गुरुप्रसाद

श्री.साई अध्यात्मिक समितीच्या तीन ग्रंथापैकी एक ग्रंथ, “साधन पत्रिका” ही संकेतस्थळावर दर्शविलेली आहे.आता दुसराग्रंथ “गुरुप्रसाद” हा प्रदर्शित होत आहे.

या ग्रंथाचे महत्व थोडक्यात असे सांगता येईल कीं, समाजातील सध्याची परिस्थिती, ना देव मानणारी आहे कीं, भौतिक सुखासिनता भोगून समाधानाने जीवन जगणारी आहे.समाजातील प्रत्यक्ष परिस्थिती पहातां असे दिसते कीं समाज एकीकडे उच्च प्रतिची सुखासिनता जरूर भोगतो आहे पण त्यातून मानसिक समाधान प्राप्त करू शकलेला नाही.तो ना देव मानतो,ना त्याला देवत्व कोठे दिसते.अशा परिस्थितीत “ज्ञान” प्राप्त करून ते ग्रहण केल्यास सध्याचेच नव्हे तर पुढील पिढींना जीवन जगण्याचा निश्चित मार्ग समजून आपला व आपल्या वंशाचा उध्दार होईल.
या ग्रंथातील अनुक्रमणिका पाहिल्यास त्यातील विषय हे नित्य-जीवन जगण्यास उपयोगी असून त्यातील ज्ञानाची व्यापकता लक्षात येईल.कांहींना असे वाटण्याची शक्यता आहे कीं, त्यातील विवेचन हे एका विशिष्ठ धर्मासाठी वा वर्गासाठी आहे.पण तसे नसून त्यातील “ज्ञान“ सर्व समावेशक आहे व निरंतर सत्य आहे.जगातील कोणत्याही जातीतील, पंथातील, धर्मातील मानव, आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशा शक्तिची पूजा, साधना, आराधना त्याच्या परंपरेनुसार वा सोयीच्या मार्गाने करीतच असतो.त्यांच्या उपासनेतील तपशिलात फरक असू शकेल पण तत्व हे तत्वच असते.कारण ज्ञान हे एकच असते.फक्त त्याप्रत जाण्याचे मार्ग विविध असू शकतात.

जागतीक स्तरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यास असे दिसेल कीं, कोणत्याच देशातील मनुष्य आज सुखा-समाधानाने जगततो नसून सतत मानसिक तणावाखाली वावरत आहे व जगतो आहे.अशी सध्यः परिस्थिती असल्याने प.पू.साईनाथ महाराजानी वंदनीय दादांना आज्ञा केली कीं, “जगाला सुखी करण्यापेक्षा सुखाचा मार्ग सांग”.त्या आज्ञेचे पालन करून वंदनीय दादांनी प्रत्यक्ष अनुभव व अनुभूती घेतल्यानंतर हा “गुरुप्रसाद” ग्रंथ लिहिला आहे.ह्या ग्रंथाच्या माध्यमातून बहुमोल ठेवा मानवाला प्राप्त झाला आहे.त्यातील ज्ञान सर्व मानवासाठी असून त्याला भौगोलिक सीमाचे बंधन नाही, तसेच जात-धर्म-भाषा इत्यादीचे बंधन नाही.”

अशा ह्या बहुमोल ग्रंथाचे वाचन, मनन, शांत चित्ताने करून प्रत्येकाने आपले जीवन साकार करावे, अशी जगद्गुरुचरणी प्रार्थना.

 

अध्याय १ – कार्य व कार्याची भूमिका.
अध्याय २ भक्तभाविकांची कार्यार्थ भूमिका.
अध्याय ३ घराण्यातील कुलधर्म.
अध्याय ४ पूजनादि विधी व तिचे महत्व.
अध्याय ५ कुलाचार, कुलोपासना.
अध्याय ६ उपास्य दैवते व करावयाची उपासना.
अध्याय ७. कार्याची निराकरण पध्दती.
अध्याय ८ प्रार्थना – साधना व त्यातील वेदवेदांत.
अध्याय ९. ॐ कार साधना.
अध्याय१०. गुरुतत्व व त्याचे जीवनातील महत्व.