8-2-62 गुरूवार वसंतपंचमी
आज वसंत पंचमी आहे.या दिवशी गोरखनाथांना मच्छिंद्रनाथांनी अनुग्रह दिला.आजपर्यंत कोणत्या प्रकारे साधना करीत आलात.आता तुम्ही सिध्द झालात व साध्य अवस्थेप्रत जाण्यास सुरूवात करीत आहात.आपण आपले काया,वाचा व मन व विशेषतः मन स्थिर करण्याचा प्रयत्न करतो.साधना मार्गाने जात असता प्रथमच मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करणे बरोबर नाही.तुम्ही मुला-बाळांशी खेळत असताना तुमचे मन लेकुरवाळे असते.आपल्या पत्नी बरोबर असता कामुक असते.प्रपंचात प्रापंचिक व परमार्थात पारमार्थिक असते.आता अशा या मनाला तुम्ही परमार्थात स्थिर करू लागलात तर ते बरोबर ठरेल का?व जर परमार्थात स्थिर झाले तर प्रपंच कसा करणार?मन हे कोणत्याही अवस्थेत जात असता स्वतःची अवस्था बिघडली जात नाही ना इकडे लक्ष दिले पाहिजे.मनाने सुध्दा प्रपंचात ईश्वर दिसला पाहिजे.
‘ज्या-ज्या ठिकाणीमन जाय माझे,
त्या-त्या ठिकाणीनिजरूप तुझे’
ही भावना निर्माण होणे म्हणजेच साक्षात्कार.सर्व प्रथम येथे आलात एका अपेक्षेने एक विशिष्ट प्रकाराचे सुख मिळावे ही तुमची भावना होती. अर्थात ती भावना अज्ञानी पणाची होती.नवीन असताना हे चालू शकले. पण सिध्द अवस्थेतून साध्य अवस्थेप्रत जात असता गुरूचरणी पूर्वीचीच अपेक्षा असू नये.देवाला गंध का लावयाचे तर माझ्या कपाळी जो काळा टिळा आहे तो जावा म्हणून.नवकोट-नारायण करण्यासाठी नव्हे. याच अर्थाने पंढरीचा पांडुरंग तुम्हाला म्हणत असतो की बाबा रे,माझ्या मस्तकी काळा अबीर लाव पण तुझे ललाट उजळ होऊ दे.!शेतात चांगला आंबेमोहोर तांदूळ पिकतो.पण शेत ढेकर देत नाही.तसेच तुमचे हे जीवन पातक-प्रमादानी भरलेले आहे.ते तुम्हाला कधीच सुख देऊ शकत नाही.तुम्हाला तृप्तीचा ढेकर सदगुरूकृपेनेच येऊ शकेल.सिध्द अवस्थेत जीवन सद्गुरूमय झाले व साध्य अवस्थेत सद्गुरूकृपा निरंतर लाभली पाहिजे.चहाचे भांडे अगर भाताची पातेली खाली उतरल्यानंतर त्यावर लगेच झाकण ठेवतो.कारण त्यातील वाफ निघून गेली तर चहा चांगला होणार नाही व भाताचा गोळा होऊन मोकळा होणार नाही.
आज तुम्ही आपल्या जीवनात बध्द आहात.याच्यापुढे मुमूक्ष म्हणजे मोकळे झाले पाहिजेत.चहाची अंश रुप वाफ बाहेर जाऊ देत नाही त्याच प्रमाणे तुमची वाफ न जाण्यासाठी तुमच्या जीवनावर 9 दिवसाची ताटली टाकली आहे.सिध्द अवस्थेतून साध्य अवस्थेप्रत जात असलेला सेवक हे असे करा ते तसे करा.पातक-प्रमाद,पापपुण्य इत्यादी प्रत्येक विषयावर बोलू लागतो.याच वेळी त्याच्यावर जर बंधन नसेल तर सगळे वाया जाईल.वाफ निघून जाईल.सत्व निघून जाईल.यापुढे सेवक अंतर्मुख झाला पाहिजे.ज्यापमाणे सर्वबाजूनी भिंती असतील तरच समोरचे पडद्यावरचे चित्र दिसते,त्याच प्रमाणे साधकारणा स्वतःचे रुप व त्याचा ईश्वर बघायचा असल्यास त्याला त्याच्या बाजूने भिंत घातलीच पाहिजे. आजपर्यंत झाली एवढी open air साधना पुरे झाली.गुरू आज्ञेने सांगितलेलीच साधना करा.या शिवाय आणखी काहीतरी वेगळे व आपली प्रगती लवकर व्हावे म्हणून भलतेच काही करू नका.यामुळे तुमची प्रगती होणार नाही.वैकुंठाला जाण्याची वेळ आली तर धोंडूसहीत सगळय़ाना मी नेईन. आपली ही जी बस आहे त्यातले आपण उतरु आहोत.सगळेजणच जर बस चालवायला लागले तर ती मध्येच कुठेतरी कोलमडेल. त्याचप्रमाणे आपणाला बस कंडक्टर नाही तर इलेक्ट्रिकल शास्त्रातला कंडक्टर म्हणजे one who conducts the electricity व्हायचे आहे.
तुमची जेवढी स्तोत्रे पाठ तेवढीच तुमच्याकड़े देवाची पाठ.गुरूआज्ञा होईल एवढीच साधना करावी.तुमचा संकल्प, निष्ठाचरण जितके यथायोग्य तेवढय़ा प्रमाणात साधनेचा लाभ होईल.आजपर्यंत आशिर्वाद अमुक एक कामासाठी वापरलात.यापुढे त्या कामाच्या आड येणारे व जे वज्रासारखे कठिण झाले आहे अशा कर्माचें खंडण, मुंडण व विमोचन करा असा बाबांजवळ आशिर्वाद मागा. आजपर्यंत तुम्ही स्वतःचा व तुमच्या मुलाबाळांचा विचार केला नाही.एवढय़ा लहान वयात काय करायचा देव! पण एखाद्या कुटुंबाचा उध्दार होण्याला एका माणसाने सेवा करुन5वर्षे लागणार असतील तर सर्व कुटुंब सेवेला लागल्यास त्या कुटुंबाचा उध्दार एक वर्षात होईल व प्रत्यक्ष सद्गुरूंने विमोचन केले तर त्याच कुटुंबाचा उध्दार 9 महिन्यात देखील होईल.पण हे केव्हा?तर जसा कुटुंबातील प्रत्येक जण चहाच्या कपाचा व डब्यांतल्या लाडवांचा अधिकारी तसाच तो जर सद्गुरू सेवेचाही अधिकी असेल तरच हे शक्य आहे.तुम्ही विचार करा,11 माळा कर्म विमोचनार्थ सांगितल्या तर त्यासुध्दा तुमच्या हातून होत नाही.मग तुमच्या एकटय़ाच्या सेवेच्या आधारावर सबंध कुटुंब उध्दरून न्याल का ?एकटा मनुष्य किती पुरा पडणार?घरातील प्रत्येकाने सेवा ही केलीच पाहिजे.पण हे घडत नाही.कारण तुमच्या मुलाबाळांवर तुमचा अधिकार नाही,पैसा आहे.त्यांना खायला घालता.खायला घालणे हे सहज घडत आहे.पुनः मिळवाल व त्यांना खायला घालाल.पण त्याच मुलांनी तुमचा ऋणानुबंध खाल्ला तर तो तुम्हाला देवादिकाकड़ून देखील मिळणार नाही.
दुख काही तुम्हाला एकटय़ाला नाही तर सगळया कुटुंबाला आहे.मग सगळयांनीच सेवेला लागले पाहिजे.वर्षाचा हिशेब काढला तर1महिना गादीवर व 11 महिने घरी असता.सत्कर्माचा भाग एकच महिना आहे.म्हणून तेवढा काळ गादीवर येता व दुष्कर्माचा काळ 11 महिने आहे म्हणून तो घरी व्यतीत केला जातो.पण 11 महिने इथे व 1 महिना घरी असाल तरच कर्मभोग सुटेल.आपण लवकर पोहोचावे म्हणून कल्याणचीच पण फास्ट लोकल पकडतो ना!तसेच हे प्रमाण आहे.पण तुमची गाडी stopping at all and in between the stations अशी आहे.मी तुमच्या कर्माचा निकारण लावतो व तुम्ही माझ्यासमोर बसून तुमच्या प्रश्नाचा निकारण विचारता! तुम्हाला वाटते मी बोलतो.हें बोलणे नसते तर तुम्हाला झाडत असतो.तेसुध्दा नशिबी लागते.यालासुध्दा कर्मविमोचन म्हणतात.एका भक्ताला विचारले की तुझी गाडी ठरली का? त्याने उत्तर दिले की,माझी गाडी Express आहे.बाबा म्हणाले अगदी बरोबर बोललास.कारण (X- Press) तुझ्यावर फुली मारून सारखे प्रेस केले पाहिजे म्हणजेच तुझ्यात सुधारणा होईल.या पारायणात शुचिर्भूतता पाहिजे.
सगळय़ानी वाचून झाल्यावर एकदम उठा.एखादा गुरूबंधू वाचताना रेंगाळला तर सारखे त्याच्याकडे का बघता?प्रत्येक पारायणात मी मुद्दामच एकारणा मागे ठेवत असतो.तुम्ही सहन करू शकता हे मला पहायचे असते.तुमची विचार सरणी अशी असते की,तो सावकाश वाचतो तरी त्याला मागे बसवा. त्याला चार अध्याय द्या.एखादा गुरूबंधू 10 मिनिटे मागे राहिला तर ते तुम्हाला सहन होत नाही.मग इतकी वर्षे मी तुम्हाला शिकवतो आहे.तयार करतो आहे,पण माझ्या अपेक्षपलिकडेही तुम्ही रेंगाळत आहात.मी हे कसे सहन करतो.वास्तविक,त्याच्या वाचनाचे मनन करायला शिकले पाहिजे. तुझ्या वाचनामुळे मला पंधरा मिनिटे अधिक सेवेचा लाभ झाला हा विचार का येत नाही?
अत्मिक तत्वाची ओळख व्हायला पाहिजे.मी म्हणजे ससाणा आहे.अंतराळांत असतो.पण एखादे दुष्कृत्य तुमच्या हातून घडल्यावर तीरासारखा येऊन तुमची मान पकडल्या शिवाय रहाणार नाही.साध्यता असतानासुध्दा पूर्वीचीच कामना असेल तर काहीही उपयोग नाही.आज तुम्ही ‘मृत’संजीवनी त्रिभूवनात फिरवली पण ज्यांच्याजवळ प्रत्यक्ष संजीवनी आहे अशा विभूतीसमोर बसून तुम्ही मृतसंजीवनी मागता केवढे अज्ञान आहे! समोर बसून मागणे काय तर 25 रू.वाढू द्या.गाय शेणासाठी नाही पाळायची तर दुधासाठी,दूध मिळाले की शेण आपोआप मिळतेच. 7 ते 9 ही वेळ निश्चित झाली का?या दोन तासात मी कोणाचाही नाही,ही भावना निश्चित झाली का? या प्रश्नावर एका भक्ताने होकार्थ उत्तर दिले.यावर बाबा लगेच म्हणाले की,आजपर्यंत हेच म्हणालास की मी कोणाचाही नाही.तर या ऐवजी मी दोन तासात देवाचा आहे असे म्हण. हे दोन तास तुम्ही एकदा निश्चित केलेत की जीवनातील कितीतरी गोष्टी निश्चित होतील.या नऊ दिवसाच्या पारायणात मांसाहार नको,व्रतस्थ रहा.
व्रतस्थ याचा अर्थ फक्त काम वासनेपुरता लावू नका.तर आचार,विचार व आहार या मध्ये देखील संयम ठेवा तरच पारायणाचा लाभ मिळेल. व्रत असेल तरच पारायणाचा लाभ मिळेल.व्रत असेल तरच ‘स्थ’होऊ शकारण.नाहीतर नुसताच‘स्थ’म्हणजे देवाच्या नावे सोडलेला पोळ.पारायण झाल्यावर रात्री आहार हलका घ्यावा.टवटवीत गुलाबाचे फूल पाहून मन प्रसन्न होते.पण त्या फुलाला आपला सुगंध लोकाना देण्यासाठी दिलेला असतो.त्याला कधी अत्तराचा वापर करावा लागत नाही.कारण सुगंधाने वातावरण दरवळून टाकणे हा त्याचा धर्मच आहे.आम्हाला मात्र अत्तराचा फाया लागतो.कारण आमच्याजवळ आचारा-विचारांची दुर्गंधी फार.तुमच्यासारखे आम्हीसुध्दा कानांत बोळे घालतो. फरक एवढाच की,तुम्ही बोळा कानांत वरच्या बाजूला घालता व आम्ही खाली घालतो.बोळा खाली घातल्यामुळे कान बंद होतात व आपणच मूर्खा सारखे बोलतो ते ऐकायला येत नाही.
आपले वेडेवाकडे बोलणे आपणच ऐकायचे नाही.म्हणजेच दुसऱयाला बोलायचे नाही हे लक्षात आले असेलच.ही पारायणे घरी करून चालणार नाहीत.ज्याप्रमाणे पगार ऑफीसमध्ये काम करून मिळतो.पोथीसुध्दा घरी नेऊन ठेवू नका. कितीही केलेत तरी इथल्या इतकी शुध्दता घरी राखता यायची नाही.तुम्ही तुमच्या साहेबाचे अगदी Personal Assistant आहात तरी ऑफीसची confidential File घरी नेऊ देत नाही.कोर्टात लागणारे कागदपत्र कोर्टातच ठेवले जातात.वकील घरी जाताना फक्त कायदा त्याच्या डोक्यात असतो.त्याचपमाणे पोथी या इथेच ठेवायची,पण तुम्हाला तुमच्या मनात बाबांचे सदैव चिंतन व धारणा पाहिजे.