अध्याय ५ स्पर्श संवेदना व ज्ञान संवेदना

आज पाश्चिमात्य देशात या शास्त्राचा अभ्यास खूपच मोठ्या प्रमाणात झाला असून त्यास जाहीरपणे वैद्यकीय शास्त्रानेही संमती दिलेली आहे. परंतु अजूनही पूर्णत्वाने हे शास्त्र आहे हे मानण्यास थोडेबहुत विरोध आहेत ते असे :-

जर एखादी विद्या किंवा शास्त्र म्हटले व ते दुसऱ्यास किंवा तिसऱ्यास शिकविता आले नाही, तर ते शास्त्र किंवा विद्या होऊ शकत नाही. शास्त्र किंवा विद्या म्हटले की, ते अभ्यासूस मिळालेच पाहिजे. अशा लोक-कल्याणार्थ विद्या व शास्त्र भारतात खूप आहेत. पण त्यांचा अभ्यास शास्त्रीय पध्दतीने केला नसल्यामुळे व केला असल्यास स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या विचारांमुळे त्याचा फायदा इतरांना झाला नाही. त्यामुळे या सर्व विद्या व शास्त्र गूढ विद्या म्हणून किंवा पूर्वजन्मीची पूण्याई म्हणून ओळखली जाऊन त्याला शास्त्र म्हणून मानण्यास कोणी तयार नाही. या शास्त्राच्या अभ्यासात दोन भाग आहेत. एक स्वतःची उन्नती करण्याचा व दुसरा लोककल्याणार्थ.

पहिल्या मार्गातील मध्यस्थाची किंवा साधकाची भूमिका इतकी विचित्र आहे की, त्यांना भेटताच शास्त्राबद्दल इतकी विचित्र भूमिका ते जगासमोर मांडतात की, सर्वसामान्य परिस्थितीत व्यावहारिक मनुष्य असे उद्गार काढतो की, आम्हाला अशा शास्त्रांची आवश्यकताच नाही. जर दैनंदिन जीवनात उपासनेने, निश्चयाने काही आत्मसात होणार असेल तर ते सांगणे बाजूला राहून या जन्मात मिळणार नाही किंवा प्रपंचात राहून याची प्राप्ती होत नाही असे अनेक तर्कशून्य बुध्दिवाद साधनेचा नवीन अभ्यास करण्यासाठी निघालेल्या भाविकासमोर मांडले जातात. वास्तविक परमेश्वराच्या सेवेत घरात व बाहेर असा फरक असू नये व परमेश्वर तसा फरक करीत असेल हे म्हणणे चुकीचे होईल. स्वतःच्या जीवनातील कर्तव्य-कारण, जबाबदाऱ्या पार न पाडता, अमुक एका ठिकाणी मी तुला भेटतो असे देवाने सांगणे म्हणजे कर्तव्याच्या जबाबदाऱ्या पार न पाडता ’तू मला शोध’ असा अर्थ होतो आणि अशा परमेश्वराची भक्तांना भेटण्याची, आशिर्वाद देण्याची किंवा उन्नती करण्याची भूमिका नाही. अशी भूमिका ज्या सिध्द-साधकांनी परमेश्वराबद्दल निर्माण केली आहे, त्यास शास्त्र म्हणता येईल काय ?

आता दुसरी भूमिका, हिचा अभ्यास शास्त्रशुध्द झाल्याने या साधकास कोणत्याच प्रश्नाबद्दल निश्चित असे शास्त्रसंमत मत अधिकाराने सांगता येत नसते. त्याच्या जवळील दैवी कृपेचा लाभ हा काही वेळा पूर्वजन्माप्रमाणे उदीत झालेला असतो किंवा या जन्मात काही अट्टाहासाने साधना करून प्राप्त केलेला असतो. त्यामुळे केले गेलेले मार्गदर्शन याची दु:ख कारणमीमांसा शास्त्राधाराने किंवा कारण परंपरेने सांगणे कठीण असते. अशा दोन साधकांच्या तावडीत सापडलेले व जे मानवी जीवनाच्या उन्नतीला अत्यावश्यक असे शास्त्र आहे, ते या सिध्द-साधकांनी नवीन माणसाला किंवा अभ्यासूला ‘मूर्खपणाचे शास्त्र आहे’ असा भ्रम निर्माण करून ठेवला आहे. आज पाश्चिमात्य देशात मानवी जीवनास निश्चितपणे सुखासमाधानाची कल्पना येण्यासाठी या शास्त्राचा अभ्यास मोठमोठे विद्वान शास्त्रज्ञ करीत आहेत. अन्य शास्त्रांची जशी जीवनास अत्यावश्यकता आहे, तशी मनाची, विचारांची व भावनेची उन्नती होण्यास या शास्त्राचाच अभ्यास होणे आवश्यक आहे. आज ऐहिक सुखप्राप्तीसाठी जे शास्त्रीय संशोधन झाले, त्या पुढेही असा प्रश्न आहे की, आता काय ? ही शास्त्रीय प्रगती शास्त्राची झाली, तरी मनुष्याच्या आचार-विचारांची प्रगती झाली असेल असे वाटत नाही. एकेकाळी मनुष्य आपल्या शरीर-संरक्षणार्थ वल्कले वापरीत होता. तेथून त्याने आपल्या ज्ञानाने त्याच शरीर-संरक्षणार्थ इतके तलम कपडे काढले आहेत की, पुनःश्च मनुष्य नग्नावस्थेत आहे असा भास हे तलम कापड वापरून होत आहे. आता या पुढे काय ? प्रथमतः जी आपली रानटी अवस्था होती, ती प्रगतीपथावर जाऊन पुन्हा रानटी झाली आहे, असे म्हणणे कितपत खरे ठरेल ? अशी अनेक प्रकाराने झालेली प्रगती जरी प्रत्यक्ष व्यावहारीक जीवनात दिसत असली तरी मनुष्याच्या त्या विचारातील प्रगती अन्य साधनांत निर्माण होऊन ती साधने मनुष्याच्या विचारांचे प्रतीक आहेत, हे जरी खरे, तरी मनुष्याच्या नैतिक विचार-आचारांची प्रगती झालेली नाही, हे सत्य समाजात आज घडोघडी अनुभवास येत आहे. उदा. एखादा पदवीधर किंवा परदेशी जाऊन आलेला अभ्यासू जेव्हा विवाहास समाजापुढे येतो, त्यावेळी स्वतःची पदवी किंवा विद्या याची किंमत वधूपित्याजवळ अमुक एका रकमेच्या मागणीने करीत असतो. अशा या नवमतवादी विद्वान सुधारकांची ही विचारसरणी किंवा हा अट्टाहास विद्वत्तेचे समाजकल्याणार्थ, लोककल्याणार्थ किंवा वैयक्तिक कल्याणार्थ प्रतीक होऊ शकेल का ? वास्तविक, उच्च शिक्षणाने मनुष्याचे आचार-विचार हे समाजाच्या दृष्टीने समाजास ‘आदर्श’ अशा स्वरुपाचे असावयास पाहिजेत. पण आज ही परिस्थिती अगदी विरुध्द विचारांनी चाललेली आहे. ज्ञानाने मनुष्य नि:स्वार्थ, निरपेक्ष व स्वतःच्या कर्तृत्वाच्या आत्मविश्वासाने स्वतः परिपूर्ण असा व्हावयास पाहिजे. पण आजचा ज्ञानी हा जास्तीत जास्त आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी म्हणजे पदवीधर होईपर्यंत किंवा परदेशातून परत येईपर्यंत आलेला खर्च हा जो ज्या कारणाने भेटेल, त्याच्याकडून वसूल करण्यासाठी मार्ग शोधीत असतो. ही स्थिती आज समाजात साध्या कारकूनी पेशातील माणसापासून ते वरिष्ठापर्यंत प्रत्येकामध्ये जाणवत आहे. हे सत्य समोर असता जर समाज-सुधारक, ज्ञानी आहे असे म्हटले तर विश्वास कसा व कोणी ठेवावा ? व ज्या शास्त्राच्या अभ्यासाने नि:स्वार्थता, निरपेक्षपणा व आपल्या कर्तृत्वाचा आत्मविश्वास निर्माण होतो, त्या शास्त्रास जर वरील विचारांचा सुधारक समाज, ‘हे शास्त्र नाही’ असे म्हणेल, तर ते ज्या शास्त्राने ज्ञानी झाले, त्या शास्त्राच्या अभ्यासाने त्याच्या ठिकाणी माणुसकीचा गंधसुध्दा निर्माण होऊ शकत नाही, असे म्हणावे लागेल.

आजपर्यंत भौतिक सुधारणेसाठी ज्या ज्या व्यक्तींनी आपले सर्वस्व जगाच्या कल्याणासाठी पणाला लावले, अशांना समिती किंबहुना सत्पुरुष या भावनेनेच ओळखते. त्यांनी लोककल्याणार्थ जे संशोधन केले ते जोपर्यंत मनुष्याच्या नित्योपयोगी जीवनाचे साधन आहे, तोपर्यंत ते साधन पारमार्थिकच होय. परंतु मनुष्याच्या अविचारामुळे तेच साधन संहारकही ठरते.  उदा. जे विमान शीघ्रगतीने मनुष्यास इकडून तिकडे नेते, तेच विमान वाँम्ब हल्ला करून संहारास कारण होते. आज या दोन बाजू या शास्त्रात सामावलेल्या आहेत. जोपर्यंत मनुष्य आपल्या ज्ञानाने सुविचार करीत आहे, तोपर्यंत त्या शास्त्रासारखे सुखच नाही. असे सुखाचे स्वप्न मनुष्य पाहतो. पण अविचाराने त्याच शास्त्राने जगाचे काय होणार आहे, हा प्रश्न आज प्रत्येकासमोर आहे. आज अशी अनेक शास्त्रे मानवी कल्याणाच्या हिताची असून मनुष्य ज्ञानी होऊन पुढे संशोधन करीत आहे व स्वतः निर्माण केलेल्या शास्त्रास भीत आहे व समाजासही भिववीत आहे. या सर्व शास्त्रपध्दतीस सूज्ञ मनुष्य शास्त्र म्हणून मानतो. परंतु जे शास्त्र आज हजारो वर्षे मनुष्याच्या कल्याणार्थ अस्तित्वात आहे, की ज्याचा फायदा विनामूल्य समाजातील प्रत्येकास मिळण्यासारखा आहे, त्यास ‘शास्त्र नाही’ असे म्हणून चालेल का ? तर अशा शास्त्रीय पध्दतीचा अभ्यास विनामूल्य लोकांना मिळावा म्हणून वरील स्पर्शसंवेदना ही साधना आत्मसात केली आहे. यास पाश्चिमात्य देशात Healing Medium असे म्हणतात. या स्पर्शसंवेदनासाठी ऋग्वेदात निरनिराळ्या रोगावर निरनिराळे मंत्र सांगितले आहेत. ते मंत्र सिध्द करून अनेक असाध्य रोगांवर त्याचा इलाज आज समितीच्या कार्यकेंद्रावर केला जात आहे. आजकाल मंत्रविद्येबद्दलही बरीच अनास्था दिसून येते. त्यामुळे दैनंदिन उपासनेत प्रातःसंध्या करण्याने ज्या काही मंत्रांचे फल शरीरसंवर्धनार्थ मिळत असे, ते न मिळाल्याने वातविकार, रक्तदाब, हृदयविकार यासारखे रोग खूपच प्रमाणात वाढलेले आहेत, ते निवारण करण्यासाठी मनुष्य शेकडो रुपये खर्च करील, परंतु नित्य उपासनेमधून ज्यामुळे दीर्धायुष्य, आरोग्य प्राप्त होते, त्यास तो शास्त्र म्हणण्यास तयार नाही. अशा अनेक कारणांनी प्रत्येक जीवन हे परावलंबी झाले व त्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या सुटणेही कठीण झाले आहे. आर्थिक प्राप्तीसाठी अन्य मार्गाचा अवलंब करून ती वाढविण्यापेक्षा जी प्राप्ती होत आहे, ती शास्त्रीय पध्दतीने टिकविण्याचे शास्त्र समाज-कल्याणाच्या दृष्टीने आवश्यक आहे. आजपर्यंत अनेक लोक हजारो रुपये खर्च करून शरीरप्रकृतीची तक्रार घेऊन समितीकडे आले. त्यांना याच मंत्रांच्या प्रार्थना म्हणून स्पर्शसंवेदना दिल्या व त्यामुळे त्यांना प्रकृती स्वस्थ लाभले. या शास्त्रपध्दतीची सिध्दता या कार्यातील प्रमुख मध्यस्थांनी प्रथमतः केली व शास्त्रीयदृष्ठ्या तो अभ्यास आहे सिध्द होण्यासाठी तशाच प्रकारचे बरेच मध्यस्थ आज सर्व कार्यकेंद्रावर तयार आहेत. यासाठी मनुष्य-शरीरात काही विशेष असे गुणधर्म असावयास पाहिजेत असे नाही. परंतु साधनेबद्दल परिपूर्ण आत्मविश्वास व निरपेक्ष भावना असावयास पाहिजे. याचेही अध्ययन इतरांना व्हावे की, ज्यामुळे घरातील किरकोळ आजार यावर तुमचे तुम्ही् इलाज करू शकाल.

या स्पर्शसंवेदनामुळे बाधक प्रकारांनी जर काही रोग निर्माण झाले असतील किंवा दैवी बाधा होऊनही त्रास होत असेल, तर तोही दूर होतो. त्याशिवाय शारीरिक रोग असतील त्याचेही निर्मूलन होते. या रोग निवारणानंतर जी पूर्वीची शारीरिक दुर्बलता निर्माण झालेली असते ती दूर करण्यासाठी जर काही आधुनिक पध्दतीच्या औषधोपचाराची आवश्यकता वाटली तर ती देण्यासाठी आज या समितीच्या कार्यामध्ये प्रमुख भाग घेणारे वैद्यकीय तज्ञ आहेत. त्यांनी आपला वाटा सेवा या स्वरूपात या कार्यात उचलला आहे. ही वैद्यकीय साहाय्यता देण्यासाठी मागे नमूद केलेल्या ‘अल्पबचत योजने’तील पैसे गोरगरीबांसाठी वापरले जातात. ही तज्ञ मंडळी म्हणजे :-

पुणे केंद्र – डॉ. म. ब. रेगे.
सातारा केंद्र – डॉ. मुतालिक.
मुंबई केंद्र – डॉ. नेरूरकर, डॉ. देसाई, डॉ. नानल.

यांची ही सेवावृत्ती भावनारुपी आहे. अशामुळे समाजातील सुखदु:खाचा व्यवहार हा सद्गुरु आज्ञेचा ठेवा आहे, हे सिध्द होते.

ज्ञानसंवेदना – 
वरील स्पर्शसंवेदनाविषयी जे निवेदन केले आहे, त्या संवेदना शारीरिक संवर्धनासाठी दिल्या जातात. आता मानसिक संवर्धन व्हावे म्हणून या ज्ञानसंवेदनांच्या साधनेचा उपयोग केला जातो. मुलांची गर्भधारणेपासून काही कारणाने जी वाढ ख़ुंटलेली असते की ज्यामुळे ज्ञानेंद्रिये पूर्णत्वाने कार्यक्षम झालेली नसतात, तसेच शारीरिक अवयवांची वाढ झालेली नसते, अशांसाठी या साधनेचा उपयोग अतिशय महत्वाचा आहे. याशिवाय विद्यार्जनासाठी स्मरणशक्ती वाढावी व बौध्दिक वृध्दि होऊन ग्रहणशक्ती वाढावी असा या साधनेचा हेतू आहे. आज अस्तित्वात असलेली समाजातील पिढी यांचे आचार-विचार कशा व कोणत्या प्रकारचे आहेत, हे प्रत्येकाच्या अनुभवाचे आहे व अशा अनुभवांनी आज आपण आपल्या मुलाबाळांच्या बालवृत्तीवर त्याचा संस्कार करून आपल्यासारखीच भावी पिढी निर्माण करणार. पण याचा विचार सूज्ञपणे मनुष्य ’पिता’ किंवा ’माता’ जबाबदारीने करतो का ? प्रत्येक कुटुंबातील कुटुंबप्रमुख भावी पिढीच्या नाशास कारण होणार आहे. कारण तुम्ही स्वतः देवधर्म करणार नाही. मग मुलांना तो नित्य करण्याची सवय कशी लागणार ? तुम्हाला जर काही देवादिकांचे स्तोत्रे येतील, तर तुम्ही तुमच्या मुलाबाळांना शिकवू शकणार ! परंतु त्या जीवनाचा संस्कार मुलाबाळांच्या भावी आयुष्याचा पाया असूनही तुम्ही रोज रिकामटेकडी मंडळी जगाची निंदा नालस्ती, देवधर्माची कुटाळकी करण्यासाठी व स्वतःचा वेळ घालविण्याचे साधन म्हणून जमविणार ! त्यात निरनिराळ्या व्यसनांचा आनंद लुटण्यासाठी पैशाचा दुरूपयोग करणार ! ही दृष्ये तुमच्या मुलाबाळांच्या मनावर काय संस्कार करणार याचा विचार सूज्ञ माता, पिता करतील काय ? आणि अशा विचारांची पुनरावृत्ती जर तुमच्या मुलाबाळांच्या जीवनात निर्माण झाली, तर दु:खाला कारण कोण ? यासाठी समितीने या साधनपध्दतीत दर शनिवारी मुलांना देवादिकांची स्तोत्रे, पाठ, प्रार्थना, परमार्थ प्रश्नवली यांचा अभ्यास देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यानंतर ज्ञानसंवेदना दिल्या जातात. या ज्ञानसंवेदनाचे शास्त्र हे काही नवीन नाही. हजारो वर्षांपासून ते चालत आलेले आहे. आशीर्वादाने मनुष्य ज्ञानी होतो, यावर आजच्या लोकांचा जो विश्वास नाही, त्याला हे सत्य अजमावण्यासारखे आहे की, प्रत्यक्ष वाणी आणि स्पर्श यामध्ये काय सामर्थ्य असू शकते !.

या संवेदना दिल्यानंतर मुलांची शालेय प्रगती कोणत्या प्रकारांनी झाली याची नोंद ठेवली जाते. आज बरीच भक्तभाविक मंडळी या समितीच्या कार्यपध्दतीकडे हेतूपूर्वक पहात नसल्याने प्रश्नाचे निराकरण सांगण्यापलीकडे समितीला लोककल्याणार्थ काही कार्य करावयाचे आहे हे त्यांना समजत नाही. अशामुळे वरील स्पर्शसंवेदना याचा रोगनिवारणार्थ फायदा व ज्ञानसंवेदनाचा स्वतःच्या मुलाबाळांच्या जीवनाचा उत्कर्ष होण्याच्या दृष्टीने जो फायदा आहे, तो विनामूल्य असूनसुध्दा घेण्यास तयार नाहीत.

गेल्या वर्षांपासून हा उपक्रम सुरु झाला. त्यामध्ये दुसरी एक महत्वाची विचारसरणी अशी की, जिची आवश्यकता आज समाजास खरोखरीच आहे, ती म्हणजे परस्परांविषयी जिव्हाळा व परस्परांना मदत करण्याची प्रवृत्ती असणे. जे विद्यार्थी येथील कार्यकेंद्रावर ज्ञानसंवेदना घेण्यास येतात, त्यामध्ये प्राथमिक शिक्षणापासून ते विश्वविद्यालयीन शिक्षणापर्यंतचे विद्यार्थी आहेत. ज्यांना परिस्थितीमुळे पुस्तके वगैरे घेणे शक्य नव्हते, अशा विद्यार्थ्यांनी ज्यांच्यापाशी ती होती, ती परस्परांविषयी वाटणाऱ्या जिव्हाळ्यामुळे एकमेकांच्या अडचणीप्रीत्यर्थ मिळून आपला अभ्याक्रम यशस्वीपणे पुरा केला. ज्या गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाचा लाभ होऊ शकत नाही, अशांना ‘अल्पबचत’ योजनेतून शिक्षणार्थ आवश्यक ती सहाय्यता दिली जाते. या सहाय्यतेची विचारपूस होण्यासाठी प्रत्येक केंद्रावर तीन तीन सेवकांची एक समिती नेमली आहे.

<<अध्याय  ४ वैयक्तिक व सामुदायिक साधना

>>अध्याय  ६ अभिमंत्रित तीर्थ व गो•या