20-2-1962 प.पू.जिलानी बाबा मुलाखत — 2
ब्रम्हा-विष्णु-महेश : उत्पत्ती-स्थिती-लय.
साईबाबांचा फोटो लावून भक्तांना मार्गदर्शन केले जात असेल पण हे गुरुपीठ काही आगळेच आहे.या ठिकारणची जाज्वलता इतरत्र असेलच असे म्हणवत नाही.आज तुमच्याकडून साधना करवून घेतली जात आहे. बाहेर कुठे गेलात तर नाकात दोन बोटे घाला व इतर अभ्यास घरी करा असे सांगतील.विद्या देण्याची तर गोष्टच सोडा “यहां तो हम देने के लिये बैठे है”। फक्त तुम्ही घेण्याची तयारी ठेवा.तुम्ही नवनाथांच्या पोथीत वाचता की शिष्याला तपाला बसवून गुरु बारा वर्षे तीर्थ यात्रा करीत होते पण जिथे शिष्य होता तेथे त्यानी सर्व विद्या ठेवल्या होत्या म्हणूनच जरी गुरु तीर्थ यात्रेला गेले होते तरी शिष्य सर्व विद्येत पारंगत झाले.जालंदर डोक्यावर अधांतरी मोळी घेऊन जात असत.ती डोक्यावरील मोळी म्हणजे विद्या होती.मग प्रश्न पडतो की विद्या अधांतरी का ठेवली? याचे कारण ज्या वेळी गरज पडेल त्यावेळी ती विद्या घेऊन काम करायचे व काम झाले की आपल्यापासून दूर ठेवायच्या कारण केव्हा आपल्या हातून दुष्कर्म घडेल याचा नेम नाही.अशा त-हेने विद्या विटाळता (भ्रष्ट) कामा नये.एवढी दक्षता प्रत्यक्ष नवनाथ घेत असत.मग आपण किती दक्षतेने राहीले पाहिजे याचा विचार करा.वरच्या अंतराळात अशा शेकडो वर्षे अनेक विद्या आहेत.त्या तुम्हला पण साध्य होतील.पण त्याला लागणारी सुचिर्भूतता व सामर्थ्य तुम्ही अंगे बाणविले पाहिजे.
आज येथील कार्य पाहून व भावनावश होऊन आपणही दादांसारखे सर्वस्व या कार्याला वहावे हा विचार कदापिही मनात आणू नका.आमच्या मागे लागणे ही गोष्ट साधी नाही. दत्त महाराजांचा प्रसाद मिळणे फार कठीण. ब्रम्हा,विष्णु,महेश–ही तीन तत्त्वे आहेत.साधकाने गाणगापूर अगर वाडीला त्यांच्या आशिर्वादा करीता साधना करायला सुरुवात केली व योग्य प्रकारे काही वर्षे साधना चालू राहीली तर प्रथम ब्रम्हा आपली माया अल्पांशाने देतो.यामुळे साधकारणा दृष्टी प्राप्त होते.तुमच्या जीवनातील अनेक गोष्टी तो बिनचुकपणे सांगू शकतो.सहाजिकच गर्दी जमवून सर्व लोक साधकारणा “महाराज” म्हणून जयजयकार करतात.बहुतेकांचा या ठिकाणीतोल जातो.यातून जो सावरला त्याला विष्णुची माया मिळते.धनलाभ चांगला होतो.अशी परिस्थिती काही वर्षे चालल्यानंतर शेवटी शंकरजी येऊन असेल-नसेल ते साफ धुवून नेतात.फक्त लंगोटी ठेवतात.यानंतर देखील अविचलपणे साधना चालू राहीली तर हे महाराज डोळा उघडून बघतात. आमचा जन्म वेगळा तुमचा जन्म वेगळा.तुम्हाला या गोष्टी झेपणार नाहीत.आठशे वर्षे झाली तो सत्पुरुष पहाडावर बसला आहे.पण आजपर्यंत एकच भक्त भेटला व तो म्हणजे तुमचा गुरु-दादा-.
आमच्या मागे लागल्यास आम्ही आमचे ऋण कुठेपर्यंत फेडन घेतो याची तुम्हाला कल्पना आहे का? एकदा दादाला आज्ञा केली की शिरडीला चल.दादा म्हणाला पैसे नाहीत.आम्ही सांगितले की बायकोच्या गळय़ात मंगळसुत्र आहे ते विकून पैसे आण.त्याप्रमाणे दादा शिरडीला आला.एवढी तुमची तयारी आहे का? तुमच्या दादाने त्या वेळी तीन-चार वर्षे या परिस्थित काढली.त्या परिस्थितीत तुम्ही चार मिनिटेही टिकणार नाहीत. काहीजण प्रार्थना करतात.बाबा दृष्टांत द्या,साक्षात्कार द्या पण रात्री झोपेत देवाच्या दर्शनाची इच्छा का घरता? ज्या गादीवर तुम्हाला देव दृष्टांत देणार त्यावर अनेक कर्मे घडलेली असतात.म्हणून शुध्द नसते.उठा स्नान करून देवाची प्रार्थना करा.- मी समोर बसलो आहे तेव्हा दर्शन दे.समजा खरोखरच बाबा आले व म्हणाले चल सगळयानी वैकुंठाला,तर किती जण येतील हा प्रश्नच आहे! कोणी म्हणेल माझी बायको आजारी आहे.कोणी म्हणेल मुलाचे लग्न व्हायचे आहे.या व अशा अनेक सबबी सांगाल.हे मला माहीत आहे.कोर्टात दहा पंधरा वकिल असतानासुध्दा एखादा अशील मुद्याम तुमच्याकडे येतो.हा साक्षात्कार नव्हे का? तुम्ही प्रापंचिक माणसे तेव्हा सुखाने संसार करा.बाबांची प्रार्थना करा की – बाबा, तुम्ही आहात तेथेच रहा. तेथूनच आम्हाला आशिर्वाद द्या.
तुम्ही जीवनाची वाटचाल चालत असतां आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत.आमच्या प्रकाशात तुम्हाला पुढील रस्ता चांगला दिसेल.कुणा गरीबाला एकवेळ चार पैसे दिले नाहीत तर चालेल.पण विनाकारण कुणाला फुकटचा उपदेश करू नका.काशी एक्सप्रेस गाडीत बसून समोर आलेल्या भिका-याला पैसा तर द्यायचा नाहीच आणि वर उपदेश करायचा-चांगला तगडा दिसतोस,काम कर,भिक काय मागतोस–हेच वाक्य मी तुम्हाला ऐकवलं तर चालेल का? तुम्ही स्वतःला मोठय़ा कुलशीलाचे समजत असाल,मोठे बंगलेवाले असाल पण या दरवाज्यातून आत येऊन विडा लावला व बाबांकडे सारखे हे द्या,ते द्या असे काहीही सेवा न करता मागत असता मग तुमच्यात व त्या भिका-यात फरक तो काय? याचा विचार करा.
आपण विचार कोणत्या पध्दतीने करतो याचा नीट अभ्यास करा.फाजील व अनावश्यक विचारांन्वये फार प्रमाणात शक्ती खर्च होते.आमच्या घरावरून बस वळत असता ही बस कलंडली तर किती माणसांना लागेल अशा फालतू विचारांना थारा देऊ नका.एखादी मोटार अगर बस जोरात चालत असेल तर आपण-अरेरे ही गाडी आदळणार असा उच्चार करतो.पण अशावेळी बाबांची प्रार्थना करावी की ड्रायव्हरला चांगली बुध्दी द्या.यामुळे ती गाडी नीट चालू लागली आहे असे तुम्हाला दिसेल.
आपले काहीशी पटते व काहींशी पटत नाही अगर भांडण असते.ज्याच्याशी पटत नाही त्यांच्याबद्दल सदासर्वदा विचार करून त्याना वाईट म्हणू नका.तुमच्याकडे बाबांचे अधिष्ठान आहे,नित्य साधना चालू आहे.त्यामुळे शब्दामागे शक्ती आहे.तेव्हा अशा शक्तीनीशी उच्चारलेल्या शब्दाने तो आणखीनच वाईट होईल.पूर्वी शेजारी डोक्यात काठी घलणार असेल तर वारंवार वाईट वाईट म्हणून तो तुमचा जीव घेण्यापर्यंत वाईट होतो.अशाच प्रकारे माणसाच्या हाडीमाशी वाईट गुण खेळतात हे लक्षात ठेवा.बाबांचा आशिर्वाद बाणासारखा आहे.कुणावर सोडायचा ते तुम्ही ठरवा.नदीला ज्या प्रमाणे धरण घालतात त्याप्रमाणे आपल्या जीवनात बाबांच्या कृपेचे धरण घाला.प्रत्येक विषय हा बायकोजवळ बोललाच पाहिजे असे नाही.यामुळे उलट तुमच्या डोक्याला जास्त त्रास होण्याचा संभव असतो.प्रत्येक विचार शेवटी बाबांच्यात विलीन झाला पाहिजे.अशी सवय लावून घेतलीत तरच जीवन सुखी होईल.आज बहुतेक घरात वडिलघारी मंडळीबाबात वाट्टेल ती टीका करीत असतात.पण विचार करा की नेहरू उभे राहीले तर लाख लोक जमतात व तुम्ही बोलायला उभे राहीलात तर गल्लीतील एक कुत्रासुध्दा येत नाही.आपला टीका करण्याएवढा अधिकार आहे का? अशा सततच्या बोलण्याने आपल्या नेत्याविषयी घरातील मुलांच्या मनावर काय परिणाम होतात याचा कधी विचार केलात का?
आज रशियात क्रुश्चेव काहीही करीत आहेत पण तेथील आम-जनतेची अशी धारणा आहे की क्रुश्चेव त्यांचे भलेच करणार आहेत यामुळे तो काही वाईट करायला निघाला तरी त्याच्या हातून चांगलेच घडते कारण त्याच्या वाईट विचाराला हा चांगलेच करणारा आहे हा लाखो लोकांचा विचार धडक मारतो.पण आपल्याकडे या उलट परिस्थिती आहे.नेहरू चांगले करायला जातात पण तुम्हा सर्वांच्या अशा विचारांमुळे ते वाईट करून बसतात.तुम्ही या ठिकाणी बसला आहात.त्या भोवती ग्रामदेवतेचे, त्यानंतर महाराष्ट्र सरकारचे अशी वलये असतात.या वेगवेगळ्या शक्ती आहेत.मी तुम्हाला आशिर्वाद देईन पण शेवटी नोटा काढणारे दिल्ली सरकार आहे.हे लक्षात असू द्या.डांगे जन्माला आले व नेहरू जन्माला आले ते एक प्रकारची शक्तीच घेऊन जन्माला आले आज महाराष्ट्राचे मुख्य मंत्री काही वर्षापूर्वी फार प्रसिध्द नव्हते पण एकदा मुख्य मंत्रीपदावर आरूढ झाल्यावर त्यांच्या मागे एक तेजोवलय,एक शक्ती उभी राहीली.लग्नाला उभी रहाण्या पूर्वीची मुलगी व कुणाच्या नावे गळ्यात मंगळसूत्र व हातात चुडा भरलेली मुलगी व त्यामुळे तिच्या चेह-यावर येणारे तेज हे वेगळेच असते.अशाच प्रकारची शक्ती घेऊन लोक दिल्लीच्या सिंहासनावर बसतात.यथायोग्य त-हेने वागून त्या शक्तीचा नीट उपयोग केला तर ठीक चालते.नाहीतर कारणांतराने ती शक्ती त्याना उलथून टाकते.हे चक्र असेच चालायचे आहे.
राजाला पूर्वी फार मान होता.पण दुर्वर्तनामुळे त्यानी तो घालविला.आज जगात राजा हा एकच आहे व तो म्हणजे इंग्लडचा. त्या देशातील लोकांच्या मनात त्यांच्य़ा राजाविषयी असीम श्रध्दा व आदर आहे.काही शतकांपूर्वी आपल्याकडे देखील एकाहून एक पराक्रमी होऊन गेले.राजाचा मान एवढा आहे की ज्या वास्तूत राजा रहात असे तेथील थोडी माती प्रत्येकजण स्वतःची वास्तू बांधताना घेऊन जात असे.पूर्वी इंग्रजांचे राज्य होते त्यावेळी येथील पैसा त्यांच्या पार्लमेंटमध्ये जात असे पण स्वराज्यानंतर बारा वर्षानी इंग्लडची राणी आली.आपण वेडे लोक तिला काय वाटेल ते देऊन बसलो.अक्षरशः कोट्यावधी रुपयांची मालमत्ता बंकिमहॅम पॅलेसमध्ये गेली.या ठिकाणीअनेक दिवस आल्यानंतर व मुलाखती ऐक्यानंतर तुम्ही या मार्गातील इतरांनी लिहीलेली पुस्तके वाचता व त्याना आलेले अनुभव व या ठिकाणीमिळणा-या ज्ञानामृत या दोन्हीची तुलना करण्याचा मोह तुम्हाला होतो.या ठिकाणीमार्गदर्शन तुम्हाला विभूतीकडून होत असते.त्या विभूती विश्वाच्या बाहेरून म्हणजे वरून येत असतात.
माणसाच्या बुध्दीमत्तेची परम सीमा असते.उदा.सर्व जगात ब्ध्दींत सर्वपल्ली राधाकृष्णन् धरले तर त्याच्या बुध्दीची सीमा जेथे संपते तेथे विभूतींचे कार्य–मुलाखत-चालू होते.म्हणून मुलाखत ऐकताना तन्मय होता.पण नंतर अल्पांशाने आठवते. याशिवाय आमची मुलाखत कायेला नसून तुमच्या आत्म्याला उद्देशून असते हे लक्षात ठेवा.इतरांचे ग्रंथ वाचन करू नका हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की त्यानी लिहीलेले अनुभव वाचन होत असताना त्यानी न लिहीलेले पण त्यांच्य़ा डोक्यात असणारे वेडे-वाकडे विचार त्यांचे अप्रत्यक्ष रितीने होणार परिणाम तुमच्यावर होत असतो.याच अर्थाने स्वतःची साधन-पत्रिका दुस-याची साधन-पत्रिका बघून तयार करू नये असे तुम्हास सांगण्यात आले.नोटिस बोर्डावरील एवढासा मजकूर लिहून घेत असताना तुमचे पाय दुखतात.मग उद्या भारताच्या सीमा-रेषेवर पहारा करण्याची वेळ आली तर काय कराल?ग्रंथकर्ताला एक रुपयाचा अनुभव आला असेल पण वाचकारणा तो ग्रंथ वाचून जास्तीत जास्त दोन आण्याचा अनुभव येईल.ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.या ठिकाणीयेऊन वर्षानुवर्ष फक्त आरतीच करायची नाही.आपणापुढे फार मोठे कार्य आहे.सर्वांना एकत्र आणण्याचे साधन म्हणजे आरती.हे लक्षात ठेवा.आपल्या केंद्रावर कोणत्या बसेस येतात हे देखील तुम्हाला माहीत नाही.आज तुमच्या जगात आज जागतिक शांतता कशी होईल याची चर्चा चालू आहे.
आमच्या वरच्या जगात अनावश्यक संतती फार निर्माण होत आहेत.याबद्दल विचार चालू आहे.दिवसा स्त्रि-पुरुष संबंधाने अनावश्यक संतती होत असते.त्याचप्रमाणे संबंधाचे वेळी दोहोपैकी एक जरी नाखुष असेल व जबरदस्तीने संबंध आला तर अशी संतती होते.अशा ह्या मुलाला नशीब असे नसतेच कारण ते अकारण या जगात आलेले असते.अशी मुले जन्मभर तगमग करीत असतात.त्याना मार्गाला लावण्याचे सामर्थ्य फक्त गुरुंपाशीच असते.पुरुषाचे शरीर सूर्य तत्त्वाने व स्त्रिचे शरीर चंद्र तत्त्वाने युक्त आहे.रई व रश्मी (सूर्य-चंद्र) हे दोघे ज्यावेळी समोरासमोर येतात (म्हणजे रात्री बारा ते तीन पर्यंतचा काळ)यावेळी गर्भधारणा झाल्यास फार चांगली संतती जन्माला येते,संसारातील सार शिकण्यासाठी इकडे या पण संसाराच्या मागे लागलात तर तुम्हाला तो लोळविल्याशिवाय रहाणार नाही. देवाब्राम्हणा समक्ष जिचा हात तुम्ही धरलात,तिला स्मशनात पोहोचवून आलात तरी संध्याकाळची फोडणी चुकत नाही.असा आहे संसार.अशी आहे संसारातील माया!एकाच्या घरी बालकाच्या आगनामुळे आनंदी-आनंद,त्याच वेळी दुसरीकडे घरातील आधार गेल्यामुळे सर्वजण शोकमग्न असतात.जन्म-मृत्यु हे असेच चालावयाचे. खरा प्रश्न आहे की आपण स्वतःला यात किती अडकवून घ्यायचे. संध्याकाळी सात वाजले की बायका पोरे राहोत, ‘मी देखील माझा नाही’ हा विचार दृढ होईल त्याच दिवशी इकडे पाय वळतील व सेवा घडेल.एरवी तुमच्या हातून सेवा घडणे कठीण आहे.
या ठिकाणी तुमच्याकडून साधना करवून घेतली जात आहे.अन्यत्र,अशी साधना कोणीही करवून घेत नाही.ज्यास्तीत जास्त सांगतील नाक दाबा, प्राणायाम करा व बाकी घरी करा पण सेवा माझ्या समोर नको ! कारण समोर बसवून साधना करवून घेणे म्हणजे शिष्याचे पाप पदरात घेण्याची जबाबदारी येते.या ठिकाणीहे दोन सत्पुरुष तुमचे वाटेल ते पाप आपल्या झोळीस घेण्यास बसलेले आहेत.साधनेला बसण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे.स्नानानंतर लघवीला गेलात तर साधनेला बसण्यापूर्वी दहा वेळेला गायत्री मंत्र म्हणावा.साधना करताना सहजासन घालावे. बोटे व पाठीचा कणा ताठ ठेवून ॐ कार करावा.हाताची बोटे ताठ ठेवल्याने हृदयावर चांगला परिणाम होतो.आपले पूर्वज न विसरता प्राणायाम, कुंभक,रेचक, पूरक इत्य़ादी करीत असत.याचे कारण जे अतृप्त आत्मे वायुरुपाने आपल्या शरीरात प्रवेश करून त्यांची इच्छा पूर्ण करून घेत असतात त्या आत्म्यांना वरील क्रियानी आपले पूर्वज साधना करण्याआधी बाहेर काढू शकत असत.या ठिकाणी ‘ॐ श्री साईनाथाय नमः’ हा गुरुमंत्र म्हणत असताना श्वास उत्वासावाटे नेमकी हीच क्रिया घडत असते.या शिवाय गुरुमंत्राचा लाभ होतो तो वेगळाच.एकटय़ाने साधना घरी करणे व सामुदायीक रित्या साधना केंद्रावर करणे यातील फरक लक्षात घ्या.
पारायणाची वेळ एकदा निश्चित केली गेली व त्याप्रमाणे सूचना पत्रक लागले की त्या ठरलेल्या वेळी पारायण चालू झाले पाहिजे.आम्ही जगाच्या कुठल्याही भागावर असलो तरी त्यावेळी तुम्हाला आशिर्वाद देण्यासाठी आलेलो असतो याची खात्री बाळगा.पण आम्ही निघून गेल्यानंतर तुमचे पारायण चालू होते मग ते फारच रेंगाळते.पारायण ओवीबध्द वाचावे.प्रत्येक ओवी संपल्या नंतर एक आकडा असतो त्यावेळी क्षणभर थांबावे. एका दमात दोन/तीन ओव्या वाचू नये.आपले वाचून झाल्यावर सद गुरुनामस्मरण करीत बसावे.शेजारील साधकाचे वाचन का संपले नाही म्हणून वारंवार त्याच्याकडे बघण्याने त्याची एकाग्रता मोडत.असे कोणीही कदापिही करू नये.हाजी बाबांनी वर सांगून ठेवलेले आहे की ही मंडळी सात ते नऊ साधना करतील.सद्रगुरुंपुढे बसून दोन तास साधना करता म्हणजे तुमचा दिवस बावीस तासांचा होतो.तुमच्या घरात सोन्याच्या दागिन्यांपासून तिखठा-मिठापर्यंत सर्व असते तरीपण उद्याचे कोण सांगणार?हा उच्चार तुम्ही करता याचे कारण उद्याचे येणारे कर्म कोणत्या स्वरुपाचे आहे हे तुम्हाला माहीत नसते.चोविस तास पूर्ण झाले की कर्म पाठवण्याची आज्ञा चित्रगुप्ताला आहे.
तुमचा दिवस बावीस तासांचाच असल्यामुळे तुमच्या कडे येणारे कर्म बाविस भागांना विभागून येते.या सर्व गोष्टी गुरु करीत असतात.कर्म-परंपरा कुणालाच सुटली नाही.प्रत्यक्ष बाबांनी 25वर्षे उन्हातान्हाची पर्वा न करता आपला देह झिजवला व मग आजचे स्वरुप शिरडीला प्राप्त झाले.मग तुमच्या मागची कर्मपरंपरा कशी सुटेल? या विश्वाच्या भोवती एक महान शक्ती आहे.त्यातील एक बिंदू या नात्याने बाबांची शक्ती आहे.त्या बिंदूपासून तुम्हाला शक्ती मिळत आहे.ज्याप्रमाणे टाटा पॉवर हाऊसमधून डायरेक्ट वीज तुमच्या घरात येत नाही कारण त्या वीजेचा दाब मोठय़ाप्रमाणावर असल्यामुळे तुम्हाला झेपणार नाही म्हणून तुमच्या घराजवळील खांबावरून म्हणजे सब-सेक्शनमधून वीज मिळविणे आपल्या हिताचे आहे.त्याचप्रमाणे या विश्वाचा आदिशक्ती-हिरण्यगर्भ-तुम्हाला पेलणार नाही.म्हणून या विश्वातील एक सब सेक्शन म्हणजे बाबा यांचेकडून तुम्हाला शक्ती-आशिर्वाद–प्राप्त होतो.बाबांनी लोक कल्याणार्थ25वर्षे तपःश्चर्या केली व आपल्या नावाच्या ठिकाणीएक शक्ती प्राप्त करून घेतली.नंतर ती शक्ती या विश्वात सोडून दिली.विधात्याला सांगितले की ज्या ठिकाणी “ॐ श्रीसाईनाथाय नमः” असा उच्चार निरपेक्ष भावनेने होईल तेथे माझी शक्ती जाईल.अशा त-हेने बाबा नामानिराळे राहीले.
“जया मनी जैसा भाव,तया तैसा अनुभव”.
ही तर या गुरुपीठाची परंपरा आहे.आमच्या या पंथात आहारावर फार निर्बंध.म्हणून आमच्या मागे लोक न लागता इतर लुंग्या-सुंग्यांच्या मागे लागतात.प्रत्येक नाथानी 12/12 वर्षे वायु भक्षण केले.तुम्हाला12तास काही खाऊ नका म्हटले तर जमत नाही.या मार्गातील इतर सिध्द-साधक मंडळींकडे तुम्ही पहाल तर त्यांच्या कडे खाण्यापिण्याची,कपडा-लत्ता व इतर वस्तूंची रेलचेल असते.तेथील मंडळी गोड-धोडावर ताव मारीत आपल्या सद्गुरुंचे वर्णन करीत असतात.पण आपल्या ह्या गुरुपीठाचा प्रकार अगदी वेगळा आहे.हे ख-या अर्थानी गुरुपीठ आहे.इतर पीठे ही भाकरीची पीठे आहेत.कारण तिथे ज्ञान संपादून शेवटी भाकरी मिळविण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.
एखाद्या निर्जन ठिकाणीएखादा साधक जातो व थोडय़ा कारणावधीत त्या ठिकाणी मठ,धर्मशाळा उभ्या होतात.हजारो लोकांची रीध लागते. भक्त नोटा उधळीत असतात.खाण्या-पिण्याची अगदी रेलचेल असते.याचे कारण त्या साधकाने सिध्दी प्राप्त करून घेतलेली असते.पण आपणाला जीवनाचे साध्य निर्माण करावयाचे आहे.त्याने साधना करून एक प्रकारची शक्ती निर्माण केली व त्या शक्तीचा म्हणजेच ईश्वरी-तत्त्वाचा उपयोग व्यावहारीक जीवनात केला.अशा शक्तीने म्हणजेच सिध्दीने या जगात जेथे जंगल होते तेथे यात्रेचे स्वरुप निर्माण करू शकाल.पण हा साधक ईश्वराच्या दरबारात फार मोठा गुन्हेगार समजला जातो. याने इच्छा प्रगट केली की या ठिकाणीदोन धर्मशाळा उभ्या कराव्यात की लगेच वातावरणात तशा लहरी उत्पन्न होतात व त्याचा परिणाम येणा-या भक्तावर होतो.मग असा भक्त दहाची नोट ठेवल्याशिवाय पुढे जात नाही.या ठिकाणी शंभर लोकांचे भोजन व्हावे ही इच्छा चांगली आहे.पण येणा-यापैकी एकाने तुपाचा एक,एकाने तेलाचा व इतरांनी सर्व शिधा-सामुग्री आणून मग ते जेवण व्हावे ही इच्छा नसून वासना होय.अशा त-हेने उभे राहीलेले कार्य हे अल्पकाळ टिकते.अशा ठिकाणीजाणा-या भक्तभाविकांना चोरीमारी करण्याचा मोह होतो.कारण कार्याचा पाया शुध्द नाही.ते कार्य म्हणजे समईतील तेल.
आपले कार्य म्हणजे इलेक्ट्रिक बल्ब. समईतील तेल संपले की अंधार होतो पण बल्ब म्हणजे वीज आहे.पाहिजे तेव्हा दिवा लावावा.पाहिजे तेव्हा बंद करावा.आपल्या मार्गात सिध्दीला वाव नाही.तरीसुध्दा बाहेर काय प्रकार चालतात याची आपणास कल्पना यावी म्हणून,आपणास ज्ञान व्हावे म्हणून आम्हीसुध्दा एकदोन वेळा सिध्दीचा अवलंब केला होता.तुम्हाला आठवच असेल की चार वर्षापूर्वी राम-नवमी,दसरा अशा उत्सवाच्या वेळी तुम्ही अर्धा-अर्धा पगार या ठिकाणीदिला आहे कारण त्यावेळी आम्ही इच्छाच अशी प्रगट केली होती.त्यावेळी गुरुवारी कित्येक भक्त पेढे आणीत असत.पण आज कुणाच्या घरी बारसे झाले असेल तरच तो पेढे आणतो.पण अशा गोष्टी एकदाच केल्या व पुन्हा त्या वाटेला गेलो नाही.साधकाने सिध्दी प्राप्त केली व त्याचा उपयोग करू लागला की सगळे लोक त्याला महाराज बनवून टाकतात.मग कोणी ग•यात हार घालतील तर केणी पायाचे तीर्थ घेईल.अशा त-हेने मोहपाशात अडकून तो साधक साधना सोडून देतो.जेणे करून जीवनाचे साध्य निर्माण होईपर्यंत तो टिकतच नाही.या जा•यात तुम्ही फसू नका.एवढेच माझे तुम्हाला सांगणे आहे.
मला तुम्हाला बंदा रुपाया बनवायचा आहे.कुठेही फेका तो चाललाच पाहिजे.आज इतके दिवस साधना करून तुम्ही बाहेरच्या साधकांचे तोडीचे झाला आहात.एवढेच नव्हे आजूबाजूला बसून तुम्ही व मी एक ते तीन प्रसाद दोन भक्तांना दिले तर दोघांनाही गुण सारखाच येईल.एवढी तुमची तयारी करून घेतली आहे.पण पाच आठवडय़ानंतर भक्त येऊन ज्यावेळी सांगेल की त्याचे काम झाले आहे त्यावेळी तुम्ही आपला तोल सावरायला शिकले पाहिजे.तुम्ही पहिल्या दिवशी येथे येऊन जे प्रश्न मला विचारलेत तेच प्रश्न आज येणारा भक्त तुम्हाला विचारित आहे.जीवनात सुख- समाधान कशाने मिळेल याचे साधन तो शोधीत आलेला असतो.तुम्ही पूर्वी हेच केलेत.- बाबा,पैसा द्या,बाबा, मोटार द्या म्हणजे सुखी होईन, असे वारंवार म्हणालात.पण आज इतक्या दिवसांच्या साधनेने तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.
आता तुम्ही जीवनाचे साध्य निर्माण करण्यास लागला आहात म्हणून जीवनाचे साधन निर्माण करणा-या अशा भक्तांचे तुम्ही मनोरथ पूर्ण करू शकता.(वज्रेश्वरी नित्यांनद स्वामी.नुकतेच एक सत्पुरुष वारले)लाखो लोक जमले. कित्येकानी नोटा, हिरे,माणके उधळली,हे वर्तमान-पत्रातील वर्णन वाचून चकित होऊ नका.आपल्याकडे अजून दहा लोक वाढत नाहीत म्हणून खेद मानू नका.मी येथे लोक गोळा करायला आलेलो नाही,हे लक्षात ठेवा.आपल्यापुढे वेगळेच कार्य उभे आहे.जोराचा वारा आला तर चुकून डो•यात कच-याचा कण जाईल.पण त्या कच-याच्या कणाइतके देखील चुकीचे मार्गदर्शन अगर तुमच्या विश्वासाचा, श्रध्देचा गैरफायदा आमच्या स्वार्थासाठी या ठिकाणीघेतला जाणार नाही अशी ग्वाही मी देत आहे.मी तर वारंवार सांगत आलो आहे की मला मला अंधश्रध्देने नमस्कार करू नका.अजूनदेखील कुठे देव भेटत असल्यास तुम्ही केव्हाही जावू शकता.अजूनही एकदा हिमालयावरचा साधु जर तुम्हाला देव दाखवणार असेल तर त्याच्याकडे खुशाल जावू शकता.पण एकदा हा मार्ग निर्धारित ठरला की दुसरीकडे बधू नका.या जन्मातील तुमची सर्व पापे आम्ही झोळीत घेतली आहेत.एवढेच नव्हे तर सात जन्माचा हवाला आम्ही दिला आहे.याचे कारण एकच की आम्हाला तुमच्याकडून कार्य करून घ्यावयाचे आहे.इतकी साधना तुमचेकडून करवून घेतली ते केवळ या एका इच्छेनेच.पण इतके सर्व झाल्यावर देखील तुम्ही खुशाल झोपा काढता व कधी एखादा शब्द बोललो तर इकडे यायचेच बंद करता.या तुमच्या वागण्यामुळे आमच्या जीवाला काय यातना होत असतील याची तुम्हा कल्पना येणार नाही.
मैफिल ऐन रंगात यावी,सतारीया आपले सर्व कौशल्य पणाला लावून तारा छेडीत असावा,सारे वातावरण सतारीच्या निनादाने भरून गेले असावे व ऐन वेळी सतारीची एक तार तुटावी त्याच क्षणी सतारीयाची काय अवस्था होत असेल त्याच्यावर काय कल्पोत ओढवेल,त्याला काय यातना होत असतील,त्यालाच फक्त आमच्या यातनांची कल्पना येईल.अशी परिस्थिती आली तरी आम्ही डरणार नाही.अरे,तू नाहीस तर तुझा मुलगा,तो नाही तर तुझ्या नातवाकडून काम करवून घेतल्याशिवाय रहाणारच नाही.एवढी सबुरी बाळगणारे आम्ही लोक आहोत.आज काही भक्तांना मी फार बोलतो म्हणून राग येतो.पण एक लक्षात ठेवा की आम्ही विभूती वरून येत असतो.कारण आम्हालाही आज्ञा करणारी एक शक्ती आहे.ती आज्ञा आम्हाला मानावी लागते.तुम्ही या जगात येऊन असे काय केले आहे की आम्ही विभूतीनी तुमच्या विषयी चार बरे-वाईट शब्द बोलावेत! आज्ञेनुसार आम्ही इकडे येण्याचे बंद केले व आम्ही यावे म्हणून तुम्ही 300/350 वर्षे जरी पायाच्या एका अंगठ्यावर उभे राहून तपःश्चर्या केलीत तरी एक शब्द आम्ही तुमच्याशी बोलणार नाही.इतक्या पराकोटीचे आम्ही विभूती,आज्ञा आहे म्हणूनच बोलतो.पण त्या नंतर प्रत्यक्ष डोके आपटून जीव दिलात तरी एक शब्द बोलणार नाही.त्यावेळेस आमचे शब्द तुम्हाला आठवतील.पण वेळ गेलेली असेल हे लक्षात असू द्या.
आजच तुमची खरी कसोटी आहे.कारण तुम्हाला व मला इतर समाजाला तोंड द्यावे लागत आहे.कुटुंबातील प्रत्येक मनुष्य सुधारला पाहिजे.उद्या येणारा प्रत्येक भक्त बाबांना भेटू शकणार नाही.आम्ही त्याना सांगणार की तुम्हाला सुख-समाधान पाहिजे आहे ना, तर या कुटुंबात जा.अशा प्रकारे तुमची नावे आम्ही सांगणार.आज प्रत्येक गोष्टीत तुमचा मनोनिग्रह आहे.पण उद्या येणारे सर्व लोक नाईलाजाने किवा प्रवाह-प्रतीत म्हणून आलेले असतील.या ठिकाणी पैशाचा व्यवहार अगदी चोख ठेवा.असा व्यवहार चोख नसल्यामुळे अनेक कार्ये मातीमोल झालेली आहेत.काही भक्त विचारतात की आम्हाला रेसचा घोडा सांगा.त्यामुळे आम्हाला मिळणा-या एक लाख रुपयापैकी दहा हजार रुपये आम्ही दादांना देऊ.पण त्यांच्या लक्षात येत नाही की असा व्यवहार करण्यापेक्षा आम्ही सरळच दादांना पैसे देऊ शकणार नाही का? ज्याचा पैसा या गादीवर चढणार असेल त्याचाच पैसा येथे ठेवला जाईल.एरवी खिश्यातून पैसे घेऊन याल.पण इकडे ठेवायचे विसरून तसेच घरी जाल.तुम्ही अल्प-बचतीत दिलेली रक्कम म्हणजे एक प्रकारचा बॉम्ब आहे.वेळ आली की निरनिरा•या संस्थेत तो टाकावयाचा आहे.सद्भावनेने, सतप्रत्तीने दिलेला तांबडा पैसा देखील लाख-मोलाचा आहे.पण वाम मार्गानी मिळविलेले लाख रुपये देखील कवडी मोलाचे आहेत.त्या पैशातून एखाद्या गरीब मुलाला दूध दिले तर त्या मुलाला शौचाला व्हायला लागेल.पण या उलट मनोनिग्रह करून सिगारेट सोडलीत व त्या प्रीत्यर्थ अल्पबचतीत पैसे जमा केले व असा पैसा कोणा विद्यार्थ्याला शिक्षणासाठी दिला गेला तर त्यामुळे त्याचे जीवन बललेल.एवढेच नव्हे तर अत्यंत कठीण अशा काळात त्या विद्यार्थ्याला धमकी दिली की–सिगारेट पी.नाहीतर मानेवर सुरी ठेवतो-तर अशा परिस्थितीत देखील तो सिगारेट पिणार नाही.एवढा अल्पबचतीतल्या पैशाचा प्रभाव आहे.
आज समाजाची परिस्थिती किती बिघडत चालली आहे याला जबाबदार कोण? व याला आवरणार कोण? हा एक मोठा प्रश्न आहे. विधायक कार्याचा पाया वर सांगितल्याप्रमाणे आपणास घालावया चा आहे.आज तुम्हाला विचारले की तुमचा देव कोणता, सण,धर्म,उपासनेचा देव कोणता?तर याला तुमच्याकडे निश्चित असे उत्तर नाही.आठवडय़ातील बहुतेक दिवशी उपवास आहे. गुरुवार का करायचा तर तो दिवस दत्त महाराजांचा. दत्त महाराजांचे डोके थंड होते.पण याचे डोके गुरुवारी एकदम गरम.कारण पोटात अन्न नाही.इतर धर्मातील लोक,भिका-यापासून राजापर्यंत,ख्रिस्मस अगर ईदच्या दिवशी चांगले कपडे घालतील,कानात अत्तराचा फाया घालतील पण तुमचे सण बाराही महिने चालू असतात.गणपतीच्या नावाने जमा होणारी रक्कम जर एखाद्या योजनेला पाठविली तर कोणाच्याही योजना पैशाच्या अभावी अपु-या रहाणार नाहीत.आज तुम्ही देव चव्हाट्य़ावर आणलेत.आज जिथे मुतारी तिथे तुम्ही गणपती बसविता.तुमचे लग्न धर्मशाळेपासून राजवाडय़ा पर्यंत कुठेही लागते.आज प्रत्येक देवतेला धर्मकृत्यात आवाहन म्हणून सुपा-या मांडता. माझे म्हणणे असे आहे की सुपारीवर गणपतीला आवाहन करू नका कारण आजचा गणपती उद्या अडकित्याखाली सुपारी म्हणून कापला जात असतो.अष्टदिक्पाल म्हणून आठ सुपा-या मांडतात.उद्या चंद्रावर गेलेल्या माणसाच्या नावे सुपारी मांडली जाईल.आवाहन म्हणून त्या सुपा-यांवर अक्षतांचा मारा करावयाचा हे देखील बरोबर नाही.
तुम्हाला बोलवायचे झाल्यास हाक मारल्याबरोबर तुम्ही येता.त्यावेळी तुमच्या डोक्यावर अक्षता माराव्या लागत नाहीत. असे असेल तर मग देवाला आव्हाहन करताना असे का करता?भावनेने आवाहन केल्यास ते येणार नाहीत का? आलेच पाहिजेत.असा माझा दावा आहे.लग्नात नवरा-नवरीच्या डोक्यावर अक्षतांचा मारा करीत असतां नुसते ‘सावधान’ म्हणून ते होणार नाहीत का? लग्नाचा हजारो रुपयांचा खर्चात दोन-चारचे तांदूळ लक्षात घेतले जात नाहीत.पण एका कुटुंबाचे एका वेळचे अन्न पायदळी जाते हे तुम्ही लक्षात घेत नाही.पूर्वीच्या काळी वेदाध्यायन करणे,धर्मकृत्ये यथासांग करणारे विज्ञान होते.कर्तव्याच्या भावनेने ते या सर्व गोष्टी करीत असत.त्या मोबदल्यात गावातील सर्व मंडळी त्याना लागणा-या आवश्यक गोष्टी पूरवत असत.पुढे काही विध्नसंतोषी लोकांना हे पहाविले नाही.त्यांच्या सांगणावरून त्या लोकांना चरितार्थाच्या गोष्टी मिळेना अशा झाल्या.त्यामुळे एकेकाळी कर्तव्याच्या भावनेने कार्य करणारे लोक चरितार्थाचे साधन म्हणून करणे क्रमप्राप्त झाले म्हणून या सुपा-या आल्या. आपल्याला पुन्हा वैदिक धर्म आणावयाचा आहे.त्या वर्गालासुध्दा चरितार्थाचे साधन उपलब्ध करून दिले पाहिजे.त्याकरीता त्यांना सव्वापाच रुपये दक्षिणा द्या पण या सुपा-यांवर आवाहन नको असे सांगा.
या मार्गात कोणीही लाडका नाही व कोणीही दोडका नाही.कार्यारंभी जो एक आशिर्वाद दिला आहे तोच सग•यांना आहे.उद्या समजा वैकुंठाहून विमान आले तर धोंडू (हेमकुंज केंद्रावर श्री तांबे यांचे घरी काम करणारा गडी) येईपर्यंत ते मी थांबवून ठेवीन.कारण धोंडी येथील लादी पुसतो.मगच तुमची साधना होत असते.या ठिकाणीयेऊन तुम्ही वाटेल तो प्रश्न विचारता पण आम्हाला आशिर्वाद देताना विचार करून द्यावा लागतो.एखादा भक्त म्हणतो मला “निरासक्त करा”. पण त्याच्या बायकोचे काय करायचे?शिवाय तुम्ही जन्माला यावेत यामागे तुमच्या माता-पित्यांची केवढी आसक्ती होती.त्या आसक्तीचे मूर्तीमंत फळ म्हणजे तुम्ही.मग तुम्ही निरासक्त कसे होणार? आसक्ति,निरासक्ति हे शब्द बाहेर ऐकता.पण ते इकडे वापरू नका.तुम्हाला वाटते की माझ्या मुलाखती रेकॉर्ड करून ठेवाव्यात.पण मी इतका स्वस्त नाही.ज्याच्या घरी मशिन आहे तो मला केव्हाही वाजविल. तुमच्या दादांची मुलाखती ऐकण्याची इच्छा म्हणजे (आवाजाने स्वतःचा आवाज ऐकण्यासारखे आहे) मुलाखती पुस्तकरुपाने प्रसिध्द करून चार-आठ आण्याएवढी माझी किंमत मी कमी करणार नाही.त्या बाबांचा तुम्ही फार फायदा घेतलात.
“वह सत्पुरुष को तुमने खा डाला”. प्रेमात पाडून तुम्ही मला बनवू शकणार नाही.ख्रिस्त व महमंद पैगंबरांच्या निधनानंतर काही कारणाने बायबल व कुराण हे धर्म ग्रंथ त्यांच्या अनुयायानी लिहिले.सहाजिकच त्यात त्यानी आपला मसाला घातला.उद्या तुम्हीसुध्दा हेच करणार आहात.हे आम्ही पूर्णपणे जाणून आहोत व म्हणूनच आधी साधन-पत्रिका छापली. आजची साधन-पत्रिका ही भावी काळातील अखिल मानवजातीचा धर्मग्रंथ आहे.इतका तो अमोल आहे.तुम्ही माझ्या ग•यात पडत जाऊ नका.फार कठीण आहे ती गोष्ट.हत्ती व धूस या दोघींची शेपटी पडद्यामागून सारखी वाटते.पण त्या सारख्याच वाटणा-या शेपटय़ा बघून पडद्यापलीकडे केवळ दोन धुशीच असतील अशा कयासाने जर एका शेपटीला हात घातलात तर पलीकडे गजराज आहे असे तुम्हाला आढळेल.तो गजराज लोकाशिर्वादामुळे दिवसें-दिवस मोठा होत आहे.जास्त गडबड कराल तर तुम्हाला पुढे ओढून मोक्षाला पाठविल्या खेरीज रहाणार नाही.हे लक्षात असू द्या.ज्या वेळी या कार्याची दिशा 350 वर्षापूर्वी वरच्या जगात ठरली गेली त्यावेळी–माणूस म्हणून जो एक प्राणी आहे व त्याच्या हितासाठी हे कार्य चालू होणार आहे,तो कसा आहे व त्याच्याशी कसे वागायला पाहिजे हे ठरविण्यात आमची 12 वर्षे गेली.तेव्हा आम्ही तुम्हाला पूर्णपणे ओळखून आहोत.हे लक्षात ठेवा- तुम्ही कायद्यात वागायला शिका.कायद्यात वागताना तुम्हाला जर मृत्यू आला तर तुमची हाडे जुळवून मी तुम्हाला जिवंत करीन.पण बेकायदा वागून तुमचा जीव गेला तर माझ्यासारखा कसाई नाही.ही लाकडे लवकर जाळायला घेऊन जा असे मी सांगेन.
या ठिकाणी चोविस तास अधी नावे द्यावी असा नियम आहे.पण इकडे फार दुर्लक्ष केले जात आहे.तुम्ही चोविस तास आधी नाव दिलेत की वर चित्रगुप्ताला ते कळते.तो यादी काढून तुमचे नाव बघतो.नाव देणा-या माणसाने काही धर्माचरण, देवदेवतार्चन काही केले आहे की नुसत्याच देवाला शिव्या देत जन्म घालविला आहे,हे चित्रगुप्त बघतो.जन्मात जर काही चांगले केले असेल तरच दुस-या दिवशी या ठिकाणीवेळेवर याल व बाबांची भेट होईल.पण जन्मभर शिव्या देण्याशिवाय काहीच केले नसेल तर येताना नेमकी गाडी अगर बस चुकेल,उशीर होईल व बाबा भेटणार नाहीत. (ज्यावेळी एखादा भक्त या ठिकाणीयेतो त्यावेळी आमचा प्रसाद त्याच्या घरी असतो व तो ज्यावेळी घरी असतो त्यावेळी आमचा प्रसाद इथे असतो) तुम्ही नवीन माणसाला आणण्याचा खुप प्रयत्न करता पण तो येत नाही कारण पूर्वकर्म उदीत झाल्या शिवाय तो येथे येणार नाही.येथे आलेले भक्त देखील निघून जाण्याचे कारण तुम्हीच आहात.कामकाजाच्या दिवशी सकाळी 8/9 पर्यंत वातावरण अगदी प्रसन्न व उत्साहपूर्ण असे असते कारण नव्याने येणारी मंडळी बाबांना भेटण्यासाठी उत्सुक व अतूर झालेली असतात. प्रत्येकारणा वाटत असते की आज बाबा भेटणार व माझे काम होणार.अशा ह्या त्यांच्या विचारामुळे उत्पन्न होणा-या लहरी या ठिकाणीआदळत असतात.त्यामुळे नऊ वाजेपर्यंत वातावरण उत्सहित असते.पण त्यावेळी तुमच्या सारख्या जून्या सेवकांचे विचार नेमके उलट असतात.तुमचे सगळे काही केले पण तुम्ही संतुष्ट नाही म्हणून बाबा अजून आपले आपले काम का करीत नाहीत,या विचारात तुम्ही सदैव गुरफटलेले असता.
आजपर्यंत वेळोवेळी बाबांचा कृपाशिर्वाद घेतलेला असल्यामुळे नवीन येणा-या भक्तापेक्षा तुमचा हा विचार चांगला पोसलेल्या उंदीरासारखा झालेला असतो.या विचारांच्या लहरी नवीन भक्त की ज्याना अजून बाबांचा आशिर्वाद मिळालेला नाही त्यांच्या कमजोर विचारांना धडक मारतात.परिणामी त्याना देखील वाटू लागते की आपले येथे काम होणार नाही व पुन्हा इकडे ते वळत नाहीत.तुम्ही सेवक म्हणून आलात की मान-अपमान विसरून कुठलेही काम आत्मियतेने केले पाहिजे.बाबांच्या फोटोंची पूजा करणे हे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्व बाहेरील चपला लावणे,केर काढणे,पाणी मारणे इत्यादी गोष्टींना आहे. तुमच्यापैकी एखाद्या सेवकाने काही सूचना केली तर त्याचे पालन करण्यास तुम्ही नाखुष असता कारण ती सूचना अमुक एका व्यक्तीची आहे व तुम्ही दोघे सेवक असलात तरी तुमचे मन त्यांच्या विषयी साफ नसते.पण येथे उच्चारलेला प्रत्येक शब्द आहे.त्याची जपवणूक झालीच पाहिजे.अशी तुमची धारणा ठेवा.येणा-या भक्ताचे सुख ऐकून भारावून जाऊ नका.त्याचे कितीही दुख असले तरी विरघळून अगर हेलावून जाऊ नका.
दृष्टी निरपेक्ष पाहिजे तरच काही काम करू शकाल. एका सेवकाला नवीन केंद्रावर नियुक्त केले होते.तेथे येणा-या एका बाईचा मुलगा आजारी असल्यामुळे त्या सेवकाने उदी दिली.दोन दिवसानी बाई आली व म्हणाली की मुलगा आता बरा झाला आहे.हे ऐकून सेवकाला आनंद होणे अगदी स्वाभाविक आहे.पण त्याने आनंदाची परिसिमा ओलांडून तो आनंद अहंकारात विलीन झाला. वास्तविक बाबा माझ्याकडून अशीच सेवा करून घेत चला अशी त्याने प्रार्थना करावयाला पाहिजे होती. “पण बाबां से हम छिन लिया।” असा अहंकार उत्पन्न होऊन त्याचा तोल गेला.तुमचाही असाच जाईल तरी सावध रहा. मुलाला उदी घेऊन बरे वाटले,हे ऐकून तुम्हाला आनंद कसा झाला ? तुम्ही या ठिकाणीकर्तव्य करायला आला आहात.कर्तव्याच्या भावनेने उदी दिली असती तर मुलगा बरा होईपर्यंत दररोज त्याच्या आईजवळ चौकशी केली असती.पण नेमकी हीच गोष्ट तुम्ही विसरलात. चार दिवसानी आईने मुलाचे वर्तमान सांगितल्यावर कृतार्थ झालेल्या भावनेने आनंदात निमग्न झालात.बाहेर हेच होत असते व असे या ठिकाणी होणार नाही ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे.
“मेरे साईबाबा की महिमा निराली” ही आरती रोज म्हणता.पण याचा अर्थ कळला का? बाबांना डायरेक्ट प्रश्न विचारून तुमचे काम कधीच होणार नाही.सर्वप्रथम येथे येणा-या भक्तांची सेवा केली पाहिजे. त्यानंतरच तुमचे काम बाबा करतील.आलेल्या भक्तांचे काम केल्यानंतर बाबा तुम्हाला आशिर्वाद द्यायला येतात.पण तुम्हा जागेवर असत नाही. तुम्हाला घरच्या मंडळीना संवेदना द्यायला सांगितल्या. बाहेरील मंडळींना संवेदना द्याल तर एकदम गुण येणार.कारण त्यांच्याकडे बाबांचे अधिष्ठान असलेच असे नाही.तसेच त्यांचे आचार-विचार अनुकूल असतील,नसतील व त्यामुळे संवेदना देऊनसुध्दा थोडय़ा काळात गुण न आल्यास तुम्ही निराश व्हाल.
पाप-पुण्य हे फार वादातीत प्रश्न आहेत.हे म्हणजे पाप व ते म्हणजे पुण्य.असे बाटल्यात भरून दाखविता येईल का?असल्या प्रश्नांवर आपले मत देऊ नये.जी गोष्ट केल्याने समाधान लाभते ती पुण्य व ज्या गोष्टीने इतरांना दुख होते ते पाप.हे कार्य सर्वानी मिळून करावयाचे आहे. येथे व्यक्ती पूजेस वाव नाही.तुम्ही दादांवर विश्वास ठेवलात तर 25 टक्के काम होईल.बाबांवर विश्वास ठेवल्यास 50 टक्के व समितीवर विश्वास ठेवल्यास 100 टक्के काम होईल.मी ग•यात हार घालून घेत नाही.पेढेसुध्दा घेत नाही.याचे कारण या विश्वातील ज्या शक्तीने फल-फुल निर्माण केले त्याच शक्तीने आम्हाला जन्म दिला म्हणून फळ-फुल हे आमचे बंधु-बांधव लागतात.