29-1-1961 सकाळ
पुर्णावस्था — आसक्तिचा आभाव.
सर्व विचारांचा भावनारुप आशय = श्रध्दा.
ज्याच्या प्रित्यर्थ व्यक्त करू ती भक्ती.भक्ती इतरांची करायची असते. कडय़ाकीटकांपासून देवापर्यंत सर्वाना जेऊ घालते ती अन्नपुर्णा.
28-6-1961 शनिवार.
ॐ श्री साईनाथाय नमः ।। संकल्प. – – – ॐ आमित्य = अक्षरब्रम्ह (मूलभूत)
अ + उ + म् माया
उत्पत्ती,स्थिती,लय = क्रिया ज्ञान अज्ञान
नियंता – कर्म ब्रम्हदेव मानुष्य
सृष्टी – क्रियमाण वेद (व्यास) आसक्ति
उत्पत्ती,स्थिती,लय =धर्म सरस्वती अज्ञान
मानव लक्ष्मि अपेक्षा
जन्मऋमानुबंध देव साधन
काया-वाचा-मन साधना शिक्षण
पातक-प्रमाद-दैविक-इतरेजन – – पैसा
मानवी देह.
संकेत = वैयक्तिक कर्मविपाक.
मानवी देव = पूजापाठ,जप,यज्ञ,होम-हवन,मंत्र,तंत्र, इत्यादी
अपेक्षा = सुख,शांती, समाधान (संतती-संपत्ती )
देव = सुख.शांती,समाधान – प्रेम,सत्य,विकार
विचार –इच्छा-कार्य = विकार,वासना,कर्म
सरस्वती,लक्ष्मि.देव, काया-वाचा-मन.देहाची धारण मूलतत्त्वावर.
तुमच्या जीवनाबद्दल काही अपेक्षा असतात.ते जीवन घडविण्यासाठी तुम्हाला साधन हवे असते.आम्हालाही तुमच्याकडून अपेक्षा असतात.ह्या अपेक्षेप्रमाणे जीवन घडविण्यासाठी आम्ही तुमचेकडून साधना करून घेतो.
प्रथम तुम्ही तुमच्यात काय आहे हे शोधण्य़ा आधी काय नाही हे पाहतो.तेसुध्दा दुस-याच्या जीवनाकडे पाहून.
काया-वाचा-मन ही 3 एकर जमीन त्यातून पूर्ण ऋमानुबंधाने पेरलेले असेल तेच रुजणार.शेजारच्या शेतात गहू उगवले म्हणून तुमच्या शेतात गहू उगवणार नाही,तसेच तुम्ही श्रध्दा ठेवा अगर ठेवू नका.गुरुकृपेचा पाऊस पडून पेरलेले उगवणारच.
1 2 3
जन्मऋ:णानुबंध इतरेजन देवादिक
निर्वाहाचे साधन म्हणून शिक्षण घेतल्यावर पगार मिळतो तो शिक्षणावर अवलंबून असतो.कुटुंबीय, बंडू ,धोंडू, मुलेबाळे किती यावर अवलंबून नसतो. 250 रुपये पगारदार पदवीधराचा खर्च 600 रुपये असला तर इतरांना काय देणार? त्यानंतर देवादिकांना काय देणार?परंतु इत्यादी स्थितीत त्याला इतरेजनाना देण्यासारखे असते,ते म्हणजे सुख शांती,समाधान! हे चार आणे तरी दिले तरी त्यातून 1 रुपया परतफेड होऊ शकेल.
साध्या दोन मित्रांचीच भेट ध्या ना.तुम्ही भेटता,ही वासनेने.एक आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करतो तर भेटायला येणा-यामध्ये फराळाच्या प्लेटकडे लक्ष असते.भावनेने तुम्ही भेटतच नाही.त्यामुळे एकमेकांच्या अडचणी सोडविण्या साठी व त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार तुम्ही करूच शकत नाही.त्या मित्राकडे एखादी नवीन वस्तू आलेली असते.ती पाहून तुम्हाला घेण्याची वासना होते.जर त्या मित्राकडे तो वस्तू आणण्यामागे तील्र मतभेद व भांडणे झाली असतील (नवरा-बायकोमध्ये) तर ते निश्चित समजा की त्या वस्तूभोवती असे अशांततेचे वलय निर्माण झालेले असते की ती पाहून तशी वस्तू ज्याचे म्हणून घरी जाईल त्या घरात ती भांडणे निर्माण केल्यावाचून रहाणार नाही.
निष्कर्ष = बाजारात वस्तू दिसली व ती आपल्या जीवनात उपयुक्त आहे म्हणून खरेदी करा.केवळ ती दुस-याकडे आहे म्हणून ती घरात आणू नका.
आम्ही दोन प्रकारे जीवन जगतो.असली व नकली.लहानपणी लाकडी बस वडिलांनी खेळणे म्हणून आणलेली असते.पुढे ती अडगळीत पडते.एक चाक मोडलेली ,चेपलेली बस तोच मुलगा मोठा झाल्यावर त्याला कॉर्पोरेशन ऑफिसमध्ये घेऊन जाणार नाही.तशीच काहींशी देवाबद्दल आम्ही स्थिती केली आहे.आम्ही देवाचे खेळणे केले आहे.पंजोबानी शंकराला बेल वाहा असले असले असे सांगितले.त्यानी तो वाहिला म्हणू न आम्ही वाहतो,त्यात आम्ही संशोधन केले नाही.पाश्चात्य लोकांनी पंच महाभूत तत्त्वांचे पृथःकरण करून त्यातील अणूशक्ती शोधून आज ते पृथ्वी प्रदक्षिणा करू शकतात.ज्या संशोधकाने आपले जीवित पणाला लावले न मानव जातीच्य़ा सुखारता संशोधन केले तोही मानवजातीचा महान सेवक होय.आम्ही मात्र पंच महाभूतांचा देह असून आमचे ठिकाणच्या पंचमहाभूतत्त्वाचा ठाव वा ज्ञान घेऊ शकलो नाही.तुम्ही ॐ श्रीसाईनाथाय नमः ।। हा संकेत सोडून असली देवाचे देवपण म्हणजे सुख-समाधान- शांती,प्रेम किवा सत्य यातील एक तरी अंगी येऊ द्या !
[ह्या मुलाखतीत अनेक विषयांची ओळख करून दिली आहे.त्या विषयांचा खुलासा वेगवेगळय़ा मुलाखतीत येणार आहे. तथापी प्रस्तुत-जीवन कसे परंपरेच्या अज्ञानीपणाने व अंधश्रध्देने जगतो आहोत हे साध्या, सोप्या उदाहरणातून समजावून दिले आहे.]