20-2-1962 प.पू.जिलानी बाबा
या ठिकाणी कार्याला सुरुवात झाली त्यावेळी हाजी मलंग बाबांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज होत असे.सुरुवातीला आरती पॅंट शर्टमध्ये होत असे.कामकाज दररोज होत असे.कोणी केव्हाही आला तरी प्रश्न विचारू शकत होता.पण त्या सत्पुरुषाचा गैरफायदा घेण्यात आला. केव्हाही प्रार्थना करा ते येत असत.प्रत्येकाशी हसत खेळत गोड आवाजात ते विचारपूस करीत असत.त्यानंतर गेल्या तीन वर्षापासून मी या केंद्राचा ताबा घेतला आहे.एक कार्य पध्दत ठरवून दिली.सेवकांना कितपत जमेल याचा करीत बसलो असतो तर हे कधीच जमले नसते.पहिल्या प्रथम तुम्हाला कुलदेवदेवतांच्या ऋणानुबंधातून मुक्त केले.त्यानंतर तुमच्या वाडवडिलांच्या अतृप्त वासना तुमच्या मार्गात येत असल्यामुळे त्यांना तुमच्यापासून बाजूला केले व होम-हवनादी विधी करून शेष देवता दिली.बाहेरच्या जगात आपणास असे कित्येक साधक दिसतील की त्यांची सेवा कित्येक वर्षे चालू आहे पण त्यांच्य़ा परिस्थितीत काहीही फरक पडला नाही.कारण आपले वाडवडिल जर सद्गतीला पोहोचले नसतील तर आपण केलेल्या सेवेतील ते 14 आणे घेऊन जात असतात.त्याच प्रमाणे देवदिकांचा ऋणानुबंधातून सोडविताना गतजन्मी तुमचे उपास्य दैवत कोणते होते.तुमच्या वाडवाडिलांनी कोणत्या देवदेवतांची सेवा केली होती व सध्या तुम्ही कोणत्या देवतेची सेवा करीत आहात या सर्व गोष्टी मान्य करून घेण्यात आल्या.गेल्या जन्मी शंकर उपासक असाल व या जन्मी दत्त उपासक असाल तर गतजन्मातील सेवेचा लाभ या जन्मी होणार नाही.तो मिळवून देण्याचे सामर्थ्य फक्त सद्गुरुंपाशीच आहे.
देवदेवांमध्ये तीन प्रकार आहेत.सत्व,रज,तम–तुमचे उपास्य दैवत तमोगुणाचे असेल व तुम्ही सत्व गुणयुक्त असाल तर तुम्हीसुध्दा तमोगुणी व्हाल.या ठिकाणीयेण्यापूर्वी बारा-बारा वर्षे होम-हवने केली असे भक्त आहेत.एवढी जर त्यांची सेवा करता मग कामकाजाला विडा लागतो कसा?आम्ही देव नाही.पण देव,दानव व मानव यांना वेळोवेळी ठीक केलेले आहे,असे आहोत.या ज्या देवता आहेत ती एक प्रकारची शक्ती आहे.प्रसंगानुसार म्हणजे एखादा दानव फार माजला,तेव्हा त्याचा संहार करण्याकरीता देवीला पाठविले जात असे.त्या आल्या,त्याचमुळी हातात शस्त्र घेऊन.त्याना मारण्याशिवाय काही माहीतच नाही.त्यामुळे तुम्ही त्यांची 12 वर्षे सेवा केल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की हा समोर बसलेला दानव नसून आपला भक्त आहे.
या विश्वात तीन वलये आहेत.पहिल्या वलयात अशा काही योनी आहेत की त्याना भाकर-तुकडा दिला की त्या संतुष्ट होतात.दुसरे वलय देवदेवतांचे व तिसरे वलय हे सद्गुरुंचे म्हणजेच विधात्याचे.आता तुमची या तिस-या वलयाशी जोड करून दिली आहे.तरी मध्ये दुस-या कोणाचा संबंध आणू नका.आता इतरांचे जे काही देणे आहे ते देऊन झालेले आहे.तेव्हा एकदा स्वर काळी-पाचमध्ये लागला की सारी वाद्ये त्याच स्वरात लागली पाहिजेत,एखादी स्वर जरी खाली लागला तरी सा-या मैफलीचा रसभंग होईल.
सध्या तुमचा स्वतःचा कर्मविपाक चालू आहे.आज काशीपासून रामेश्वरा पर्यंत गेलात तरी कुठेही कर्मविपाकाची शास्त्रीय मीमांसा सांगून तो करवून घेतला जात नाही.त्याचे वर्णन वेदात मिळणार नाही.ज्या कोणी ऋषिमुनीनी व साधुसंतानी यात हात घातला ते नि:संतान झाले इतकी ही जबरदस्त गोष्ट आहे.तुम्ही धडाधड कर्मविपाकाचा प्रसाद भक्तांना देता पण असा प्रसाद देण्यापूर्वी – “बाबा तुमच्या कृपाशिर्वादाने हा प्रसाद देत आहे सांभाळून घ्या” -अशी बाबांची प्रार्थना करता का? अशी प्रार्थना न करण्याने,समजा त्यातील काही भाग तुमच्याकडे आला तर? वास्तविक हा प्रसाद द्यायचा म्हणजे त्रिकारण स्नान आहे.परान्न घ्यायचे नाही.कुठेही गेला तरी आपल्या वास्तूत रात्री12वाजेपर्यंत आले पाहिजे इत्यादी बंधने आहेत.पण एकंदर परिस्थितीचा विचार करून 11 शे जप सांगितला आहे.पण तोसुध्दा करण्याची टाळाटाळ करता.
मी वरून येताना कर्मांना खाली जाऊ नका असे बजावून येतो.पण तुम्ही आज्ञेनुसार जप करण्यात कुचराई केलीत की ती कर्मे धडाधड खाली कोसळायला लागतात.येणारी सर्व कर्मे आम्ही प्रसादावर बसवून ठेवलेली असतात की जेणे करून तुमचे दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे पार पडावेत.एखाद-वेळी घरात सर्वांनाच फार त्रास होऊ लागला तर प्रथम सगळीकडे गोमुत्र सिंचन करावे, यज्ञोपवित बदलावे.संदल प्रसाद उतरवावा व एवढय़ाने गुण न आल्यास प्रसाद पाण्यात विसर्जन करावा.पुन्हा दुसरा प्रसाद घ्यावा.नऊ आठवडे झाल्यानंतर मोठा यज्ञ करूनच मग त्याची सांगता करायची असते. प्राप्त परिस्थितीत ते शक्य नसल्यामुळे फक्त पाच आणे देऊन नवीन प्रसाद दिला जातो