3.1.1962

आपण आपण आपण म्हणत असतो की मला ऐहिक सुख पाहिजे आहे.पण ऐहिक या शब्दाचा अर्थ कळला का? या जगात जे निर्माण झाले किवा परमेश्वराने निर्माण केले ते म्हणजे ऐहिक. उदाहरणार्थ ,मुळा ही भाजी,त्यात आवश्यक तेवढाच मसाला घालून तो मुळा खाणे म्हणजे ऐहिक सुख अनुभवणे होय. पण आपण कोशिंबीर करताना मीठ मिरची,खोबरे जास्त घालतो.अशी तयार झालेली कोशिंबीर म्हणजे ऐहिक सुख नव्हे.आपल्या ठिकाणीऐहिक वासना आहेत.म्हणजे अनैसर्गिक जीवन जगतो आहो.त्या ऐवजी ऐहिक इच्छा म्हहणजे नैसर्गिक जीवन जगले पाहिजे.जन्मऋणानुबंघाने प्रत्येक वेळी जन्म घेतला.त्यात चैतन्य म्हणजे “तो तू आहेस” व आवरण कर्मऋणानुबंधाचे आहे.पुनःश्च तशी कर्मे घडू नयेत म्हणजे जन्मऋणानुबंध कमी होईल.

आकाश तत्व                      शब्द              अन्नमय
कर्मेँद्रिय (सात)                   चैतन्य            चैतन्य
सहा विकार                       जीव               परमेश्वर
काया वाचा व मन                ऋणानुबंध

ज्यावेळी सृष्टीची उत्पत्ती झाली त्यावेळी ॐ (अ, ऊ, म) या शब्द तन्मात्राने आकाशतत्व (पोकळी निर्माण केली व त्यामुळे आपण बोललेला शब्द दुस-याला ऐकायाला येतो.तत्व आणि शब्दांची पूर्णावस्था झाल्यावर अस्तित्व म्हणून कर्णेक्रिय व तिघांचा भाव जागृत होण्यासाठी चैतन्य म्हणजे ज्ञान निर्माण झाले.

शब्द तन्मांत्रात दोन प्रकार : (1) व्यक्त (2) अव्यक्त.

जीवाला म्हणजे चैतन्याला दुखाची जाणीव झाली.चैतन्य ज्ञानी असून त्याने अज्ञान निर्माण केले व शब्द तन्मात्राला घेऊन बाबांच्या समोर दुख व्यक्त केले व त्याच बरोबर ते दुख बाबांच्या झोळीत आले.पण त्याचवेळी अव्यक्त तन्मात्राचे कार्य चालूच असते.मला दुख आहे म्हणजे मी सगुण व त्यावेळी आकाश-तत्व व शब्द-तन्मात्र निर्गूण असते.मी दुखी आहे.शब्द-तन्मात्र व्यक्त झाले व दुख बाबांच्या झोळीत गेले.पण त्याचवेळी अव्यक्त तन्मात्र स्वतःच्या भोवतीने वलय निर्माण करीत असते. दुख निवारणार्थ सेवा करायला सांगितली आहे.पण वाटेल ते झाले तरी मी सेवा करणार नाही.पूजा,पाठ,जप करणार नाही.साधकारणा या अव्यक्त तन्मात्रापासून फार धोका असतो.तुम्ही बोललात, मी ऐकले.नाद सारखा तर निरंतर नाद ऐकले की लगेच ते निर्गुण झाले. परमेश्वर सगुण तर मानव निर्गुण व मानव निर्गुण तर परमेश्वर सगुण. कर्म कर पण भोक्ता होऊ नकोस. एकदा सांगितले की, पुन्हा विडा लावून विचारू नकोस.मी रहाणार आहे.तू जाणार आहेस.ज्याचे ज्ञान जाणवले ते सगुण.

“भज” हा शब्द उच्चारल्या बरोबर देवाकडे लक्ष जाते.एका उच्चाराने अन्नमयकोश तर दुस-याने चैतन्य जागृत झाले.शब्द-तन्मात्रांमागे रस-गंध आहेत.आपली देहधारणा चैतन्यमय आहे.ती जागृत असणे याला जागृती म्हणतात.मी दुख सांगितले,आता कामाचा विचार न करिता बाबांचे नाव घेतले म्हणजे मी निर्गुण झालो व नामःस्मरण केलेस म्हणजे पुन्हा सगुण झालो.पातक व प्रमाद म्हणजे केलेले खून अगर मारामारी नव्हे.तर जे अज्ञानाने बाबांकडे मागता ते न मागणे म्हणजे पुनःश्च तशी कर्मे न घडणे.नित्य-जीवन झाले म्हणजे संकट वाटत नाही.दररोज ऑफिसचा कंटाळा येत नाही.पण रविवारी बोलाविल्यास संकट वाटते.नामःस्मरण जीवनात नित्य असले म्हणजे आपण सद्गुरुच्या निरंतर सानिध्यात राहू.साधनेची संवय लागली पाहिजे.रोजचा व्यवसाय करीत असता,बारा वाजलेले कळत नाहीत.दोन्ही गणिते बरोबर चालली पाहिजेतच.