अध्याय १० – कार्यपध्दती.
१. या कार्याची स्थापना पूर्णत्वाने दैविक उपासना परंपरेतील आहे. मंत्र-तंत्रविद्यांचा अभ्यास समितीस मान्य नाही.
२. ईश्वरी उपसनेतून मानवी जीवनाची सेवा ‘कर्तव्य’ म्हणून करावी असा येथील गुरुपदेश आहे.
३. या कार्याची सिध्दसिध्दांत पध्दत पूर्णत्वाने समितीच्या अभ्यासाची आहे. बाह्य संबंधीत नाही.
४. दु:खनिवारणार्थ होणाऱ्या मार्गदर्शनाचा हेतू धर्माचरण, नित्य आचार-विचार, संस्कार, जन्म ऋणानुबंधातील कर्तव्य यांचे पालन करणे हाच धर्म असा आहे.
५. हे कार्य दैविक उपासनेचा पाया असल्याने येणाऱ्या प्रत्येक भक्त-भाविकास धर्माचरण स्वतः करण्यास मार्गदर्शन केले जाते.
।। नित्य उपासना ।।
श्री. सद्गुरु पूजा, आरती, तीर्थप्रसादः-
सकाळी 5।। वा. धूप, सकाळी 9 वा. आरती, सायंकाळी 6 वा. धूप व 7।। वाजता आरती.
श्रीसद्गुरु पादुकांस अभिषेक-पूजन :-
दर गुरुवारी , एकादशी, पौर्णिमा, अमावस्या ( शिवाय भक्त-भाविकांच्या इच्छेवरून त्यांनी तशी पूर्वसूचना दिल्यास )
।। वैयक्तिक उपासना ।।
प्रत्येक भक्तभाविकांस त्याच्या इच्छेनुसार आपल्या दैनंदिन जीवनातील दु:खनिवारणार्थ काही तरी उपासना करणे आवश्यक आहे. नुसते येथे येऊन दहा वेळा प्रश्न विचारण्यात अर्थ नाही. तुमचे जीवन सुखी होण्याची जबाबदारी प्रश्नाच्या उत्तरापेक्षा तुमच्यावर पूर्णत्वाने आहे. जन्मजन्माची दु:खकारणे ही “साधन-पत्रिका” अभ्यासून समजावून घ्या.
वैयक्तिक उपासना :-
१. श्री सद्गुरु नामस्मरण
२. श्रीदेवीमहात्म्य पठण
३. श्रीनवनाथ पारायण
४. सामुदायिक जप, परमार्थ प्रश्नावली व प्रवचन यांचे मनन
१. श्रीसद्गुरु नामस्मरण :–
सकाळी ८ ते १२ व दुपारी ४ ते ९पर्यंत रोज (गादीच्या कामकाजाच्या पध्दतीच्या सोईनुसार) या वेळेत येथे येऊन करावे.
२. श्रीदेवीमहात्म्य पठण :-
दर मंगळवारी व शुक्रवारी दुपारी ३ वाजता
३. श्रीनवनाथ पारायणः- दर
बुधवारी दुपारी ३ वाजता भगिनी वर्गासाठी व सूचनेनुसार पुरुषांसाठी
४. सामुदायिक जप, परमार्थ प्रश्नावली व प्रवचन:-
रोज सायंकाळी आरतीनंतर 10 वाजेर्पंत
विशेष सूचना :-
ज्या भक्तभाविकांस वरील उपासनापध्दतीचा अभ्यास करावयाचा आहे, त्यांनी (१) येतेवेळी स्नान करून यावे. (२) धूतवस्त्र आणावे. (३) जपमाला वैयक्तिक असावी. (४) साधन-पत्रिका असावी. (५) यज्ञोपवीत घातले नसल्याल ते घालावे. (६) ताम्हन, पळी, पंचपात्र बरोबर आणावे. (७) दर्भासन नसल्यास धूतवस्त्र (पंचा ) असावा. या वेळी कोणाचा अपमान, उपमर्द, तिरस्कार,निंदा कोणीही करू नये.
गुरुपीठाचे वार्षिक उत्सव :-
१. श्रीसद्गुरु साईनाथ महाराज पुण्यतिथी (विजयादशमी )
२. श्रीसद्गुरु हजरत हाजी मलंग बाबा उरूस (माघ पौर्णिमा)
३. श्री व्यास पौर्णिमा (गुरु पौर्णिमा)
हे तिन्ही उत्सव आद्य केंद्रावर (पुणे) येथे होतात. त्या दिवशी आज क्षणापावेतो मिळालेल्या गुरुप्रसादाबद्दल व दु:खनिवारणार्थ झालेल्या मार्गदर्शनाबद्दल उतराई म्हणून “गुरुदक्षिणा” या स्वरूपात ती सामुदायिकपणे समर्पण केली जाते.
तसेच अनुक्रमे :-
१. रामनवमी (मुंबई गादी ) २. हनुमान जयंती (सातारा गादी) या केंद्रावर साजरी केली जाते.
कार्याची लोककल्याणार्थ भूमिका :-
१. प्रापंचिक दु:खनिवारणार्थ मार्गदर्शन करणे. २. शारीरिक रोगनिवारणार्थ दैवी उपचार व ३. विद्यार्थी वर्गास ज्ञानसंवेदनाद्वारे बौध्दिक व शारीरिक विकासास मदत करणे.
१. प्रापंचिक दु:खनिवारणार्थ :- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार या दिवशी निराकरण पध्दतीद्वारे मार्गदर्शन केले जाते. (कामकाज फक्त सकाळी होते )
२. शारीरिक रोगनिवारणार्थ:- स्पर्शसंवेदना :- दर सोमवारी व बुधवारी सकाळी दिल्या जातात.
३. अभिमंत्रित तीर्थ :- रोज सकाळी व सायंकाळी आरतीनंतर विनामूल्य पुरविले जाते.
४. अभिमंत्रित गोळ्या :- बाहेरगावी असणाऱ्या रोगी माणसास व आवश्यकता असल्यास स्थानिक भक्तभाविक, जे कार्यकेंद्रापासून लांब आहेत अशांना ५ आणे मूल्य घेऊन पुरविल्या जातात व त्याची नोंद अल्पबचतीप्रीत्यर्थ ठेवली जाते. अधिक माहिती साधनपत्रिकेतील, याबाबतच्या मुद्यात विशद केली आहेच.
५. विद्यार्थी-वर्गास ज्ञान संवेदना :- दर शनिवारी दुपारी ४ वाजता हा वर्ग घेण्यात येतो. (विशेष माहिती साधन-पत्रिकेत पहावी.)
भक्त-भाविकांस सूचना
१. प्रत्येक भक्त-भाविकांस आपले नाव (प्रश्न विचारण्यासाठी) 24 तास आधी, नोंदविले पाहिजे. ते कोणाच्या हस्ते किंवा निरोपाचे असू नये.
२. कामासाठी आलेल्या भक्ताचे प्रसाद (नारळ व दक्षिणा रू 5.25 पानाचा विडा) प्रथम प.पू.बाबांच्या चरणी पूजनास ठेवले जातात. हा विधी आरतीपूर्वी 5 मिनिटे आधी असतो. त्यानंतर उशिरा आलेल्या भक्त-भाविकांचा प्रश्न विचारात घेतला जाणार नाही. तेव्हा तशी भीड घालण्याची भूमिका ठेवू नये.
३. आपल्याला मार्गदर्शन करणारी सेवक मंडळी आपल्यासारखीच नोकरीधंदा पेशातील आहेत. परंतु येथील कार्यार्थ त्यानी आपले कर्तव्य अनुभवांनी ठरविले आहे. तेव्हा त्यांच्याशी प्रेमाने व आपुलकीने वागावे.
४. प्रत्येकाचे काम नोंद पध्दतीचे असल्याने कोणासही वैयक्तिकरित्या भेटता येणार नाही. तसा भेटण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.
५. येथील एखाद्या कार्यपध्दतीस किंवा तात्विक विचारांस आपला विरोध असेल, तर त्याची चर्चा येथील भक्त व सेवक यांच्याशी न करता येथे ठेवलेल्या सूचना पत्रिकेत त्याची नोंद करावी. ते विचार कार्यास पोषक असतील तर कार्य पद्धतीत त्याचा उपयोग केला जाईल.
६. येथे आलेल्या भक्त व सेवकांनी राजकीय व सामाजिक, पारमार्थिक विषयाबद्दल आपले विचार प्रकट करू नयेत किंवा बाहेरील गुरुकुलाची तुलना ह्या कार्याशी व या कार्याची तुलना बाहेरील कार्याशी करू नये.
७. येथे आल्यावर गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी, धर्म-अधर्म, जात-पात इ. विचारांनी युक्त आचरण असू नये.
८. कार्याच्या दृष्टीने वेळोवेळी ज्या सूचना पत्रकावर जाहीर केल्या जातील, त्या प्रत्येकाने अभ्यासाव्या.
९. येथे आल्यावर येथील पवित्र वातावरणात आपल्या उठण्या बसण्याने, वागण्याने इतरांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याचा विचार करावा. आरती झाल्यावर तीर्थप्रसादानंतर कोणास काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर नियुक्त सेवकांना भेटावे.
१०. आपल्या जीवनात दु:ख, अशांतता निर्माण होण्यास काय काय कारणपरंपरा असू शकते ते अभ्यासण्यासाठी समितीच्या सिध्दसिध्दांत पध्दतीच्या अभ्यासाच्या ‘साधनपत्रिकेचा’ अभ्यास करण्यासाठी उपस्थित सेवकाकडून “साधनपत्रिका” मागून घ्यावी. वाचन झाल्यावर ती पुन्हा योग्य ठिकाणी ठेवावी.
११. आपण ज्या एका जीवनातील दु:ख कारणाला घेऊन आलात ते दूर होणे म्हणजे सुख नसून आणखी दु:ख आहे. तर दु:खाची कारणमीमांसा अभ्यासिणे आवश्यक आहे. तरच निरंतर सुखी व्हाल. त्याचा अनुभव देणे हाच कार्याचा उद्देश आहे. तेव्हा पूर्णत्वाने मार्गदर्शन हवे असेल तर आपण आपले प्रश्न विचारा. क्षणिक सुखासाठी आपण आपला व आमचा वेळ खर्च करू नये.
१२. आपण भक्त-भाविक मंड़ळी येथे आल्यावर येथे कोणत्याही विचारांची अनिश्चित भूमिका आपण ठेवू नये. कारण हे कार्य व्यक्तीशः चालविले जात नसल्याने कार्याशी एकरूप व्हा. व्यक्तीशी नव्हे. असे सांगण्यामागील प्रयोजन असे की बरीचशी भक्त मंडळी येथे येतात, ‘दादा आहेत का’ अशी चौकशी करतात व मग भेटू असे म्हणतात. वास्तविक ‘श्री. दादा नाहीत’ असा बुद्धिभेद करणे अज्ञानाचे आहे. ते जरी नसले तरी सद्गुरुपीठ आहे म्हणजे कार्य अव्याहत चालू आहे. परंतु व्यक्तीमहात्म्याचा मनावर बसलेला पगडा आम्हाला आमच्या जीवनातील जाणाऱ्या क्षणाचा अहित व अपव्यय करणारा आहे हे आपणांस पटत नाही. तर कोणीही तसे इत:पर करु नये. या सर्व कार्याच्या सिध्दसिध्दांत पध्दती एकाच सद्गुरुकृपेने व मार्गदर्शनाने चाललेल्या असल्याने आपण कोणालाही भेटलात तरी मार्गदर्शन एकाच पध्दतीने होणार आहे. तेव्हा वेळ न घालविता उपस्थित सेवकांना भेटून ‘प्रसाद” घेऊन सेवा सुरू करावी. श्री. दादा उपस्थित होताच सेवक आपणांस त्यांना भेटवतील. श्री. दादांना भेटल्यावर आपण लवकर सुखी होऊ असे वाटणे हे अज्ञान होय. आपली या ठिकाणी आल्यावर असणारी श्रध्दा, विश्वास, आचार, विचार या सर्वांवर ‘प्रसादाचे’ फल अवलंबून आहे. तेव्हा आपल्याला दिलेल्या प्रसादाचे पूजनादि विधी उरकताच तो बदलून नेण्यास विलंब करु नये.
१३. खालील प्रश्नावर विचारणा करु नये :-
१. मी श्रीमंत कोणत्या मार्गानी होईन ?
२. आर्थिक प्रश्न केव्हा लवकर सुटेल ? सुटण्यासाठी आणखी काय करु ?
३. मला करणी कोणी केली ?
४. माझी चोरी केव्हा सापडेल ? व ती कोणी केली ?
५. मला मुलगा होईल की मुलगी ?
६. माझे लग्न केव्हा होईल ?
७. मी परीक्षा उत्तीर्ण होईन का ?
१४. आता क्रमशः या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावयाचीच झाल्यास —
१. प्रश्न १ व २ यांच्या मागील भूमिका ही खरी निराळ्या स्वरुपाची असल्याने ते विचार ह्या कार्यास पोषक नाहीत. (उदा. सट्टा, जुगार, रेस, वायदेबाजार किंवा अन्य असत्य, अन्याय, कपट, अगर फसवेगिरीचे मार्ग)
२. प्रश्न ३ व ४ यांच्या उत्तराने कलह निर्माण होण्याची शक्यता खूप असते. तेव्हा ते निवारण व्हावे असा आशिर्वाद मागावा. त्यांचा नामनिर्देश केला जाणार नाही.
३. प्रश्न ५ मुलगा किंवा मुलगी झाली तरी तुम्हीच सांभाळणार आहात. तेव्हा ती सुखासमाधानात राहू देत,असा आशिर्वाद मागावा.
४. प्रश्न ६ प्रमाणे कदाचित सांगूनही तुम्ही, ती न करण्याचा अट्टाहास घरणार. यापेक्षा लग्न करण्याची या वर्षी इच्छा आहे, तेव्हा ते व्हावे, असा आशिर्वाद मागा.
५. प्रश्न ७ चे उत्तर अभ्यास केला तर, असेच द्यावे लागेल.
।। समितीची कार्यपद्धती ।।
१. प्रत्येकाची कार्यकारण उपस्थिती नोंद पद्धतीने ठेवली जाते.
२. विचारल्या गेलेल्या प्रत्येक प्रश्नोत्तरांची अथवा निराकारणाची नोंद कायम स्वरूपाची ठेवली जाते.
३. मासिक अहवाल प्रत्येक केंद्रातर्फे एकमेकांकडे व भक्तमंडळींच्या अवलोकनार्थ जाहीर केला जातो. तो आर्थिक अडचणीमुळे हस्तलिखित असतो.
४. प्रत्येक केंद्रावर सेवकाच्या कार्याच्या अडचणी समजण्यासाठी त्रैमासिक बैठक घेतली जाऊन त्याचा अहवाल सादर केला जातो.
५. मासिक सभासद इच्छेनुरूप होता येईल व वर्गणीसुद्धा ऐच्छिक अशीच आहे.
१. प्रत्येकाची कार्यकारण उपस्थिती नोंद पद्धतीने ठेवली जाते.
२. विचारल्या गेलेल्या प्रत्येक प्रश्नोत्तरांची अथवा निराकारणाची नोंद कायम स्वरूपाची ठेवली जाते.
३. मासिक अहवाल प्रत्येक केंद्रातर्फे एकमेकांकडे व भक्तमंडळींच्या अवलोकनार्थ जाहीर केला जातो. तो आर्थिक अडचणीमुळे हस्तलिखित असतो.
४. प्रत्येक केंद्रावर सेवकाच्या कार्याच्या अडचणी समजण्यासाठी त्रैमासिक बैठक घेतली जाऊन त्याचा अहवाल सादर केला जातो.
५. मासिक सभासद इच्छेनुरूप होता येईल व वर्गणीसुद्धा ऐच्छिक अशीच आहे.
वर्षातील खालील दिवशी गादीवर कोणतेही कामकाज होत नाही.
* मकरसंक्रांत * प. पू. हाजी मलंग बाबा उरूस दिन * गुरुप्रतिपदा * श्रीरामदास नवमी * श्री तुकाराम बीज * श्री एकनाथ षष्ठी * गुढीपाडवा * रमझान ईद * श्रीराम नवमी * श्री हनुमान जयंती * श्री अक्कलकोट स्वामी पुण्यतिथी * अक्षय्य तृतिया (परशुराम जयंती) * मुंबई गादी वर्धापनदिन * मोहरम * श्रीगुरुपौर्णिमा * नागपंचमी * नारळी पौर्णिमा * गोकुळ अष्टमी * श्री गणेश चतुर्थी * अनंत चतुर्दशी * घटःस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत (नवरात्र महोत्सव) * बलिप्रतिपदा * चंपाषष्ठी * श्रीदत्त जयंती
वरील कार्यपध्दत ही आपणा प्रत्येक भक्त-भाविकांच्या उध्दारासाठी समितीने आपल्यासमोर ठेवली आहे. त्यातील आपला वाटा आपण स्वयंस्फूर्तीने उचललात, तर थोड्याच काळात या कार्याचा लाभ बहुसंख्य भक्तभाविकांना लाभेल. तेव्हा आपला वाटा कर्तव्य म्हणून आपण ठरवा, समिती तो सांगू शकत नाही.