31-7-61

आज साधन-पत्रिका तपासल्या.ज्यांनी आणल्यानाहीत त्यांना न आणण्याची कारणे विचारली.एका-दाघांनी बनवाबनवी करण्याचा प्रयत्न केला.बाबा म्हणाले “गुरुला सुध्दा तुम्ही फसविण्य़ाचा प्रयत्न करता मग आई-बापाला फसवाल याच काय संशय”. एका सेवकाला विचारले की तुम्ही रहाता दादरला.नोकरी करता कल्याणला व साधनपत्रिका मात्र नाशिकला.हे असे का?तुमच्याकडे वर्दीहा प्रकार आहे ना?.तुम्ही ऍाफिसर आहात पण ऑफीसमध्ये जाताना नुसता शर्ट-लेंगा चालत नाही.तर योग्य तो युनिफार्म घालावा लागतो.त्याचप्रमाणे येथे येताना धूतवस्त्र रुद्राक्ष व साधन पत्रिका पण आणली पाहिजे.तुम्ही गुरुला की ज्यांना तुमच्या हाडामासात काय आहे हे स्पष्ट दिसते त्यांना फसवता हे ठिक नाही, हे लक्षात ठेवा.

“सौ चोट सुनार की ओर एक लुहार कि”

[ सर्व सामान्याची वृत्ती  कशी  असते  हे दाखविले आहे.तथापी  समितीच्या  कार्याचा लाभ  घेण्यास आल्यानंतर जीवनात सकारात्मक बदल घडणे आवश्यक आहे.सबब जीवन कसे जगावे हे ह्या मुलाखतीतून  सूचविले  आहे.]