5-2-1962.प.पू.हाजी बाबांची मुलाखत

आपल्याला इतके सुख पाहिजे की त्या सुखाचा उपभोग घेत असताना आपल्याला त्रास होता कामा नये.उदा–मनुष्य एका खोलीत रहात असताना एकच खाली असल्याने साफ करताना होणारा त्रासही खूप  खोल्यामध्ये राहून सफाई  करणा-या माणसापेक्षा अर्थातच कमी असतो. तसेच अधिक पैसे मिळवणारा हा कमी पैसा कमविणा-या माणसापोक्षा भराव्या लागणा-या टॅक्समुळे अधिक त्रासलेला असतो.जगामध्ये जीवन तर जगणे आहेच.परंतु ते आपण कृत्रिमतेने जगतो.एक मनुष्य अंगठी घालतो.(अर्थात कुठल्या ही बोटात).पण ती का घालायची,कोणत्या बोटात घालायची याची कारण मीमांसा कोणाला माहित नाही.

जगामध्ये एक अनुभवसिध्द व दुसरे स्वानुभव सिध्द असे दोन प्रकारचे लोक असतात. अनुभवसिध्द आपण व स्वानुभवसिध्द म्हणजे प.पू.विभूती. स्वानुभवसिध्द लोक त्याना स्वतःला आलेल्या अनुभवावरून लोकाना मार्गदर्शन करतात.त्यामुळे त्यांची वाणी अत्यंत मोलाची असते.परंतु अनुभवसिध्द हे इतर व्यक्तिंचे अनुभव गोळा करून मग मार्गदर्शन करतात.त्यामुळे ते अनुभव संपल्यावर पुन्हा कोणाला मार्गदर्शन करावयाचे असेल तर पुन्हा इतर व्यक्तिकडून अनुभव गोळा करणे भाग पडते आणि त्यामुळे तत्पुर्वी एखाद्याला मार्गदर्शन करणे त्याना जड जाते.भक्ताने वंदनीय दादांच्या बरोबरीने राहीले पाहिजे.भक्ताने मध्यस्थाला विसरता कामा नये. जर तो स्वतः वंदनीय दादांपेक्षा श्रेष्ठ होऊ लागला तर तो कबरस्थानी जाणार.मानव जन्म चालू असताना मृत्यू पुढे असतो व तो वंदनीय दादांच्या मागे राहीला तरी तो कबरस्थानी जातो.कारण जन्म प्राप्त होण्यापूर्वी तो पण तेथेच असतो म्हणून पंत महाराज म्हणतात

आरंभ नाही शेवट कासा?
मध्य स्थितीला विसरू नको ।।

अजून जन्मही नाही आणि मृत्यू ही नाही म्हणून मध्यस्थाला तू विसरू नकोस.

ज्योतिषाने वर्तविलेले भविष्य सर्वच्या सर्व बरोबर येऊ शकत नाही.त्यातील 30% खरे होते व 70% भविष्याचा अंदाज चुकतो.असे का? कारण भविष्य पहाणे अतिशय कठीण आहे.भविष्य म्हणजे काय? तर वर्तमान काळातील घटनांची पूर्णावस्था.असा त्रिकालाचा आराखडा ध्यानात घ्यावा लागतो.असे झाले म्हणजे 100% भविष्य खरे होईल.पण ते अतिशय कठीण आहे.एखादे झाड आहे.त्याला आवश्यक असणारी जमीन आपण अभ्यासू व अशा त-हेने ते झाड चांगले वाढीस लागेल ह्याची खात्री देऊ पण त्याला किती फळे (त्याच्या हयातीपर्यंत)हे आपण सांगू शकणार नाही.कारण त्याला आवश्यक असणारे,ते झाड व जमीन,ह्यांचे ज्ञान या दृष्टीने आपल्याला अपुरेच आहे.

इंजिनाला एखादा डबा व्यवस्थित जोडल्यास ते इंजिन निश्चित व अपेक्षित जागी जाऊ शकेल. तसेच आपल्या भविष्याचे आहे,जीवनाचे आहे. आपले जीवन एक चैतन्यरुपी इंजिन आहे.ते इच्छेप्रमाणे शीघ्रगतीने पुढे-पुढे जात असते.परंतु भूतरुपी अवस्थांची पूर्णावस्था म्हणून वर्तमान काळातील होणा-या अवस्थांची पूर्णावस्थारुपी हा डबा इंजिनाला व्यवस्थित जोडला नसल्याने आपण मूळ जागी स्थिर रहातो.तेव्हा हे जोडण्यासाठी परमेश्वराची कृपादृष्टी हवी असते.त्याच्या करवी हे डबे चैतन्यरुपी इंजिनाला जोडल्यास भविष्यकाळ काही तरी सुखकारक ठरतो.जेव्हा तुम्ही प.पू.बाबांना प्रश्न विचारता तेव्हा बाबांना ह्या भूत,वर्तमान,भविष्य ह्या त्रिकालाचा विचार करावा लागतो.प.पू.बाबा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची Positive and Negative बाजू विचारात घेतात.

  1. जेव्हा 30% Negative and 60 % Positive प्रश्न असतो तेव्हा नुसती उदी घरात फुंकायला सांगून काम होते.
  2. .जेव्हा 60% Negtive व 30% Positive प्रश्न असतो तेव्हा प..पू.बाबा तुम्हाला दानापासून अनुष्ठानापर्यंत सेवा करायला सांगतात आणि
  3. ज्यावेळी 100% प्रश्न Negative असतो तेव्हा बाबांना आमचे काम कधी होईल असे सारखे विचारणे अनावश्यक असते.

कारण अशा वेळेला सर्वस्वी परमेश्वराधीन ती गोष्ट असते.त्यामुळे आपण प.पू.बाबा सांगतील त्याप्रमाणे उपासना चालू ठेवणे.

ज्यावेळी बँकेतून आपल्याला100रु.चेकवर Cash हवी असते तेव्हा ती काऊंटरवर सहजपणे मिळू शकते.पण जर5000 रु.च्या चेकची Cash ह्वी असेल तर ती सहजपणे मिळू शकत नाही.कारण काऊंटरवरच्या नोकराला मॅनेजरला जाऊन विचारावे लागले.5वरच्या4शून्यामुळे काऊंटर वरच्या नोकराची जबाबदारी वाढलेली असते म्हणून तो साहेबाला विचारून  गि-हाईकाचे काम करतो.तसेच भक्ताच्या प्रश्नामध्ये Negative बाजू जास्त असलेल्या प.पू.बाबांनासुध्दा आपल्याहून श्रेष्ठ असलेल्या परमेश्वाला विचारून यावे लागते व मग निराकरण होते.
अश्रध्दा म्हणजे काय?ज्याची श्रध्दा नाही असा. समजा,तुम्हाला येथे येऊन एका ग्लास दूध पिण्यास दिले,देताना तुम्हाला सांगितले की हे गायीचे शुध्द दूध आहे.परंतु देताना त्यात पाणी घालून दिले.परंतु तुमची श्रध्दा असल्याने म्हणजे प्रत्यक्ष सत्य काय आहे हे माहीत नसल्यामुळे ते दूघ जेव्हा-जेव्हा त्म्हाला दिले जाईल तेव्हा-तेव्हा ते प्राशन कराल.पण एखादे दिवशी स्वतःला त्या गायीचे दूध काढायला सांगितले.आज्ञेप्रमाणे तुम्ही तेथे गेलात परंतु त्या जागी तुम्हाला गाय नसून शेळी दिसली तर तुमच्या श्रध्देला तडा जाईल.ते दूध घेण्यास तुम्ही काहीसे नाखूष व्हाल. वास्तविक तुमचा उद्देश दूध पिणे हा आहे.परंतु गाईऐवजी शेळी दिसल्याने तुमच्या ठिकाणी  अश्रध्दा निर्माण झाली.श्रध्दा ही इतकी कमकुवत असू नये.

प.पू.बाबांचे कडून आपल्याला आपले कल्याण करून घेणे हाच एक उद्देश आहे.तेव्हा आपली श्रध्दा कोठल्याही त-हेने ढासळू देऊ नका.