीटे शांत बसून विचार केला तर असे अढळून येईल की आपण स्वतःविषयी विचार करण्याऐवजी इतर अनेक फालतू गोष्टीचा विनाकारण विचार करीत असतो. उदाः- आपल्या एका भक्ताच्या घरावरुन बस जाते.काल गच्चीत उभे राहून घराजवळून बस वळताना याच्या मनात विचार आला की जर ही बस कलंडली तर किती माणसे जखमी होतील? हा एक विचार आला की निदान ४०१४४ हजार कंप शरीरात निर्माण होतात.हा जो प्रत्येक क्षणाला जीवन शक्तिचा अपव्य होतो तो आपण कसा भरुन काढणार?तर त्याला उपाय एकच की संध्याकाळी आरती झाल्यावर आपली नित्याची १ तासाची उपासना करणे.या एका तासात दिवसभर नको त्या गोष्टीचा विचार करुन खर्च केलेल्या जीवन-शक्तिची भरपाई होत असते व म्हणून नित्य उपासना चुकता कामा नये.याप्रमाणे सद्गुरुंच्या आत्मतत्वाशी तुमची जोड करुन दिली की मग मध्ये इतर देवदेवतांचा संबंध आणल्यास त्यात बिघाड येतो.एकदा पंचमात‘सा’ लागला की शेवटपर्यंत पंचमातच ‘सा’ राहिला पाहिजे.तो जर खाली आला तर मैफलीचा बेरंग होईल व म्हणून मी सांगतो की तुमची उन्नती व्हावयाची असेल तर “बाबा व तुम्ही यामध्ये कोणीही असता कामा नये”. आपण कुलदेवतेचे व इतर देवादिकांचे,आपल्या पितरांचे ऋण फेडलेले आहे.सध्यातर स्वतःच स्वतःचा कर्मविपाक चालवलेला आहे.या पुढे “बाबा, मी तुमचा व तुम्ही माझे”.एवढी एकच भावना पाहिजे.याकरीता नवरात्र, गणपती घरी न करता त्याऐवजी यथा शक्ति पैसे अल्प-बचतीत टाकावे.कारण नुसते नवरात्र बसवले तरी आधिष्ठान आले,देवीची प्रार्थना, पुजा-अर्चा या सर्व गोष्टी आल्या.पण या गोष्टी करताना तुमच्या 3ऱया वलयाशी घातलेली सांगड खंडीत होते व लगेच दुसऱया वलयाशी तुमचा संबंध येतो.त्याच प्रमाणे अन्नात बदल झाला की आपल्या शरिरात ज्या काही ‘cyeles’ निर्माण होतात त्यात बदल होतो उदा.उपवास करुन दाणे, वऱयाचे तांदूळ खाऊन जर दररोज आवश्यक अशा २ लक्ष cyeles कंप कमी निर्माण झाले तर त्याची भरपाई कशी होणार?या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच तुम्हाला व्रत-वैकल्ये,उपवास या गोष्टीपासून सोडविले व आहार निश्चित करण्य़ास सांगितला.एक ठराविक आहार घेण्यात जर बदल केला तर मनाला व शरिराला लाभणाऱया स्थिरतेत बदल होतो.आपल्या तत्वाला जे द्रव्य पाहिजे ते शुध्द स्वरुपात पाहिजे व म्हणून आपले आचार-विचार शुध्द पाहिजेत.मूळ चैतन्य हे शुध्द स्वरुपाचे असते.ज्याप्रमाणे पाण्यात धोंडा टाकला की पाण्यावर लहरी उमटतात पण काही काळाने त्या लहरी पाण्यातच सामावून जातात.कारण त्या पाण्यातूनच निर्माण झालेल्या असतात व म्हणूनच त्यांच्यातच विलीन होतात.

त्याच प्रमाणे मन व विचार यांचा संबंध आहे.एखादे वेळी अविचाराने आपण एखादे वाईट कृत्य करतो व तात्पुरते आपणास समाधान वाटते.पण 1/2 दिवसानंतर मात्र आपणास झालेल्या गोष्टीचा पश्चाताप होतो.जरी त्या मनरुपी जलाशयावर काही एका विकाराच्या आहारी जाण्यामुळे तरंग उठले तरी पण त्या तरंगाच्या खाली शुध्द जलच होत.काही वेळाने ते तरंग पाण्यातच विलीन होतात.त्याच प्रमाणे आपणास 2 दिवसांनी पश्चाताप होतो व आपले मन शुध्द होते.यावरुन आपल्या लक्षात येईल की मन आणि विचार वस्तु भिन्न नाहीत.

आत्मा हे तत्व अविनाशी आहे.जीवनामध्ये आत्म्याला सत्प्रवृतीची आवड आहे. परंतु मन आणि विचार या त्यांच्या दोन डो•यांमुळे मानवाला सद्प्रवृतीची आवड लागणे कठीण होते.अशा हय़ा दोन डोळयांची म्हणजे विचार आणि मन यांची सांगड घालून आत्मा आपले (इप्सित) हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतो.विचाराने ईश्वर शोधता येतो,पण मनाने तो मिळवता येतो.मन आणि विचार हे वस्तुतः भिन्न नाहीत.पाण्यामध्ये सुईचे टोक बुडविले तर ते पाण्यावर असंख्य तरंग निर्माण करण्यास कारणीभूत होते.तद्वत मनावर एका क्षणिक विकारामुळे विचार उद्भवतात.विचार हा क्षणीक अवस्थेचा विकल्प आहे तर मन हे निरंतर भावनेचा संकल्प आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण सुखी होण्याचा प्रयत्न करीत असतो पण कोणत्या गोष्टी मिळाल्या म्हणजे आपण निश्चितपणे सुखी होऊ याचा कोणी विचार करीत नाही.एखाद्याला विचारले की तुझ्या सुखाची व्याख्या काय? याला उत्तर असे देईल की,त्याच्या समोर एक ‘क्ष’ नावाची व्यक्ति आहे.त्याला प्राप्त झालेल्या गोष्टी मिळाल्या की मी सुखी होईन पण त्याच वेळी‘क्ष’ही व्यक्ति आपल्या सुखाचा ठेवा दुसऱयाच कोणी ‘ड’ या व्यक्तिच्या जीवनाकडे बघून ठरवत असते.याप्रमाणे जगतातील बहुतांशी लोक अशा सुखाच्या भ्रामक वर्तुळामध्ये फिरत असतात.मन आहे तेथेच आहे पण विचार मात्र दर क्षणाला बदलत असतात.आपल्या जवळ रेडीओ नाही म्हणून आपण दुखी.मग रेडिओ आणून तरी आपण सुखी होतो का?.असे असते तर काही दिवसांनी ‘बंद करा बुवा,तो रेडिओ,कंटाळा आला’.अशा तऱहेचे उद्गार आपल्या तोंडावाटे निघाले नसते.वेळ जात नाही,कंटाळा आला म्हणून क्षणाचाही विचार न करता १रु.५आणे देऊन सिनेमा बघतो. आपल्या जीवनातील १रु.५आणे हे क्षणिक विचाराचा विकल्प ठरतात.पण त्याच वेळी रस्ता खोदणाऱया एका मजूराच्या जीवनाचा संकल्प ठरत असतात.संध्याकाळी काम करुन म्हणजेच दिवसभराचे कर्तव्य केल्यावर,मिळणारे 1१रु.५आणे घेत असताना त्याच्या मनात हा विचार असतो की मीठ मिरची घेईन व बायको पोरांसह भाकरी खाऊन झोपी जाईन.१रु.५आणे तेच.पण एकाच्या जीवनाचे मनोरंजन करतात तर दुसऱयाच्या निढळाच्या घामाचे ते पैसे असतात.विचार हा कधीही सद्गुरुकृपेचे खर्च  करीत नाही तर हारामचे खर्च करीत असतो. म्हणूनच दारु घ्यावयाची झाल्या ५ रु.खर्च कराल पण बाबांपुढे पाच आणेसुध्दा ठेवताना दोनदा विचार करता.विचार हा क्षणात असा झटका मारील की त्या क्षणात आपल्या हातून वाटेल ते कृत्य घडून जाते.त्यावेळी विचार हा आपली स्थिती काय होईल याचा विचार कधीच करणार नाही.तो म्हणणार पश्चाताप करायला मन दिले आहे.मी माझे काम करणार मग जन्मभर पश्चाताप करीत बसलास तरी माझे काही जात नाही.आपल्याला गती सापडली नाही पण विचारांची गती सापडली आहे. उदा.- रेडिओ.

मनाने परमेश्वर शोधू गेल्यास विचार लंगडा पडतो व विचाराने तो शोधू लागल्यास,मन लंगडे पडते.जीवनातील फार मोठे गणित आपल्याला सोडवायाचे असेल तर सद्गुरु नामस्मरणाशिवाय दुसरा उपाय नाही. आपणाला जगातील संज्ञा दोन इंद्रियानी होत असते.डोळे व कान हे प्रत्येक पाहिलेल्या व ऐकलेल्या गोष्टेची नोंद आपल्या मेंदूत करुन ठेवीत असतात.डोळे व कान बंद केले की मेंदूरुपी स्टोअरमध्ये साठवलेला माल बाहेर पडायला लागतो विधात्यान्÷ंा मेंदूची रचना अशी केली आहे की या ठिकाणी उत्पन्न झालेला प्रत्येक विचार हा वातावरणात गेलाच पाहिजे व म्हणूनच तुमच्या घरी झालेले बोलणे मी येथे आल्यावर सांगू शकतो.कारण घरी जरी विचार प्रसारीत केलात तरी त्याचे कंप वातावरणात उठतात व तो विचार उत्पन्न करणारे तुमचे डोके माझ्यासमोर येते त्यावेळी त्या डोक्यातसुध्दा तो विचार(तरंग) स्टोअर केलेला असतोच.आपणास नेहमीच सुख पाहिजे पण जर असेल तर दिवस-रात्र,उन-पाऊस,सूर्योदय-सूर्यास्त या गोष्टी एका मागोमाग एक निरंतर चालल्या नसत्या.आपण जर म्हणू की वर्षानुवर्ष आमच्याकडे सूर्य-प्रकाश पाहिजे तर अंधार कोठे पाठवायचा, आपण जन्माला आलो पण आपला गर्भ वाढीला लागल्यावर मुलगा की मुलगी ही गोष्ट निश्चितपणे आपले आई-वडील सांगू शकले नाहीत.जन्माला आलात तेसुध्दा दुस-याला (आईला) रडवून आलात.तुमचा जन्म झाल्यानंतर तुमच्या गळयाजवळ एक प्रकारचा वायु असतो.तो बाहेरील हवेला आत येण्यास प्रतिबंघ करीत असतो व म्हणून तुमच्या पाठीत घपाटा घालतात.त्यामुळे शरीरातील वायु बाहेर पडून तुमचा श्वास चालू होतो.तुम्ही जोरजोराने रडू लागता.त्यानंतर येथे येईपर्यंत रडतच आहात.आता बाबा तुम्हाला एक धपाटा घालतील की त्यानंतर तुम्ही खऱया आर्थाने जीवन जगाल व हसायला लागाल.मागील जन्मातील संस्कार घेऊन आलात पण विचार नाही.नाहीतर गेल्या जन्मीचा डॉक्टर किंवा वकिल म्हणूनच जन्माला आला असता.शिकण्याची काही जरुरीच राहिली नसती पण त्यामुळे मानवाच्या हिताकरीता जे काही लोक संशोधन करीत असतात ते झाले नसते.ईश्वराची तुमच्यावर कृपादृष्टी होती म्हणूनच तर 9महिन्यांनी व्यवस्थितपणे जन्माला आलात.यावरुन जन्मापासून आपण किती पराधीन अहोत हे तुमच्या लक्षात येईल.तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमच्या आईवडीलांनी तुमचे लालन-पालन केले व शिकवीले की जेणे करुन तुमचा चरितार्थाचा प्रश्न सुटला पण अविचार करु नये हे काही शिकविले नाही.नोकरीला लागलात.१००।१५० रुपये पहिला पगार हाती येईपर्यंत सर्व काही ठिक होते.पण त्यानंतर तुमची दृष्टी २५०/३०० रु, मिळविणारा कसा वागतो,इकडे लागली.मग मनात विचार येऊ लागले की याच्याकडे गाडी आहे,याच्याकडे आमुक गोष्टी आहेत.अशा अनेक गोष्टी आपल्याला मिळत नाहीत म्हणून आपण दुखी होतो.आपली जगाकडे पहाण्याची दृष्टी पार बदलून जाते.वास्तविक तुम्हाला किती पैसे मिळावे हे विधीलिखीत आहे व त्या पैशात तुमचा चरितार्थ दान-धर्म व्हावा एवढेच नव्हे तर जर तुम्ही पोपट किंवा कुत्रा पाळलेला असेल तर त्याची सोय सुध्दा तुम्हाला मिळणाऱया पैशात विधात्याने केलेली असते पण वासनेच्या आहारी जाऊन कर्ज झाले.सगळय़ा दृष्टीने अगतीक झालात की अशा परिस्थितीत या दारातून देवाला शोधण्यासाठी आत येता.अशा कर्जापोटी तुम्ही विडे लावता व जीवनाचे चुकलेले गणित सोडविण्याचे प्रयत्न करता. खरे पहाता विधात्याने जन्माला घातलेल्या प्रत्येक किडय़ा,किटकापासून मानवापर्यंत सगळयाची दोन वेळ लागणाऱया अन्नाची सोय केलेली आहे. अन्न-वस्त्र जर तो देणार नाही तर चराचर चालेल कसे?आपण म्हणतो की आम्ही धर्म करतो पण ही गोष्ट चूक आहे.आम्ही धर्म करुच शकत नाही.धर्म करतात बाबा व आपण करतो धर्माचे पालन.आपले विचार इहजन्मात प्राप्त झालेले आहेत.आपल्यानंतर ते पुनःवातावरणात विलीन होतील.

मनाने गत जन्मात खूप भोगले आहे.त्यावर संस्कार झाले आहेत.मन हे काचेसारखे आहे.त्यातून पलिकडचे दिसते,पण त्याच काचेला जर सद्गुरुकृपेचा पारा लावला तर त्यात आपलेच प्रतिबंब दिसू लागते.जीवनाच्या षड़ांगांचे अजून दर्शन झालेले नाही.आपण ज्ञान प्राप्त करुन घेतले व चरितार्थाचा प्रश्न सोडवू लागलो.त्यानंतर तेच ज्ञान-अज्ञान शोधण्याकडे खर्च करतो.मग आपले सर्वच ज्ञान उलटे चालू लागते. दुसऱऱयाला त्रास देण्याकरीता,तासण्याकरिता वापरले जाते.हातात पैसा असतो त्यावेळी,हा कसा,तो कसा,देव कशाला पाहिजे इ.विचार आपण बोलून दाखवतो पण काही काळानंतर आपणाला लग्न होऊन मुले-बाळे झाली की वर वर्णन केलेल्या परिस्थितीत देवाला शोधण्यासाठी यावे लागते.इकडे आल्यानंतर काही जणांच्या मनात विचार येतात की इतके काही करतो पण घरातील अशांतता काही कमी होत नाही.पण घरातील अशांतता निर्माण कोण करते?व ती नाहीशी कशी होईल याचा कधी विचार केलात काय?घरात बाप-लेकाचे पटत नाही.मुलाला घराच्या बाहेर काढण्याची वेळ येते व मुलगा खरोखरच घराच्या बाहेर गेल्यावर त्याला शोधण्यासाठी स्वतः बापच घराच्या बाहेर पडतो.विचाराने अविचार केला किंवा विचाराने विचार शोधता शोधता एक षडविकारातील विकार जागृत झाला.आहाराच्या बाबतीत मात्र बाप-लेकाचे नेहमी पटते.कारण वासना या सारख्याच असतात.पत्नीला किवा मुलाला आपण एखादी गोष्ट प्रेमाणे सागतो पण त्याकडे ते दुर्लक्ष करतात व आपला मनस्ताप होतो.अभ्यासच करावयाचा झाला तर असे समजून येईल की जी गोष्ट आज पत्नीने धुडकावून लावली तीच गोष्ट बरोबर १०वर्षांनी तीला पटेल.कारण तुमच्या व तीच्या वयामध्ये १० वर्षाचे अंतर असणार.या फरकामुळे विचारांच्या पाळतीतसुध्दा तेवढा फरक असणे स्वाभाविक आहे.आज ४०व्या वर्षी सांगितलेले विचार तुमच्या १० वर्षाच्या मुलाला पटत नाहीत पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जरी कुटुंबातील घटकांच्या वयामध्ये फरक असला तरी मन हे एकच असते.भांडायचेच झाले तर मनाने भांडा विचाराने नको. लहान मुले भांडली तरी ५, १० मिनीटात एकत्र येऊन खेळायला लागतात. कारण ती मनाने भांडतात.विचारांनी भांडत नाहीत व त्यामुळे मनात किल्मिष ठेवत नाहीत.आपण विषय तोडायला शिकले पाहिजे.एकाच विषयाचे चर्वीत-चर्वण करण्याने आपला मनस्ताप वाढतो.खालेले अन्नपुन्हा चघळण्याचे काम गाय-बैल करतात.आपण नाही.त्याचप्रमाणे एखादा विषय संपला की तोच मनात घोळविणे हा आपला धर्म नव्हे.तुमच्या डोळ्यांना झालेला विकार हा १५ रु चष्मा लावून जाऊ शकतो पण सद्गुरुचा चष्मा लावला तर नवी दृष्टी प्राप्त होणार नाही का? नोकरी ही सात जन्म आहेच.तुमचे डोळे व डोके बिघडलेले आहे त्यावर सद्गुरुची दृष्टी पडली तर तुमचे जीवन बदलणार नाही का? बाबा हे जगाच्या कल्याणाकरीता मनाने जगले.मी विचाराने जगलो.नुसते विचार प्रबळ असून चालत नाहीत. आपल्या जीवनात बाबांचे निश्चित आधिष्ठान आहे का? विचार कोणी करावयाचा व किती करावयाचा हे एकदा निश्चित ठरवा.एकदा आपण त्यांच्या झोळीत गेलो मग विचार रहातोच कोठे? तुम्हाला नोकरी,प्रपंच, परमार्थ व स्वतःविषयी विचार एवढय़ा गोष्टी करावयाच्या आहेत. सगळय़ाच गोष्टी बायकोपाशी बोलावयाच्या नसतात.विचारांची एक निश्चित पातळी ठरवा.आपण त्याच्या वरही जाता कामा नये किंवा त्याच्या खालीही येता कामा नये.ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहाला अडविण्यासाठी मोठे धरण बांधतात त्याचप्रमाणे तुमच्या प्रपंचात बाबांना स्थान द्या की जेणे करुन आपले सर्व विचार शेवटी त्यांच्यात विलीन होतील.मी बाबांचा व बाबा माझे निश्चित ठरले का?अशी आपली परिस्थिती आहे.येथे येता व आशिर्वाद मागता पण आशिर्वाद कशा वर मागावयाचा ते कळले का?अशा वेळी एखादा भक्त आशिर्वाद मागावयास येतो तेव्हा उदी फुंकण्यास अगर श्रीफल घरात बांधण्यास दिले जाते.श्रीफल बांधल्यानंतर सद्गुरुचे कार्य सुरु होते.घरातील सर्व घटकांची वये लक्षात घेऊन सद्गुरु हे एक (Average) वय काढतात व सर्वच विचारांची पातळी त्या (Average)वर आणतात.विचार व मन यांची एकाग्रता भंग करण्य़ास बहुतांशी षडविकार कारणीभूत असतात. षडविकार यांचा सोपा अर्थ असा की माझ्यात अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे मी दुस-याला सुख,समाधान देऊ शकत नाही.ज्याप्रमाणे मनाचे संशोधन कोणाला करता येत नाही त्याप्रमाणे षडविकारांचेही कोणाला संशोधन करता आलेले नाही.देव-दैविक मार्गातील अनेक पुस्तके सांगतात की या विकारांचा नाश केल्यास उन्नती होईल पण नाश करावयाचा कसा?याचा खुलासा कोठेच केलेला नाही.प्रत्येक माणसात हे विकार असतात.कुणामध्ये राग जास्त तर कुणामध्ये लोभ जास्त.एवढाच फरक. विकार नाही असा मनुष्य मिळणार नाही. अशावेळी प्रश्न असा उभ्दवतो की या विकारावर आपणास विजय मिळवता येईल का?या विकारांचा आपल्यावर काय परिणाम होतो?विकारांची ही अवस्था पूर्णपणे नैसर्गिक आहे.अनेकांनी यावर साधना-उपासनेने विजय मिळवण्य़ाचा प्रयत्न केला.पण ते जमले नाही.वास्तविक पाहता या षड्विकारांमुळे जीवनाला एक प्रकारची मजा येते.मत्सर वाटल्याशिवाय प्रेम काय आहे हे समजणार नाही व लोभ असल्याशिवाय परोपकारही होणार नाही.बाहेरच्या जगात ज्यावेळी पैशाचा लोभ ठेवाल त्याच वेळी येथली फकिरी द्याल.यावरुन आपणास असे कळून येईल की षड्विकार हे माणसाच्या जीवनात हवेच.फक्त ते एका प्रमाणात असले पाहिजेत व हे कार्य सद्गुरुच करु शकतात.म्हणूनच उपासना व नामस्मरण याने मनाची व विचारांची एकतानता होते व आपण सत्विक मार्गाची वाटचाल करु लागतो.अशा रितीने मन व विचारांची सांगड सद्गुरु घालून देतात त्याचवेळी मनुष्य सद्गुरु सानिध्यात जाऊ लागतो व त्याला आपले जीवन निश्चित करावे लागते.परंतु अजूनसुध्दा आपल्या जीवनात निश्चित अशी भूमिका नसल्यामुळे गुरुसानिध्यात जाऊनसुध्दा आपली प्रगती होत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यत आपले कार्यक्रम निश्चित आहे का?आपणच निश्चित नाही तर जीवनात सुख आहे हे तरी कशाच्या अधारावर सांगू शकता?जन्माला आलात तेच आईला रडवून आलात. पोटात पिंड पोसला जात असताना मुलगा कि मुलगी हे आईला निश्चितपणे सांगता येत नाही.तेथे तुम्ही तरी निश्चित सुख कसे निर्माण करणार?आपण विचारांनी सुख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो विचारांनी विचाराला शोधतो पण प्रत्यक्षात काही निष्पन्न होत नाही कारण विचारांनी विचार शोधल्यावर षडविकार कार्य करु लागतात व त्यामुळे मन निर्बल होते.याकरिता आहार निश्चित पाहिजे.तो जर निश्चित नसेल तर विचार निश्चित होणार नाहीत.आपण कानांनी ऐकविलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो पण डोळय़ांनी बघितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही.ज्ञानाच्या दोन अवस्था आहेत.रोज दैनंदिन जीवनात पाहिलेल्या वस्तूजर डोळे बंद केले तर आपण ओळखू शकत नाही.त्याचप्रमाणे “मी पुष्कळ देवधर्म केला”असे म्हणणाऱयाला डोळे बंद करण्यास सांगितले तर केलेली उपासना तो ओळखू शकेल काय?म्हणजेच केवळ अज्ञानेने केलेली उपासना ही प्रत्यक्ष ज्ञान म्हणून कवटाळीत असतो.वास्तविक ती उपासना ही अज्ञानच होय.ज्यावेळी नोकरीसाठी आपण बाबांचा आशिर्वाद मागतो त्यावेळी गादीला मान म्हणून सव्वा रुपया ठेवतो.त्यावेळी तुम्हाला नोकरी नसते पण तरीही तुम्ही सव्वा रुपाया ठेवता.त्यानंतर तुम्हाला नोकरी लागते व पुढे एखाद्या गुरुवारी तुम्ही बाबांपुढे सव्वा पाच रु. ठेवता.पूर्वीचा सव्वा रुपाया व नोकरी लागल्याने नंतरचे सव्वापाच रु.ठेवण्यापर्यंतचे आर्थिक साहय़ विधात्याने लिहून तुम्हाला या जगात पाठविले.हे ऋणानुबंध देहाचे विसर्जन होईपर्यंत तुम्हाला द्यावयाचे आहेत.त्याशिवाय पुर्नजन्मामध्ये मन कार्य करु शकत नाही.“त्यांनी द्यावे व मग त्यांना देऊ” असे म्हणणारे भक्त येतात पण आजपर्यंत तुला जे मिळाले त्यापैकी तू किती दिलेस?काहीही दिले नाहीस.मग आता देऊन बघ.सद्गुरु तुला परत करतात की नाही,बघ! पण इतकी जीद्द कोठे आहे?जोपर्यंत मन कार्य करणार नाही तोपर्यंत कोटरु,मिळाले तरी समाधान होणार नाही.यासाठी मन निर्बल होता कामा नये.मनाला सर्व प्रकारचे ज्ञान असते.त्याला उत्पत्ती, स्थिती,लय ह्या तीनही अवस्था माहीत आहेत.विचारांचे विसर्जन करून मन नवीन देह धारण करते.त्याने सर्व काही अनुभवलेले असते. त्याने सर्व काही अनुभवलेले असते.त्याची जीवनाकडे पहाण्याची दृष्टी ध्यैयवादी असते.परंतु सद्गुरुकृपेच्या पाऱयाशिवाय ते स्वतःला शोधू शकत नाही आणि स्वतःला शोधल्याशिवाय दुस-यामध्ये चांगले काय आहे हे कळत नाही.हे कार्य मन करीत असते आणि दुस-यात काय वाईट आहे हे विचार शोधत असतात.ज्यावेळी संस्कारमय जीवन अविचारी बनते त्यावेळी मनाचे कार्य थांबते व विचार कार्य करु लागतात.विचारांची अवस्था ही अस्थिर आहे व त्यामुळे विचार कोणत्याच चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तयार नसतात.प्रत्यक्ष दादांच्या व बाबांच्या विषयीसुध्दा विकल्प निर्माण होतात,ते विचारांमुळेच.परंतु आपल्याला या सगळय़ा गोष्टी माहीत असल्यामुळे आम्ही त्या गौण मानतो कारण आम्ही तुमच्या मनाचा स्वीकार केलेला आहे.बुध्दिचा कि वा विचारांचा नव्हे.तुमच्या मनाची व आमची जुनी ओळख आहे व ती पुढेहि जन्मोजन्मी राहिल.यावरुन तुमच्या लक्षात येईल की आम्ही घेत असलेली मुलाखत तुमच्या विचारांना पटत नाही तर तुमच्या मनाला.त्यामुळे या अनिश्चित जीवनातील कित्येक गोष्टी मनाला पटतात पण विचारांना पटत नाहीत.मन हे सर्व व्यापी आहे.सर्व पशुपक्षांमध्ये व मानवामध्ये मन हे एकच असते.मनाचे कार्य हे चैतन्याचे कार्य आहे.परंतु अविचाराच्या भोवऱयात हे कार्य नजरेस येऊ शकत नाही व म्हणूनच सद्गुरुकृपेची जोड हवी.साध्या चष्म्याशिवाय चाचपडत जावे लागते.मग सद्गुरुंच्या चष्म्याशिवाय जीवन नरकासारखे होईल यात काय नवल?बाबांची दृष्टी पडली तर सृष्टी बदलेल पण सर्व प्रथम आपली दृष्टी साफ हवी.आपल्या जीवनात सद्गुरुकृपेचे आधिष्ठान आहे का?प्रत्येक कार्य ज्यावेळी संशोधनाने चैतन्याप्रत जाते त्यावेळी ते चैतन्य विचारांच्या अनुरोधाने मनाप्रत जाते आणि त्यावेळी जगाच्या कल्याणासाठी ते संशोधन विश्वामध्ये प्रचारात येते.या वेळी विचार भावनेने मनाकडे जातात आहार व आचार जर निश्चित नसतील तर विचार निश्चित होत नाहीत.आहाराच्या शुध्दतेवर विचारांचे स्वरुप अवलंबून आहे.या ठिकाणी 3 या आकडय़ाखाली दुसरा 3 हा आकडा लिहिला तर काही बोध होत नाही.त्याच्या मागे काही तरी चिन्ह हवे.3हे बाल्य,तारुण्य व वार्धक्य असे धरले तर दुसरे 3हे आचार,विचार व आहार असे धरले.या दोधांचा सद्गुरुरुपी x चिन्हाने गुणाकार केला तर नवविधा भक्ति मिळेल. + चिन्ह घेतले तर षड्विकार मिळतील व – ( — ) उणे चिन्ह घेतले तर बाकी शून्य होऊन जीवनात काहीच शिल्लक रहाणार नाही.उलट क्रमाने गेल्यास मनुष्य जन्मतःच शून्य अवस्थेत असतो.त्यानंतर त्याला षड्विकारांना तोंड द्यावे लागते व त्यानंतर त्याला आचार,विचार व आहार निश्चित करावे लागतात.शेवटी दुर्घर अशा साधनेनंतर त्रिगुण-तत्वाची ओळख होते.यावरुन बाबा हे आपल्यापासून किती दूर आहेत याची आपणास कल्पना येईल

[मुलाखतीचा उद्देश म्हणजे समितीने केलेल्या कार्याचा आढावा घेणे व दैनंदिन आचरण कसे वागावे हा आहे. त्याचा खुलासा विविधप्रकारे केला आहे. बुध्दि, मन, विकार व विचार अशा विषयांचा उहापोह करून ते विषय वेगवेगळय़ा  प्रकारे समजावून दिले  आहेत.]