4.2.1962

तुम्ही आमच्या समोर बसता.आमच्याकडे साध्य आहे म्हणजे वाटेल ती कामना पुरी करू शकतो.आम्हीं असाध्य असे साध्य करून बसलो आहोत.तुमच्याजवळ साध्य नाही व सिध्द नाही.म्हणून समोर बसून काही मागता.“माझे ठाण्याचे काम करा”असे म्हणता पण मी तुमचे ठाण्याचे काम करीन असा कधी ही उच्चार करत नाही तर तुम्ही जी इच्छा कराल त्यावर फक्त “अच्छा मंजूर” एवढेच म्हणतो.आजपर्यंत सिध्द झालात.आता यापुढे साध्य मिळवा.आजपर्यंत पोथी वाचलीत.ओवी-बध्दता आली.नवनाथांचे कार्य समजले.आता यापुढे प्रत्येकाची स्वतंत्र पोथी.तुम्ही वातास्त्र मागाल तर मी सांगेन सध्या तुझ्याकरिता Boeing विमान ठेवले आहे.ते विमान म्हणजे वातास्त्रच आहे.

मच्छिंद्रनाथानी त्या स्त्रिला संजीवनी दिली व सांगितले की मुलगा होईल ती संजीवनी म्हणजे साध्य होते.आम्ही आशिर्वादाच्या रूपाने आमच्याजवळील साध्य देऊ शकतो पण त्याचे फळ येण्यासाठी कोणाच्या तरी ठिकाणी प्रथम कामना उद्भवली पाहिजे. ज्यांच्या हातात प्रत्यक्ष संजीवनी होती त्यांना गोरक्षनाथ तयार करता आले नसते का?पण त्यानी तसे केले असते तर ती सिध्दी झाली असती व आम्ही सिध्दी वापरत नाही म्हणून त्या स्त्री पोटी कामना उदीत केली व मग आशिर्वादाच्या रूपाने साध्य दिले.यानंतर आशिर्वाद हा घेण्यावर अवलंबून असतो.याने मुलगा होईल का मुलगी होईल असा विचार आला असता मुलगीच झाली असती.जे मच्छिद्रनाथांनी म्हटले तेच बाबांनीं म्हटले “जया मनी जैसा भाव,तया तैसा अनुभव”. ज्याच्याबद्दल अपेक्षा करशील ते सिध्द होणार आहे.साध्य म्हणजे देवऋण जोड़ून तू अजून सिध्दच मागतोस पण तू सिध्द आहेस का?उत्तम तत्त्वाचरण जीवनात सुख देते.हेच जीवनाचे साध्य आहे.आरतीला किती दिवस उपस्थित व अनुपस्थित होता यावरून तुमची प्रगती कळेल.