4-2-62 रविवार अष्टग्रही

काल जी मुलाखत घेतली,त्यामुळे ग्रहांच्या युतीचा परिणाम अनिष्ट होतो, हा दृढमूल झालेला विचार बदलला. हे संस्कार शेकडो वर्षे होत आलेले आहेत व पुढे ही अनेक वर्षें तसेच रहातील.पण निदान आपल्या भक्तमंडळींचा दृष्टीकोन बदलला ही गोष्ट चांगली झाली आहे.आपण निर्सगाकडे दूषित दृष्टीकोनाने बघतो.मंगळ हा भूमीपूत्र मानता. मंगळ हा उत्पात घडवितो,असेही म्हणता.पण हा मंगळ पृथ्वीला कसा बुडवील.आईच्या पोटात सुरा खुपसणारा मुलगा अजून जन्माला यावयाचा आहे.याशिवाय पृथ्वी ही रवीची कन्या.त्याच बरोबर गुरू हा आहेच.हे दोघेजण पृथ्वीचा नाश कसा होऊ देतील.बुध व शुक्र हे दोघे रासायनिक ग्रह पण त्यांची शनीशी युती झाल्याशिवाय ते लोखंडात उतरत नाही व त्यांच्या जोडीला मंगळ आल्या शिवाय त्या लोखंडाचे रुपांतर वहानात होऊ शकत नाही.एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी जाण्याचे काम मंगळ करीत असतो.वरील उदाहरणातून तुमच्या लक्षात येईल की ग्रहांची युती होऊन परिणाम वाईट नाही तर चांगलाच होतो.मंगळाला विष ओकायचे असले तरी त्याला प्रतिबंध करायला गुरु,रवि समर्थ आहेत.तुम्ही  सगळेजण आकाशा तल्या ग्रहांची काळजी करता, पण या पृथ्वीवरचे ग्रह आहेत त्यांची दखल घेतलीत का?

नेहरु हे गुरु,केनडी हा शुक्र,चीनचा माओ हा मंगळ (काही करणार नाही पण लोणी खायला हजर राहील) कुश्चेव्ह हा शनि ( प्रत्येकारणा म्हणेल तुमचे बरोबर पण आपल्याला पाहिजे तसे केल्याशिवाय रहाणार नाही)आता क्रुश्चेव्हला जरी वीष ओकायचे असले तरी नेहरु व केनडी त्याला तसे करु देणार नाहीत.दोघेही जण केनेडीला वेगवेगळे भेटले,पण तिघेजण अजून एकत्र आले नाहीत. मनावर संस्कार झालेला असतो व ते म्हणत असते की एवढे चांगले करतोस तर निदान 10 मिनिटे ईश्वराचे नाव घे.पण ती काया काहीतरी सबब सांगून धुडकावून लावते.हे जसे आहे तसेच नेहरुंचा शब्द(मन) भारतीय जनता (काया) धुडकावून टाकते.पण केनडीचा शब्द अमेरिकेत लोकप्रमाण म्हणून पाळतात.गुलाबाच्या फुलावर तुमचे फार प्रेम आहे.ते रोपटे सुकत चालले आहे.तुमचे प्रेम दिलेत,पैसा सोने-नाणे दिलेत म्हणून ते टवटवीत होणार नाही.तुम्ही वाटेल ते द्या.एका पेलाभर पाण्याशिवाय त्याला जीवन व्यर्थ होईल.तसेच आपले जीवन कृपेशिवाय व्यर्थ होईल.

तुम्ही आमच्या समोर बसता.आमच्याकडे साध्य आहे म्हणजे वाटेल ती कामना पुरी करू शकतो.आम्हीं असाध्य असे साध्य करून बसलो आहोत.तुमच्याजवळ साध्य नाही व सिध्द नाही.म्हणून समोर बसून काही मागता.“माझे ठाण्याचे काम करा”असे म्हणता पण मी तुमचे ठाण्याचे काम करीन असा कधी ही उच्चार करत नाही तर तुम्ही जी इच्छा कराल त्यावर फक्त “अच्छा मंजूर” एवढेच म्हणतो.आजपर्यंत सिध्द झालात.आता यापुढे साध्य मिळवा.आजपर्यंत पोथी वाचलीत.ओवी-बध्दता आली.नवनाथांचे कार्य समजले.आता यापुढे प्रत्येकाची स्वतंत्र पोथी.तुम्ही वातास्त्र मागाल तर मी सांगेन सध्या तुझ्याकरिता Boeing विमान ठेवले आहे.ते विमान म्हणजे वातास्त्रच आहे.मच्छिंद्रनाथानी त्या स्त्रिला संजीवनी दिली व सांगितले की मुलगा होईल ती संजीवनी म्हणजे साध्य होते.

आम्ही आशिर्वादाच्या रूपाने आमच्याजवळील साध्य देऊ शकतो पण त्याचे फळ येण्यासाठी कोणाच्या तरी ठिकाणी प्रथम कामना उद्भवली पाहिजे. ज्यांच्या हातात प्रत्यक्ष संजीवनी होती त्यांना गोरक्षनाथ तयार करता आले नसते का? पण त्यानी तसे केले असते तर ती सिध्दी झाली असती व आम्ही सिध्दी वापरत नाही म्हणून त्या स्त्री पोटी कामना उदीत केली व मग आशिर्वादाच्या रूपाने साध्य दिले.यानंतर आशिर्वाद हा घेण्यावर अवलंबून असतो.याने मुलगा होईल का मुलगी होईल असा विचार आला असता मुलगीच झाली असती.जे मच्छिद्रनाथांनी म्हटले तेच बाबांनीं म्हटले“जया मनी जैसा भाव,तया तैसा अनुभव”.

ज्याच्याबद्दल अपेक्षा करशील ते सिध्द होणार आहे.साध्य म्हणजे देवऋण जोड़ून तू अजून सिध्दच मागतोस पण तू सिध्द आहेस का?उत्तम तत्त्वाचरण जीवनात सुख देते.हेच जीवनाचे साध्य आहे.आरतीला किती दिवस उपस्थित व अनुपस्थित होता यावरून तुमची प्रगती कळेल.ग्रहांचे अंश मोजता पण तुमचे जीवन किती अंशाचे आहे.जर 10 अंशाचे जीवन घडले तर 5 अंश प्रपंच व इतरेजनासाठी तीन अंश वेडेवाकडे वागण्यासाठी 1 अंश आजपर्यंत साधना म्हणून केलीत त्याच्यासाठी , म्हणजे.।।. अंश जीवन खऱया साधनेसाठी रहातो.म्हैस कश्यासाठी पाळायची हे ज्याला कळेल त्यालाच (साधना)उपासना कश्यासाठी करायची हे कळेल.आज आरती करण्यापासून ते आलेल्या भक्ताचे जोडे नीट लावण्याची मनाची तयारी झाली ती सहिष्णुता आली.म्हणजे तुम्ही सिध्द झालात.तुम्ही आँफीसमध्ये 30दिवस काम करता तुमचा साहेब हे बघत असतो,पण तिकीटावर पेनने तुम्ही सही केल्याशिवाय पगार मिळत नाही.पेन सिध्द झाल्याशिवाय पगार साध्य होत नाही.बंकेंत ठेवलेले तुमचेच पैसे पाहिजे असल्यास पेनने सही करावीच लागते.पण त्या पेनविषयी कधी कृतार्थभाव प्रगट केलास का? अरे,तू पेनशी बोलत नाहीस तर बाबांशी काय बोलणार! घरात गाडी असते पण कधी हात लावून प्रार्थना केलीत का “हे माते,तू सर्वाना मुंबई दाखवून सुरक्षितपणे घरी आणलेस,तुझ्याशिवाय जीवन व्यर्थ आहे.अशीच जन्मजन्मांत उतराई हो”, अशी प्रार्थना केली नाहीच पण पैशाच्या धुंदीत मी पैशानी गाडी विकत घेतली या अहंभावात तुम्ही धुंद झाला आहात.परिणामी घरातील गाडी जाते.तुमचा ऱहास कसा होतो आहे याचा बारकाईने विचार करा.

तुमच्या घरीं टेलीफोन आहे.दिल्लीला जायला200रुपये खर्च येत  असेल पण घर बसल्या दोन/चार आण्यात लाखो रुपयांचा धंदा करता.तुम्ही बोलता म्हणजे शब्द तन्मात्र आहे.ती शक्ती उध्दारार्थ आहे.त्या शक्तीने किती कामे करता.पण टेलिफोनला नमस्कार केलात का?डोळय़ावरचा चष्मा काढला तर सर्व व्यवहार थांबतात.  एका सूज्ञ माणसाच्या बुध्दीने त्या चष्म्यात त्याने चैतन्य निर्माण केले व तुमच्या इंद्रियाच्या ठिकारणची शिथिलता त्याने नाहीशी केली.चष्म्याशिवाय जीवन नाही मग सद्गुरु शिवाय जीवन कसे जगणार? पेन तुमच्या खिशात सदैव तत्परतेने बसलेले असते.त्याच्या विषयी एवढी अनास्था. त्याची कधी पूजा होत नाही.मग बाबांची पूजा करणार याच्यावर विश्वास कसा ठेवावा.

जीवनात क्षणोक्षणी सहाय्य देणाऱया या सर्व गोष्टींचा आशिर्वाद ज्याला समजू शकला नाही त्याला बाबांचा आशिर्वाद जन्मांत समजू शकणार नाही.चष्म्यापासून ते ईश्वरापर्यंत, आपण जाऊच शकत नाही.ही भावना म्हणजे सिध्द होणे.आता साध्य साधावयाचे आहे.दुधाची साय दुधातच असते,पण साय मिळण्याकरिता दूध तापवावे लागते.सिध्दता जशी जशी पूर्णत्वाला जाईल तस तशी साध्यता साध्य होईल आता आपणाला चहा प्यावयाचा आहे.कपातला नव्हे तर स्मृतीतला. प्रपंचात सिध्दता आहे व परमार्थात साध्यता आहे.तुम्ही 8दिवस गादीवर नुसते झोपून राहिलात.त्याचा उपयोग केला नाहीत तर ज्या दिवशी चालायला लागाल त्यावेळीं ते कापू लागतील.पाय तुमचेच आहेत,पण त्यांनी त्यांचा धर्म सोड़ून चालत नाही.आपणही आपला धर्म सोड़ून चालणार नाही.मोठे भांडे दोन हातानी सहज उचलता येते एका हाताने उचलता येत नाही.त्याच प्रमाणे प्रपंच व परमार्थ दोन्ही बरोबरच करायचे.प्रपंचांत सिध्दता आहे व परमार्थात साध्यता आहे.